संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)
मित्रांनो, Hibernate म्हणजे काय? हे आपण प्रथम बघू , आपण संगणकावर कोणतेही काम करत असताना. अचानक कोणतेतरी काम आठवते आणि बाहेर जावे लागते, परंतु संगणकावर आपले जे काही महत्वाचे काम चालू असते ते बरेचवेळा save केलेले नसते किंवा एकाचवेळी अनेक web browsers , ओपन केलेले असतात. आणि अशावेळी अचानक कुठे बाहेर जावे लागले तर आपण सगळ्या प्रोसेस बंद करत बसतो ,त्यामध्ये खूप वेळपण जातो आणि शिवाय आपण पुन्हा जेंव्हा संगणक चालू करतो तेंव्हा पुन्हा ह्याच सगळ्या प्रोसेस कराव्या लागतात तसेच काय काम करत होतो हेसुद्धा कधीकधी
विसरतो.
विसरतो.
अशावेळी एक साधा आणि सोप्पा उपाय म्हणून Hibernate हा पर्याय उपयोगी पडतो. Hibernate मुळे आपण संगणकाच्या सगळ्या प्रोसेस आहे त्या स्थितीत ठेऊन संगणक बंद करू शकतो. संगणक Hibernate कसा करावा (Windows xp साठी )ते पुढील प्रमाणे :-
१. प्रथम संगणकावरील Start ह्या बटनावर क्लिक करा.
२. नंतर Control Panel वर क्लिक करा.
३. Control Panel मधील "Power Options" वर डबल क्लिक करा.
४. त्यानंतर एक विंडो ओपन होईल,त्या विंडो वर आपल्याला Power schemes, Advanced,Hibernate आणि UPS हे Options दिसतील.
५. त्यातील Hibernate वर क्लिक करा. आणि त्यातील Enable hibernation ह्या option पुढे क्लिक करा.
६. नंतर Apply करून ok वर क्लिक करा.आता तुमचा संगणक Hibernate साठी तयार आहे.
७. आता महत्वाचं म्हणजे संगणक बंद करताना हा option कसा select करायचा , जेंव्हा तुम्हाला संगणक Hibernate करायचा असेल तेंव्हा start मेनू मध्ये जाऊन Turn off computer वर क्लिक करा.
८. त्यानंतर एक विंडो दिसेल तेंव्हा shift बटन दाबून ठेवा , त्याचवेळी आपल्याला एक बदल लक्षात येईल Stand By चे Hibernate मध्ये रुपांतर झालेले दिसेल. त्यावर क्लिक करा.
९. अशाप्रकारे आपण आपला संगणक Hibernate करू शकतो. त्यामुळे आपला वेळ नक्कीच वाचेल आणि ज्या प्रोसेस आधी चालू असतील तश्याच स्थितीत संगणक पुन्हा चालू होईल.
0 टिप्पणी पोस्ट करा:
Post a Comment