खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Thursday, January 26, 2012

अपडेट पासवर्ड.

                                                    संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)

                                                   आपण आजपर्यंत Kultejas...!!! या ब्लॉगवर संगणकाशी दोस्ती(Friendship with Computer) या सदरामधून संगणक कसा हाताळावा ह्याबद्दल काही लेख पाहिले.आज आपण इंटरनेट वापरत असताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे ह्याविषयी काही महत्वाची माहिती घेणार आहोत.  
फायरफॉक्स
                                                  आज आपण पाहणार आहोत फायरफॉक्स वेब ब्राउजर मधील पासवर्ड अपडेट कसा करायचा. फायरफॉक्समध्ये  ज्याप्रमाणे पासवर्ड सेव्ह होतो त्याचप्रमाणे तो अपडेटही होतो. म्हणजे जर तुम्ही तुमच्या संगणकावरील फायरफॉक्समध्ये काही ईमेल आयाडींचे पासवर्ड सेव्ह केलेले असतील आणि नंतर जर तुम्ही त्यातील काहींचे पासवर्ड सुरक्षेसाठी बदलले तर त्यानंतर लॉग इन करताना वरील बाजूस 'अपडेट पासवर्ड' अशी विचारणा करणारी पट्टी येते.त्यातील 'अपडेट पासवर्ड' वर क्लिक करा. त्यामुळे तुमचा आधीचा पासवर्ड पुसला जाऊन त्याठिकाणी अपोआप नवीन पासवर्ड सेव्ह होतो. आता तुम्ही पूर्वी प्रमाणे आयडी टाईप केलात की खालील बाजूस नवीन पासवर्ड येईल आणि तुमचे आकौंट ओपन होईल. फायरफॉक्सचे हे आयडी सेव्ह करायचे प्रयोग शक्यतो आपल्याच संगणकावर करा. सायबर कॅफेमध्ये गेल्यास तिथे फायरफॉक्समधून मेल आयडी ओपन केल्यास वरील बाजूस रिमेंबर, नॉट नाऊ, नेव्हर रिमेंबर, अशी विचारणा करणारी पट्टी येते. अशा वेळी तिथे नेव्हर रिमेंबरवर क्लिक करा. चुकून रिमेंबरवर क्लिक केल्यास तो आयडी आणि पासवर्ड त्या संगणकावर कायमचा सेव्ह राहील.



0 टिप्पणी पोस्ट करा:

Post a Comment