संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)
शिर्षकच किती गमतीदार आहे ना ? आज काल सोशल नेटवर्किंग मध्ये काय घडेल ह्याचा नेम नाही, पण हे देखील शक्य आहे . फेसबुकवाल्यांनी आता आपल्या मरणोत्तर जीवनाचीही काळजी घेण्यास सुरवात केली आहे. आता फेसबुकवर असे एक फिचर जोडलेले आहे जे आपण आपल्या मृत्युनंतरच्या काळासाठी राखीव ठेवू शकतो. मृत्युनंतर प्रत्येक व्यक्ती काही ना काही सोडून जात असते. आता फेसबुक युजर्स आपले खास मेसेज या फिचरद्वारे सोडून जाऊ शकतात.
फेसबुक |
या फिचरचे नाव आहे ' इफ आय डाय ' . याचा अर्थ 'मी जर मेलो तर...' आपल्या मृत्युनंतर आपल्या प्रियजनांसाठी आपला एखादा व्हिडीओ, ऑडिओ, किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा मेसेज आपण सोडू शकतो. हे मेसेज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या फेसबुक फ्रेन्ड्सपैकी तिघांना आपला ट्रस्टी बनवावे लागेल. हे ट्रस्टी आपल्या मृत्युनंतर हा मेसेज किंवा विशिष्ठ ईमेल सर्व लोकांसाठी पाठवू शकतात. इस्राइलच्या ज्या माणसाने हा अंप्स तयार केला आहे तो एका अपघातात मरता मरता वाचला होता. मृत्यूला इतक्या जवळून पाहिल्यानंतर त्याला असा ' अंप्स ' तयार करण्याची कल्पना सुचली !
0 टिप्पणी पोस्ट करा:
Post a Comment