खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Monday, September 05, 2016

उद्योजक - Entrepreneur - Startup

उद्योजक,

उद्योजक म्हणजे काय ? एका वाक्यात सांगायचे झाले तर काहीतरी नवीन निर्माण करू इच्छिणारा ! काहीतरी नवीन निर्माण करण्याची उमेद असलेला ! आणि काहीतरी नवीन निर्माण केलेला ! असा तो "उद्योजक ". आता एवढे  लक्षात आले की नवीन निर्मिती करणारा तो उद्योजक.

सध्या उद्योजकतेकडे वळणारी असंख्य तरुण मंडळी आपल्याला पाहावयास मिळते. अर्थात तारुण्यात तो जोश आणि उमेद असतेच. पण अश्या तरुणांना ती उमेद कायम स्वरूपी टिकवून ठेऊन चिकाटीने आणि सातत्याने हाती घेतलेल्या नवीन आणि स्वतः निर्माण करण्याच्या ध्येयापर्यंत पोहोचता यावे म्हणून सतत सकारात्मक विचार करणे आणि नकारात्मक परिस्थितीवर मात करण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागते.

उद्योजकता कशी निर्माण होते ?
ह्याचे मोजमाप करायचे झाले तर सर्वात पहिले माप म्हणजे वारसा हक्काने पिढीजात चालत आलेला व्यवसाय पुढे चालविणे हा एक साधा आणि सोपा प्रकार आजपर्यंत आपण पाहिला असेल. ज्यामध्ये अश्या उद्योजकांना पिढिजातच बाळकडू मिळत असते आणि तरीही त्या व्यवसायात काहीतरी नवीन नवीन प्रयोग केले जातात तेंव्हा उद्योजकता वाढीस लागते.

उद्योजकतेचे दुसरे मोजमाप असे करता येईल. नोकऱ्यांचा अभाव किंवा तरुणपिढीच्या मते recession च्या जगात बरेच दिवस नोकरीच्या  शोधात असूनही योग्य नोकरी न मिळाल्यामुळे नैराश्येतून का होईना पण आपल्याला सूट होईल असा आणि पालकांनी प्रचंड विरोध करून सुद्धा सुरु केलेला व्यापार किंवा धंदा म्हणजे अनावधानाने किंवा नाईलाजाने देखील अनेक उद्योजक घडतात ह्याचे कारण म्हणजे त्यांच्या मनात असलेली unemployment विषयीची चीड जसे " If Opportunity Doesn't Knock, Build A Door".

तसेच उद्योजकतेचे तिसरे मोजमाप असे करता येईल. काही व्यक्ती असतात ज्या लहानपणापासूनच ठरवून ठेवतात की, मी कधीही कोणाची चाकरी करणार नाही किंवा कोणाच्या म्हणण्यानुसार आणि दुसरा सांगेल तसेच वागणार नाही अर्थात नोकरी करणार नाही.

तर हे असे मूळ तीन प्रकारचे उद्योजक असू शकतात, ह्या व्यतिरिक्त काही प्रकार आढळून आले तर नक्की कमेंट करा :-)

असो, उद्योजकता वाढीची सध्याची गरज ही खूप मोठ्याप्रमाणामध्ये आहे आणि अर्थात उद्योजक वाढीचे प्रमाण देखील मागील दोन ते तीन वर्षांमध्ये वाढलेले आहे ही एक समाधानकारक गोष्ट आहे. उद्योजक का वाढले पाहिजेत ? ह्याबद्दल कोणी काही सांगू शकेल का ? तर आपण हेच पाहणार आहोत आता मी मूळ मुद्द्याकडे येतो ... जर एक उद्योजक निर्माण होत असेल तर काय काय घडते ते आपण पाहू.

सर्वप्रथम एक विचार जो Concept म्हणून जन्माला येतो तेंव्हा ती फक्त एक Concept न राहू देता ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी केली जाणारी धडपड आणि ही धडपड करत असताना हे काम एका व्यक्तीचे नसून त्यासाठी अजून काही व्यक्तींची अर्थात skilled persons ची गरज लागणार आहे हे लक्षात घेऊन तसा रोजगार निर्माण करतो तो उद्योजक.

एक उद्योजक असंख्य रोजगार निर्माण करू शकतो. उद्योजक होण्यासाठी सर्वात महत्वाचे असते चौकटीबाहेरचा एक विचार ! आणि स्वतःवर असलेला विश्वास ! उद्योजक व्हायचे असेल तर एक सारासार विचार करा, समाजामध्ये आजूबाजूला फिरत असताना असंख्य त्रुटी लक्षात येत असतील अशावेळी त्या लिहून ठेवत चला आणि त्यावर विचार करा, जर तुम्ही उच्च शिक्षित असाल तर अधिकाधिक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून काही नाविण्यपूर्ण करता येईल का ह्याचा विचार करा तुम्हाला नक्की अनेक मार्ग सापडतील. आणि मिळतील अनेक concepts मग त्यावर थोडा अभ्यास करून ते कसे प्रत्यक्षात उतरविता येईल ह्याकडे वाटचाल करा. त्यासाठी लागणारे budget निश्चित करा. शक्य असल्यास स्वतःकडील काही रक्कम आणि कमी पडत असल्यास सुरवातीला Financier ची मदत घ्या आणि घेतलेली रक्कम वेळेत परत करण्याचा प्रयत्न करा.  Continue........

लेख आवडल्यास नावासहित share करा.  Like आणि कमेंट करा.  लेखक :  ©Kultejas 



0 टिप्पणी पोस्ट करा:

Post a Comment