खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Thursday, April 02, 2020

डिजिटल मार्केटिंगची गरज कुठेपर्यंत?

डिजिटल मार्केटिंगची गरज कुठेपर्यंत?


   मित्रांनो, आपण डिजिटल मार्केटिंग विषयीचे लेख पाहत आहोत या आधीच्या भागांमध्ये डिजिटल मार्केटिंग मध्ये कोणकोणत्या माध्यमांचा समावेश होतो ?  - भाग - १भाग - २भाग - ३ पाहिले. आता या भागात आपण पाहणार आहोत डिजिटल मार्केटिंगची गरज कुठेपर्यंत? जर तुम्ही आधीचे लेख वाचले नसतील तर डिजिटल मार्केटिंग  या लिंक वर क्लिक करून आधीचे सर्व लेख पूर्ण वाचा.

               आजचा विषय थोडा वेगळा आहे असे आपल्याला वाटले असेलच कारण गरज कुठेपर्यंत ? हा काय प्रश्न असू शकतो का ? तर हो या विषयीच आपण आज अधिक माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी मी काही थोडा अभ्यास करत होतो तेंव्हा असे लक्षात आले, की जगामध्ये अनेक अशा कंपनी आहेत की ज्यांचे उत्पादन म्हणजेच प्रॉडक्ट जेवढ्या किमतीमध्ये तयार होते त्याच्या कितीतरी जास्ती पटीने ते विकण्यासाठी खर्च केला जातो.

             अगदीच रोजच्या जीवनातले उदाहरण घ्यायचे झाले तर, पेप्सी, थंम्ब्सअप, कोकाकोला इत्यादी थंडपेय निर्मितीचा जो खर्च आहे तो खूप कमी असतो. तुम्हीच विचार करा या प्रकारच्या थंडपेयांमध्ये कोणकोणते घटक असू शकतात. एक तर सर्वात जास्ती असलेला घटक म्हणजे पाणी, त्यानंतर सोडा आणि प्रत्येकानी आपापल्या चवीनुसार तयार केलेली एक प्रकारची पावडर. या व्यतिरिक्त कोणताही खर्च नाही साधारण हे पेय ५ ते ६ रुपये लिटर या किमतीमध्ये तयार होत असेल. आणि आपण कमीतकमी ४०-५० रुपये लिटर या छापील किमतीला विकत घेतो. जे अर्थातच वेगवेगळ्या कंपनीवर किंमत अवलंबून आहे. आपण कायमच अशा थंडपेयांच्या जाहिराती टेलिव्हिजन वर हमखास पाहत असतो. जे आत्ताच्या काळामध्ये जाहिरात करण्यासाठी सर्वात जास्ती महाग असलेले माध्यम म्हणजे टेलिव्हिजन हे आहे. परंतु, सांगण्याचा उद्देश असा की उत्पादनावर होणारा खर्च हा अगदीच कमी प्रमाणात परंतु ते उत्पादन तुम्हाआम्हापर्यंत पोहोचविण्यासाठी भल्यामोठ्या जाहिराती करून ते उत्पादन कसे चांगले आहे हे पटवून दिले जाते.

                 आपण पाहिले पारंपरिक उद्योगांमधील सर्वोत्तम असलेल्या ह्या कंपनी खूप आधीपासून म्हणजेच अगदी जेव्हापासून रेडिओचा शोध लागला तेंव्हा आणि त्यानंतर टेलिव्हिजन या सारख्या माध्यमांवर जाहिराती करू लागले. जे आत्ता खूप मोठ्याप्रमाणात खर्चिक माध्यम आहे.

जाहिरातींचे मूल्य येणाऱ्या काळामध्ये वाढू शकते.

                  डिजिटल मार्केटिंगची अजूनही सुरुवातच आहे असे म्हणावे लागेल. कारण भारतासारख्या देशामध्ये अनेक भागांमध्ये इंटरनेट पोहोचले आहे तसेच अनेक लोक सोशल माध्यमांचा वापर करू लागले आहेत. जसजसा सोशल माध्यमांचा वापर वाढू लागेल तसतसे जाहिरातींचे मूल्य देखील वाढत जाईल. अर्थात यासाठी काही अजून घटक अवलंबून आहेत. जसे की सोशल माध्यमांमध्ये स्पर्धा वाढत राहिली तर जाहिरातींची मूल्य स्थिर राहू शकतील. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे आपण आधीच्या लेखामध्ये पहिले तसे टिकटॉक हे अँप सध्या अनेक लोक वापरतात. त्याचमुळे टिकटॉक वर जाहिरातींचे मूल्य सर्वात जास्ती आहे.

येणाऱ्या काळात डिजिटल मार्केटिंग मध्ये अनेक संधी.

                  डिजिटल मार्केटिंगची गरज कुठेपर्यंत? याचे उत्तर द्यायचे झाले तर, आत्ता तर सुरुवात आहे असे म्हणले तरी चालेल कारण अजून असे अनेक उद्योग आहेत ज्यांचे अजूनही फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन या सारख्या माध्यमांवर पेज देखील नसेल. त्यामुळे, "मागणी तसा पुरवठा" या म्हणीनुसार इथेही जसजसा सोशल माध्यमांचा वापर वाढत जाईल तसतसा डिजिटल मार्केटिंगचा ओघ वाढतच राहील.

                 यामुळेच, इथून पुढील येणाऱ्या संकट काळामध्ये अर्थात जागतिक मंदीच्या काळामध्ये सुद्धा डिजिटल मार्केटिंग या एकमेव क्षेत्रामधील नोकरीच्या संधी वाढतच राहतील यात शंका नाही. डिजिटल मार्केटिंग हा खुप अफाट विषय आहे अगदी कधीही न संपणारा आणि संपूर्ण कधीही न सांगता येणारा. कारण, कोणताही व्यवसाय हा एकसारखा नाही. एकाच क्षेत्रातील असेल परंतु त्याचा ग्राहक वर्ग एकच असेल असे नाही.

               आपण एक उदाहरण घेऊ आपल्या सर्वांना कधीना कधी आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे जावेच लागते. डॉक्टर हे एक असे क्षेत्र आहे ज्यामध्ये कधीही डॉक्टर परिपूर्ण होत नाही ते प्रॅक्टिस करतात, वेगवेगळ्या रुग्णांवर उपचार लिहून देतात किंवा औषध देतात. परंतु ह्यामध्ये सातत्याने प्रॅक्टिस चालू ठेवावी लागते नवनवीन आजारांवर नवीन येणाऱ्या औषधांचा काय परिणाम होतो हे त्यांना प्रॅक्टिस ने समजते. अशाच प्रकारे डिजिटल मार्केटिंग मध्ये कोणत्याही उद्योगासाठी ठरलेली प्रक्रिया नाही. जी अमलात आणली म्हणजे सारखाच परिणाम पाहायला मिळेल. पण हो नक्कीच काही ठरलेले नियम आहेत त्यानुसार आपण या गोष्टी अमलात आणू शकता.

 सराव, सातत्य आणि योग्य लिखाण.

          त्यामुळे सातत्याने वेगवेगळे प्रयोग करत राहणे हे महत्वाचे आहे. व्यवसायासाठी लागणाऱ्या पोस्ट वेगवेगळ्या स्वरूपात आकर्षक रंगसंगतीमध्ये तयार करणे. पोस्टचा विषय योग्य पद्धतीने मांडणे. आणि योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचविणे. या काही महत्वाच्या गोष्टी आपण सातत्याने करत राहिलात तर ग्राहकाचा आपल्या व्यवसायाविषयी असलेला विश्वास वाढण्यास मदत होऊ शकते. अर्थातच डिजिटल मार्केटिंगची गरज ओळखून लवकरच त्याप्रमाणे आपणही याचा एक भाग होणे गरजेचे आहे.

 या भागामध्ये आपण पहिले डिजिटल मार्केटिंगची गरज कुठेपर्यंत?, पुढील लेखांमध्ये आपण पाहणार आहोत:


  • डिजिटल मार्केटिंगच का ?
  • डिजिटल मार्केटिंगचे कोण कोणते पर्याय उपलब्ध आहेत ?
  • कोण कोणते उद्योग डिजिटल मार्केटिंग करू शकतात ?
  • कोणत्या उद्योगांसाठी डिजिटल मार्केटिंग सर्वोत्तम पर्याय आहे ?
  • डिजिटल मार्केटिंग केल्याने खरंच उद्योग - व्यवसायात विक्रीमध्ये फायदा होतो का ?
  • डिजिटल मार्केटिंग कोणी करावे ?
  • अशा कोणत्या संस्था आहेत ज्या आपल्या व्यवसायाचे डिजिटल मार्केटिंग करून देतील ?
  • डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी कोणते ज्ञान आवश्यक आहे ?
  •  सोशल मिडिया ऑप्टिमायजेशन, आणि सर्च इंजिन ऑप्टिमायजेशन (SEO) म्हणजे काय ?
           मित्रांनो, आपल्याला लेख कसे वाटत आहेत हे नक्की कंमेंट मध्ये कळवा. अधिक माहिती साठी इथे संपर्क करा. इथून पुढे दररोज एक याप्रमाणे डिजिटल मार्केटिंग विषयी लेख आपणास वाचता येणार आहेत. धन्यवाद !

आधीचे लेख वाचा:


खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.






0 टिप्पणी पोस्ट करा:

Post a Comment