संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)
शिर्षकच किती गमतीदार आहे ना ? आज काल सोशल नेटवर्किंग मध्ये काय घडेल ह्याचा नेम नाही, पण हे देखील शक्य आहे . फेसबुकवाल्यांनी आता आपल्या मरणोत्तर जीवनाचीही काळजी घेण्यास सुरवात केली आहे. आता फेसबुकवर असे एक फिचर जोडलेले आहे जे आपण आपल्या मृत्युनंतरच्या काळासाठी राखीव ठेवू शकतो. मृत्युनंतर प्रत्येक व्यक्ती काही ना काही सोडून जात असते. आता फेसबुक युजर्स आपले खास मेसेज या फिचरद्वारे सोडून जाऊ शकतात.