|
केंव्हा मिळेल न्याय ??? |
आज ३० डिसेंबर २०१२ आपण २०१२ ह्या वर्षाला निरोप देण्यासाठी सज्ज आहोत असे म्हणत असताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करत असताना एका अतिशय खेदजनक अशा घटनेने आपला देश अक्षरशः ढवळून निघत आहे, ती म्हणजे आपल्या देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरामध्ये झालेले एक सामुहिक बलात्काराचे प्रकरण; इथे मला एक हा शब्द लिहिताना असे जाणवते आहे कि आपण चूक करतोय,कारण फक्त एक प्रकरण समोर आले आणि त्याबद्दल एवढी आंदोलने झाली आणि अजूनही होत आहेत म्हणून हे पुन्हा एकदा जगासमोर आले कि अजूनही ह्या देशातील महिला किती सुरक्षित आहेत ? आणि ह्यासाठी खरे जबाबदार कोण ? सध्याचे जग हे पुरुष प्रधान संस्कृतीचे आहे असे आपण मानतो हे ठीक आहे पण मग शेवटी महिलांनी किती वर्ष आपल्या हक्कांसाठी लढत राहायचे ?असे अनेक प्रश्न ह्या एका प्रकरणामुळे समोर आले. ह्या आंदोलनांमध्ये अनेक सामाजिक संघटना सहभागी झाल्या, तसेच शाळा-कॉलेजमधील मुलांनीही निरनिराळ्या प्रकारे आंदोलने केली. पण फक्त एवढेच करून त्या पिडीत मुलीला न्याय मिळेल का ? ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे सध्या प्रत्येकजण वेगवेगळ्या दृष्टीकोनातून मांडत आहेत.