मित्रांनो आज मी तुम्हाला एक अतिशय उपयोगी अशी माहिती सांगणार आहे विशेषतः जे युजर्स फेसबुकवर गेम्स खेळत नाहीत परंतु त्यांना येणाऱ्या गेम नोटिफिकेशन्स असंख्य असतात अशांसाठी हा लेख. फेसबुकवर गेम खेळणाऱ्यांची संख्या सध्या वाढतेय. स्वतः गेम खेळता खेळता अनेक जण इतरांना गेम/ अॅप रिक्वेस्ट पाठवतात. ही गेम रिक्वेस्ट पाठवल्याने त्यांना फायदा होतो; पण दुसऱ्यांच्या डोक्याला त्रास होतो. याच कारणामुळे "मला कोणतीही गेम रिक्वेस्ट पाठवू नका " अशा पोस्ट फेसबुकवर टाकणाऱ्यांची संख्याही मोठी दिसते. मात्र, अनेकदा गेम खेळणारयांनाही न सांगता या रिक़्वेस्ट अपोआप पाठविल्या जातात. अशा वेळी रिक़्वेस्ट पाठविणे टाळणे त्या युजारच्याही हातात नसते. पण तुम्ही मात्र या रिक़्वेस्ट तुम्हाला येणे थांबवू शकता… त्या कशा हे आपण पाहू