मित्रांनो, घरबसल्या पैसे कमवा ! महिन्याला ८ ते १० हजार रुपये कमवा आणि त्यासाठी आधी थोडे पैसे खाली नमूद केलेल्या अकौंटला भरा. अश्या अनेक जाहिराती आपण कायम वाचत असतो. आणि कित्येक जण अश्या अनेक जाहिरातींना बळी पडत असतात. पण हे अगदी चुकीचे आहे. मी तर म्हणतो हा निव्वळ मूर्खपणा आहे. कारण निदान आपण जर इंटरनेट वर काम करून देणार असू तर त्यासाठी पहिल्यांदा आपण पैसे भरण्याचे कारणच काय ? ज्या अधिकृत वेबसाईट असतात त्या आपल्याकडून कोणतीही फी घेत नाहीत हे लक्षात ठेवा, त्यासाठी मी तुम्हाला अनेक अशा अधिकृत वेबसाईट सांगणार आहे ज्यामध्ये आपणास एकही रुपया खर्च येणार नाही. केवळ आपले registration महत्वाचे असेल. खरेतर इंटरनेटवरून पैसे कमविण्याचे अनेक मार्ग आहेत. हे मार्ग खालील पर्यायांमध्ये विभाजित होतात. :-