संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)
आज पासून मी नवीन सदर चालू करत आहे . "संगणकाशी दोस्ती" या सदरामध्ये आपण पाहणार आहोत संगणकावर छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण आपला संगणक (Personal Computer) कसा सुरक्षित तसेच सुटसुटीत (User Friendly) ठेऊ शकतो.
तर आज आपण पाहणार आहोत . संगणकावर शॉर्टकट कसा तयार करता येतो .! संगणकाच्या हार्डडिस्कवर आपण अनेक फोल्डर , फाईल्स आपल्याला दररोज वापराव्या म्हणजेच ओपन कराव्या लागतात; पण बरेचदा या फाईल्स-फोल्डर चटकन सापडत नाहीत . यासाठी एक सोपी युक्ती करता येईल. संबंधित फाईल अथवा फोल्डरमध्ये जाण्याचा शॉर्टकट डेस्कटॉपवर आणून ठेवता येईल. त्यासाठी त्या फाईल अथवा फोल्डरवर राईट क्लिक करा. येणाऱ्या पर्यायातील 'सेंड टू' मध्ये 'डेस्कटॉप-क्रिएट शॉर्टकट' वर क्लिक करा आणि पहा. आता डेस्कटॉपला त्या फाईलचा शॉर्टकट तयार होईल. त्यामुळे तुम्हाला रोज आणि नेहमी लागणारे फाईल्स-फोल्डर शोधत बसावे लागणार नाहीत .
0 टिप्पणी पोस्ट करा:
Post a Comment