खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Showing posts with label स्मार्ट टिप्स. Show all posts
Showing posts with label स्मार्ट टिप्स. Show all posts

Saturday, September 02, 2017

MLM (Multi Level Marketing) - उद्योगातील एक सर्वात मोठा अडथळा.

MLM (Multi Level Marketing) - उद्योगातील एक सर्वात मोठा अडथळा.

होय ! MLM म्हणजेच मल्टी लेवल मार्केटिंग हा उद्योगातील एक महत्वाचा अडथळा मानावा लागेल ह्याची कारणे आपण सविस्तरपणे पुढे पाहूच, परंतु उद्योजक ह्या माझ्या मागील लेखामध्ये सांगितल्याप्रमाणे उद्योजकतेचे महत्वाचे तीन प्रकार आपण पहिले. त्यातील दुसरा प्रकार होता तो म्हणजे तरुण मंडळींना नोकरी विषयी तिरस्कार वाटू लागतो आणि नाईलाजाने का होईना पण ते उद्योग धंद्याकडे वळतात तर अशाच मंडळींना महत्वाची गरज असते ती म्हणजे योग्य मार्गदर्शनाची, आणि ह्या मार्गदर्शनामधीलच आजचा विषय आहे तो म्हणजे MLM एक अडथळा.
आजपर्यंत प्रत्येकाने MLM  हा शब्द ऐकला असेल अगदी ग्रामीण भागापर्यंत देखील असे अनेक लोक आहेत जे multi chain marketing, direct sell, multi level marketing इत्यादी मोठमोठ्या मार्केटिंगचे शब्द उच्चारून लोकांना भुरळ घालून अशा कंपन्यांचे एजंट निर्माण करतात. मोठमोठया हॉटेल मध्ये सेमिनार होतात. आणि सामान्य माणसाला भुरळ घालून अशा कोणत्यातरी प्रोडक्टचा एजंट बनविला जातो. बरं त्याआधी एक सूचना MLM बद्दल हे माझे वयक्तिक अनुभवातून आलेले मत आहे. ह्याचा कोणत्याही कंपनी अथवा संस्थेशी दूरान्वयी संबंध नाही.

Monday, September 05, 2016

उद्योजक - Entrepreneur - Startup

उद्योजक,

उद्योजक म्हणजे काय ? एका वाक्यात सांगायचे झाले तर काहीतरी नवीन निर्माण करू इच्छिणारा ! काहीतरी नवीन निर्माण करण्याची उमेद असलेला ! आणि काहीतरी नवीन निर्माण केलेला ! असा तो "उद्योजक ". आता एवढे  लक्षात आले की नवीन निर्मिती करणारा तो उद्योजक.

सध्या उद्योजकतेकडे वळणारी असंख्य तरुण मंडळी आपल्याला पाहावयास मिळते. अर्थात तारुण्यात तो जोश आणि उमेद असतेच. पण अश्या तरुणांना ती उमेद कायम स्वरूपी टिकवून ठेऊन चिकाटीने आणि सातत्याने हाती घेतलेल्या नवीन आणि स्वतः निर्माण करण्याच्या ध्येयापर्यंत पोहोचता यावे म्हणून सतत सकारात्मक विचार करणे आणि नकारात्मक परिस्थितीवर मात करण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागते.

Wednesday, July 30, 2014

ब्लॉक करा फेसबुक वरील गेम रिक्वेस्ट - How to Block Facebook game requests ?

                 मित्रांनो आज मी तुम्हाला एक अतिशय उपयोगी अशी माहिती सांगणार आहे विशेषतः जे युजर्स फेसबुकवर गेम्स खेळत नाहीत परंतु त्यांना येणाऱ्या गेम नोटिफिकेशन्स असंख्य असतात अशांसाठी हा लेख.  फेसबुकवर गेम खेळणाऱ्यांची संख्या सध्या वाढतेय. स्वतः गेम खेळता खेळता अनेक जण इतरांना गेम/ अ‍ॅप रिक्वेस्ट पाठवतात. ही गेम रिक्वेस्ट पाठवल्याने त्यांना फायदा होतो; पण दुसऱ्यांच्या डोक्याला त्रास होतो. याच कारणामुळे "मला कोणतीही गेम रिक्वेस्ट पाठवू नका " अशा पोस्ट फेसबुकवर टाकणाऱ्यांची संख्याही मोठी दिसते. मात्र, अनेकदा गेम खेळणारयांनाही न सांगता या रिक़्वेस्ट अपोआप पाठविल्या जातात. अशा वेळी रिक़्वेस्ट पाठविणे टाळणे त्या युजारच्याही हातात नसते. पण तुम्ही मात्र या रिक़्वेस्ट तुम्हाला येणे थांबवू शकता… त्या कशा हे आपण पाहू 

Wednesday, July 23, 2014

WhatsApp for pc - WhatsApp आपल्या संगणकासाठी.

                         मित्रांनो WhatsApp बद्दल मी वेगळे काय सांगू, आपण सर्वजण WhatsApp बद्दल जाणून असलाच अर्थात हल्ली प्रत्येकाकडे WhatsApp हे application हमखास पाहायला मिळते. जो व्यक्ती Android फोन वापरतो त्याच्याकडे हे अगदी १००% असतेच; किंबहुना WhatsApp साठी Android फोन विकत घेणारे अनेक लोक असतील. WhatsApp हे जगातील सर्वात जास्ती वापरले जाणारे आणि जास्ती वेळा डाऊनलोड केले गेलेले Application आहे. तुमच्याकडे जर कोणताही स्मार्टफोन असेल तर तुम्ही ह्याचा वापर करू शकता.

WhatsApp for PC

Wednesday, June 26, 2013

हरवलेला लॅपटॉप परत मिळवा !

                                                             
prey overview
                आज पर्यंत आपण अनेक  स्मार्ट टिप्स घेतल्या आहेत आज अशीच एक अगदी छोटीच पण खूप महत्वाची टीप मी आपल्याला देणार आहे, लॅपटॉप हरवला किंवा चोरीला गेला तर ? या कल्पनेनेच आपल्याला हतबल व्हायला हवे. प्रत्यक्षात अशी वेळ आली तर आपले आयुष्यच थांबल्यासारखे होईल नाही का ? म्हणूनच तर लॅपटॉप बाळगणारी प्रत्येक व्यक्ती जीवापाड लॅपटॉप सांभाळत असतो. तरीही लॅपटॉप चोरीला गेला तर किंवा हरवला तरीही तो आपल्याला परत मिळेल, असे तंत्रज्ञान आता विकसित करण्यात आले आहे.

Thursday, May 30, 2013

क्लिक करा आणि कमवा !


क्लिक करा आणि कमवा !
                                                               मित्रांनो, जरा इकडे लक्ष द्या ! मी आजपर्यंत आपल्याला इंटरनेट वरून कसे पैसे कमविता येतील ह्याबद्दलचे अनेक लेख लिहून आपले मार्गदर्शन करत आहे परंतु ते केवळ कसे अकौंट काढायचे आणि काय करायचे एवढेच होते म्हणून अनेकांनी माझ्याशी संपर्क साधून त्यामधून मिळणाऱ्या इन्कम बाबत बरीच विचारणा केली. त्या अनेकांना मी मला येतील तशी उत्तरेपण दिली, परंतु मी आता अगदी विश्वासाने सांगू शकतो की, हो!!! PTC (Pay to Click)  ह्या माध्यमातून नक्कीच पैसे मिळतात ह्याचा एक उत्तम पुरावा माझ्याकडे आहे तो म्हणजे मला मिळालेल्या इन्कमचा पुरावा. मला मिळालेल्या इन्कमचे छायाचित्र मी पुढे देत आहे ते आवर्जून पहा :

Thursday, May 23, 2013

पासवर्ड ऑनलाईन 'इन्कम'चा !

                                  मित्रांनो, आपण मागील काही लेखांमधून इंटरनेट वरून पैसे कमविण्याचे अनेक मार्ग पाहात आहोत, मी आपल्याला असे अनेक अधिकृत मार्ग सांगत आहे ज्यामधून आपण नक्की पैसे कमवू शकता. त्यासाठी मी इंटरनेट वरून असे अफलातून पर्यायांची निवड करून ते आपल्या पुढे मांडत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अशाच एका वेबसाईट बद्दल माहिती.
                            
                                 PROBUX  ही एक अतिशय कमी वेळामध्ये प्रचलित झालेली PTC (paid to click) ह्या तत्वावर चालणारी वेबसाईट आहे. PROBUX ही सध्या PTC मध्ये द्वितीय क्रमांकाची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटची स्थापना २०१२ मधील आहे, इथे प्रत्येकजण आपले खाते काढण्यासाठी उत्सुक असतो, कारण इतर कोणत्याही PTC वेबसाईटपेक्षा इथे सर्वात जास्ती म्हणजे ०.०१$ प्रत्येक क्लिक साठी तसेच ०.०१५$ प्रत्येक रेफरलसाठी आपल्या खात्यामध्ये जमा केले जातात. तसेच प्रत्येक ३० सेकंदांनी आपल्यासाठी एक advertise तयार असते.

Wednesday, April 24, 2013

Paypal आणि Payza चे अकौंट कसे काढायचे आणि त्याचे फायदे.

                                      मित्रांनो, आज पर्यंत बऱ्याच लोकांना असा प्रश्न सतत जाणवत होता किंवा अनेक दिवस बरेच लोक एका गोष्टीच्या शोधत होते ते म्हणजे इंटरनेटवरून घरबसल्या पैसे कसे कमवित येतील. आणि हे खरच शक्य आहे का ? तर ते आपण Earn Money online - इंटरनेटवरून पैसे कमवा ! ह्या लेखाद्वारे पहिले आहे, जर अजूनही कोणाच्या मनात शंका असतील आणि कोणी registration केले नसेल तर त्यांनी Neobux इथे जाऊन आत्ताच registration करा. आणि ज्यांनी registration केले आहे त्यांचे अभिनंदन. 
payza 
                                 
paypal 







Sunday, April 21, 2013

Earn Money online - इंटरनेटवरून पैसे कमवा !

                                                  मित्रांनो, घरबसल्या पैसे कमवा ! महिन्याला ८ ते १० हजार रुपये कमवा आणि त्यासाठी आधी थोडे पैसे खाली नमूद केलेल्या अकौंटला भरा. अश्या अनेक जाहिराती आपण कायम वाचत असतो. आणि कित्येक जण अश्या अनेक जाहिरातींना बळी पडत असतात. पण हे अगदी चुकीचे आहे. मी तर म्हणतो हा निव्वळ मूर्खपणा आहे. कारण निदान आपण जर इंटरनेट वर काम करून देणार असू तर त्यासाठी पहिल्यांदा आपण पैसे भरण्याचे कारणच काय ? ज्या अधिकृत वेबसाईट असतात त्या आपल्याकडून कोणतीही फी घेत नाहीत हे लक्षात ठेवा, त्यासाठी मी तुम्हाला अनेक अशा अधिकृत वेबसाईट सांगणार आहे ज्यामध्ये आपणास एकही रुपया खर्च येणार नाही. केवळ आपले registration महत्वाचे असेल. खरेतर इंटरनेटवरून पैसे कमविण्याचे अनेक मार्ग आहेत. हे मार्ग खालील पर्यायांमध्ये विभाजित होतात. :-

Saturday, April 06, 2013

स्मार्ट टिप्स - कॉम्प्यूटर हार्डडिस्कच्या स्वास्थ्यासाठी महत्वपूर्ण माहिती.

                                              संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)
                          आज आपण बघणार आहोत संगणकाच्या हार्डडिस्कची देखभाल. अनेक वेळा आपला संगणक किंवा Laptop ह्यामधील हार्डडिस्कचा विचित्र आवाज येत असतो किंवा संगणक अगदी हळू हळू प्रोसेस करत असतो अश्यावेळी हार्डडिस्क किती प्रमाणात कार्यरत आहे हे जाणून घेणे महत्वाचे ठरते. तर हार्डडिस्कची तपासणी करण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत ते आपण पाहू. 

Saturday, March 30, 2013

स्मार्ट टिप्स - मोबाईलचे बिल कमी करण्यासाठी काही अफलातून पर्याय.

                                       आज आपण बघणार आहोत मोबाईल बिल कसे कमी करता येईल आणि त्यासाठी काही अफलातून पर्याय. अनेक लोक बिल बजेटपेक्षा अधिक आले की त्रस्त होतात, प्रीपेड असेल तर सारखे रिचार्ज करून वैतागलेले असतात. आता अशा लोकांसाठी खास Applications आली आहेत, काही applications ही पूर्वीपासूनच आहेत परंतु ती भारतामध्ये वापरता येत नव्हती. आता आपण ती भारतात देखील वापरू शकतो. त्यांचा वापर केल्यावर आपण आपल्या मोबाईलचे बिल कमी करू शकतो. विशेष म्हणजे यापैकी बहुतांश applications मोफत आहेत. या अशा काही निवडक apps ची ही माहिती :-

Monday, March 25, 2013

स्मार्ट टिप्स - वाढवा मोबाईल फोनचा बॅटरी बॅकअप.

                                      ज आपण बघणार आहोत मोबाईल फोनसाठी लागणारी बॅटरी अधिक काळासाठी कशी ऊर्जा देईल यासाठी महत्वपूर्ण टिप्स. अलीकडच्या काळात मोबाईल, स्मार्टफोनची चलती किती आहे, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. गुगलच्या Android OS वाल्या स्मार्टफोनची चलती सध्या खूप वाढत आहे. पण, साधारण जावा फोनच्या तुलनेत स्मार्टफोनची बॅटरी जास्त लवकर संपते, अशी अनेकांची तक्रार आहे. एकाचवेळी अनेक Applications active केल्याने Android फोनची बॅटरी जास्त वापरली