खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Monday, September 05, 2016

उद्योजक - Entrepreneur - Startup

उद्योजक,

उद्योजक म्हणजे काय ? एका वाक्यात सांगायचे झाले तर काहीतरी नवीन निर्माण करू इच्छिणारा ! काहीतरी नवीन निर्माण करण्याची उमेद असलेला ! आणि काहीतरी नवीन निर्माण केलेला ! असा तो "उद्योजक ". आता एवढे  लक्षात आले की नवीन निर्मिती करणारा तो उद्योजक.

सध्या उद्योजकतेकडे वळणारी असंख्य तरुण मंडळी आपल्याला पाहावयास मिळते. अर्थात तारुण्यात तो जोश आणि उमेद असतेच. पण अश्या तरुणांना ती उमेद कायम स्वरूपी टिकवून ठेऊन चिकाटीने आणि सातत्याने हाती घेतलेल्या नवीन आणि स्वतः निर्माण करण्याच्या ध्येयापर्यंत पोहोचता यावे म्हणून सतत सकारात्मक विचार करणे आणि नकारात्मक परिस्थितीवर मात करण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागते.