संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)
आपण संगणकावर केलेलं काम बरेचदा गुपित ठेवावं, ते दुसऱ्याला सहज सापडू नये, असं बरेचदा वाटतं. यासाठी कॉम्प्यूटरमध्ये 'हिडन' नावाचा पर्याय आहे. तुम्ही सेव्ह केलेली एखादी फाईल अथवा फोल्डर 'हिडन' करायची असेल तर त्या फाईल अथवा फोल्डरला राईट क्लिक करा. त्यानंतर 'प्रॉपर्टीज' वर क्लिक करा.यानंतर समोर येणाऱ्या 'विंडो' मध्ये 'जनरल' मध्ये तुम्हाला 'अट्रिब्युट्स' मध्ये 'रिड ओन्ली' आणि 'हिडन' असे दोन पर्याय दिसतील. यातील 'हिडन' वर क्लिक करा आणि रिफ्रेश म्हणून पहा. तुमची फाईल गायब झालेली असेल.
0 टिप्पणी पोस्ट करा:
Post a Comment