MLM (Multi Level Marketing) - उद्योगातील एक सर्वात मोठा अडथळा.
होय ! MLM म्हणजेच मल्टी लेवल मार्केटिंग हा उद्योगातील एक महत्वाचा अडथळा मानावा लागेल ह्याची कारणे आपण सविस्तरपणे पुढे पाहूच, परंतु उद्योजक ह्या माझ्या मागील लेखामध्ये सांगितल्याप्रमाणे उद्योजकतेचे महत्वाचे तीन प्रकार आपण पहिले. त्यातील दुसरा प्रकार होता तो म्हणजे तरुण मंडळींना नोकरी विषयी तिरस्कार वाटू लागतो आणि नाईलाजाने का होईना पण ते उद्योग धंद्याकडे वळतात तर अशाच मंडळींना महत्वाची गरज असते ती म्हणजे योग्य मार्गदर्शनाची, आणि ह्या मार्गदर्शनामधीलच आजचा विषय आहे तो म्हणजे MLM एक अडथळा.
आजपर्यंत प्रत्येकाने MLM हा शब्द ऐकला असेल अगदी ग्रामीण भागापर्यंत देखील असे अनेक लोक आहेत जे multi chain marketing, direct sell, multi level marketing इत्यादी मोठमोठ्या मार्केटिंगचे शब्द उच्चारून लोकांना भुरळ घालून अशा कंपन्यांचे एजंट निर्माण करतात. मोठमोठया हॉटेल मध्ये सेमिनार होतात. आणि सामान्य माणसाला भुरळ घालून अशा कोणत्यातरी प्रोडक्टचा एजंट बनविला जातो. बरं त्याआधी एक सूचना MLM बद्दल हे माझे वयक्तिक अनुभवातून आलेले मत आहे. ह्याचा कोणत्याही कंपनी अथवा संस्थेशी दूरान्वयी संबंध नाही.
तर असे सेमिनार आणि सामान्य व्यक्तींना अश्या मोठमोठ्या इन्कम बद्दल आमिषे दाखविली जातात. आणि थोडासा इमोशनल टच. हा एक सर्वात मोठा धोका नवीन उद्योगात येऊ पाहणाऱ्या तरुणाला निर्माण होत आहे. ह्याचे कारण नवीन उद्योग सुरु करत असताना MLM सारख्या कंपनीची एजंटगिरी करणारा आपलाच कोणीतरी नातेवाईक आपल्याला प्रथम भेटतो; आणि त्याची वाक्य असतात; अरे ! कुठे उद्योगधंदा सुरु करतोस? त्याला भांडवल किती लागणार ? आणि त्यातून लगेच काय इन्कम मिळणार ? सेट होण्यातच आयुष्य जाईल. त्यापेक्षा एक मस्त business opportunity आहे आणि जास्ती गुंतवणूक सुद्धा नाही. फक्त एक कोणतेही प्रॉडक्ट खरेदी कर आणि एजेंट हो ! आणि हे सगळे प्रॉडक्ट हळूहळू घरी वापरायचे आणि नंतर मित्रांना वापरायला लावायचे. अशाप्रकारे तू तुझ्या अनेक मित्रांना ह्यामध्ये business देऊ शकतो आणि तुलाही महिना unlimited कमीतकमी एक लाख रुपये मिळू शकतील.
मित्रानो, हेच ऐकायला मिळते सध्या, आपली कधीही आठवण नसलेला आपलाच एखादा मित्र किंवा नातेवाईक अचानक आपला नंबर कोणाकडून तरी घेऊन आपल्याला फोन करून विचारपूस करतो आणि तुला बरेच दिवस भेटलो नाही म्हणून भेटायचे आहे असे सांगतो. अशावेळी नक्की ओळखावे काहीतरी गडबड आहे आपल्याला साधारण अंदाज येतो आणि १००% खात्री पटते की ह्या भेटण्यामागे ह्याचा काहीतरी स्वार्थ आहे तो म्हणजे हाच MLM एका business opportunity चा. आता आपल्याला लक्षात येईल की MLM चा उद्योजक निर्माण होण्यासाठी अडथळा कसा ? तर आपण आता मूळ मुद्द्यावर येऊ.
एखादा तरुण स्वतःचे काहीतरी ध्येय निश्चित करण्याच्या मार्गावर असताना त्याला एकतर नोकरी न करण्याचा त्याग करावा लागतो किंवा केलेला असतो त्यातच कोणता उद्योग करावा आणि त्यासाठी लागणारे भांडवल ओळखी निर्माण करणे ही सगळी तारेवरची कसरत आणि ह्यातच जर कोणी खूप पैसे कमावशील असे अमिश दाखवून अशा chain मार्केटिंग सारख्या चुकीचा मार्ग (हो चुकीचाच मार्ग ह्याची अनेक कारणे आहेत आपण पुढे ती बघू ) जर सापडला तर त्यातच त्या तरुणाची २-३ वर्ष अक्षरशः वाया जातात. कारण जर तुम्ही अश्या कंपनीचे एकदा एजंट म्हणून काम करायला लागलात तर काय घडते ते मुद्द्यानुसार पडताळून पाहू.
१. समाजातील किंमत कमी करून घेता कारण कोणालाही तुम्ही भेटायला जाणार असाल तर ते तुमच्यापासून लांब जायचा प्रयत्न करतात म्हणजेच तुम्हाला टाळतात कारण तुम्ही तुमचे प्रॉडक्ट किंवा कोणतीही सेवा त्या व्यक्तीला घेण्यास सारखे सारखे प्रवृत्त करता.
२. तहानभूक हरपून स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून लांब लांबचे मित्र शोधून काढून त्यांना भेटायला जाता आणि ते सुद्धा कोणतेतरी तुमचे प्रॉडक्ट त्याने घ्यावे आणि त्यानेसुद्धा एजंट व्हावे म्हणून.
३. तुम्ही जे टार्गेट कधीही अचिव्ह करू शकत नाही अशा टार्गेटच्या मागे धावत राहता.
४. फक्त एक ते दोनच वर्ष काम करायचे आहे आणि मग काय रॉयल्टी, अवॉर्ड्स, फोर व्हीलर , मर्सिडीज , फॉरेन ट्रिप असे सगळे फुकट मिळेल अशा मोठ्या भ्रमात राहता.
५. स्वतःच्या संकल्पना आणि स्वतःच्या व्यवसायाबद्दलची स्वप्न अक्षरशः धुळीस मिळतात, कारण MLM मध्ये फक्त सुरुवातीला Join झालेले लोकच अमाप श्रीमंत होतात आणि आपण त्यामध्ये कुठेच नसतो.
६. २-३ वर्षानंतर ह्या कंपन्या जवळ जवळ बंद होण्याच्या मार्गावर असतात कारण सर्रास सगळ्या लोकांना ह्याबद्दल संपूर्ण माहिती आणि कल्पना असतेच आणि उरलेले लोक ह्यामध्ये इच्छुक नसतात.
७. मार्केटिंगचे काम प्रत्येकाला जमेलच असे नाही.
म्हणूनच MLM ही एक मार्केटिंग ची पद्धत आहे, जी परदेशात खूप उत्तमप्रकारे चालते आणि अनेक वर्ष अशाच पद्धतीने परदेशात प्रॉडक्ट खपविले जातात. परंतु भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रात तितकीशी का नाही चालत ? तर ह्याचे एकमेव कारण असे की महाराष्ट्रीयन माणसाची असलेली प्रवृत्ती, तुम्ही म्हणाल ती कशी काय ? तर मराठी माणसाला आपल्यामुळे कोणाला फायदा झालेला तितकासा बघवत नाही आणि त्यामुळे कोणीही एजेंट आपल्याकडे आला कि आपण पहिला प्रश्न विचारतो मी जर हे प्रॉडक्ट तुझ्याकडून घेतले तर तुला किती फायदा मिळणार ? अशा एकंदरीत प्रवृत्ती आणि वातावरणामुळे ह्या अशा MLM किंवा एजंट होण्यापासून लांब राहणेच सोयीचे ठरते.
मी तर याहूनही पुढे सांगेन जर MLM च करायचे असेल तर स्वतःची अशीच एखादी MLM कंपनी सुरु करा स्वतःच्या हिमतीवर ह्यामध्ये कंपनीचा सर्वात मोठा फायदा होत असतो. धन्यवाद !
हा लेख नवीन उद्योगात येणाऱ्या तरुणांसाठी नक्की Share करा Like करा आणि Comments करा. अथवा तुमचे अभिप्राय कळविण्यासाठी लेखकाशी संपर्क साधा WhatsApp no. 7507958581 लेखक : ©Kultejas

0 टिप्पणी पोस्ट करा:
Post a Comment