खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Sunday, March 29, 2020

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?



        मित्रांनो, अनेक दिवस मी Kultejas ह्या माझ्या ब्लॉग वर कोणताही नवीन लेख लिहिला नाही याचे कारण, मी इतर अनेक ब्लॉग वर सध्या काम करत आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्याबद्दल मी तुम्हाला सांगेनच. असो, हा  ब्लॉग खरंतर खुप मर्यादित झाला आहे उदा. मराठी कॅलेंडर, राशी भविष्य अश्या विषयांसाठी फक्त हा ब्लॉग नसून यावरून मी नवनवीन टेकनॉलॉजि विषयी माहिती देण्यासाठी देखील ह्या ब्लॉगची सुरुवात केली होती. तर अशाच नवीन टेकनॉलॉजि आणि काही महत्वाच्या टिप्स मी या माध्यमामधून देत असतो. म्हणूनच इथून पुढे अगदी महत्वाचे आणि प्रत्येक व्यक्तीला, उद्योजकाला, व्यवसायाला उपयोगी असे "डिजिटल मार्केटिंग" या विषयावर अनेक लेख येणार आहेत. या लेखांमधून आपण डिजिटल मार्केटिंग विषयी माहिती घेऊ शकता. तसेच काहीही प्रश्न असल्यास कंमेंट मध्ये विचारू शकता.

आपण ह्या पोस्टचा विषय वाचला असेलच, डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ? त्याआधी आपण समजून घेऊ मार्केटिंग म्हणजे काय ? 

मार्केटिंग म्हणजे काय ? 

 मार्केटिंग म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, आपण कोणतीही गोष्ट किंवा वस्तू किंवा घटना जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचेल ह्यासाठी जे काही करतो त्याला म्हणतात मार्केटिंग. म्हणजेच आपण जर कोणत्याही एका व्यवसायाविषयी विचार करत असू तर, त्या व्यवसायामध्ये जे कोणतेही उत्पादन आहे; ते तयार केल्यापासून ग्राहकाच्या हातात मिळावे किंबहुना जास्तीत जास्त ग्राहकांना मिळावे याकरिता केली जाणारी जाहिरात हा संपूर्ण भाग मार्केटिंग मध्ये येतो.

आजवर अनेक पारंपरिक पद्धतीने प्रत्येक व्यावसायिक त्याच्या उत्पादनाची जाहिरात अथवा मार्केटिंग करत आला आहे किंबहुना अजूनही करत आहे, जसे की वर्तमान पात्रातून जाहिरात करणे, वर्तमानपत्रामधून पॅम्प्लेट देणे किंवा वाटणे, होर्डिंग मधून जाहिरात करणे अगदी टेलिव्हीजन वरून जाहिरात करणे. हे सर्व पारंपरिक स्रोत आहेत आणि सध्याच्या काळामध्ये खर्चिक देखील

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?

            आत्ता आपण पाहिलं त्याप्रमाणे आजवर सगळेच उद्योग पारंपरिक पद्धतीने मार्केटिंग करत आले आहेत. तर आता आपण पाहू डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?

आपल्या उत्पादनाची जाहिरात डिजिटली करणे म्हणजे डिजिटल मार्केटिंग म्हणायचे का ? तर, बरोबर पण डिजिटली म्हणजे काय ? डिजिटली जाहिरात करणे म्हणजे सध्या आपणासर्वांकडे एक इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे, ते म्हणजे मोबाईल! कदाचित हा लेख तुम्ही मोबाइलमध्येच वाचत असाल. तर ह्या अश्या मोबाईल वर आपण रोज अनेक गोष्टी पाहत असता. सगळ्यात जास्ती वापर कदाचित व्हाट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर इत्यादींचा  होत असेल. याव्यतिरिक्त आपण आपल्या मोबाईल वर कोणते अँप्स जास्ती वापरता हे कंमेंट मध्ये कळवा.

या आणि अशाच अनेक सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यवसायाची जाहिरात लोकांपर्यंत पोहचविणे म्हणजेच  डिजिटल मार्केटिंग. आता ह्या डिजिटल मार्केटिंग मध्ये कोणकोणती माध्यमे येतात ज्यामार्फत आपण आपल्या उत्पादनाची जाहिरात करू शकता.

डिजिटल माध्यमे खालील प्रमाणे:

      १. फेसबुक
      २. व्हाट्सअँप
      ३. इन्स्टाग्राम
      ४. ट्विटर
      ५. लिंक्डइन
      ६. गुगल
      ७. पिंटरेस्ट
      ८. टिकटॉक
      ९. स्वतःची वेबसाईट. 


 या भागामध्ये आपण केवळ डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? हे पहिले, पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत:


  • डिजिटल मार्केटिंग मध्ये कोणकोणत्या माध्यमांचा समावेश होतो ?
  • डिजिटल मार्केटिंगची गरज कुठपर्यंत ?
  • डिजिटल मार्केटिंगचं का ?
  • डिजिटल मार्केटिंगचे कोण कोणते पर्याय उपलब्ध आहेत ?
  • कोण कोणते उद्योग डिजिटल मार्केटिंग करू शकतात ?
  • कोणत्या उद्योगांसाठी डिजिटल मार्केटिंग सर्वोत्तम पर्याय आहे ?
  • डिजिटल मार्केटिंग केल्याने खरंच उद्योग - व्यवसायात विक्रीमध्ये फायदा होतो का ?
  • डिजिटल मार्केटिंग कोणी करावे ?
  • अशा कोणत्या संस्था आहेत ज्या आपल्या व्यवसायाचे डिजिटल मार्केटिंग करून देतील ?
  • डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी कोणते ज्ञान आवश्यक आहे ?
  •  सोशल मिडिया ऑप्टिमायजेशन, आणि सर्च इंजिन ऑप्टिमायजेशन (SEO) म्हणजे काय ?

या आणि अश्या अनेक विषयांवर पुढील लेख येणार आहेत, तरी आपण या विषयांवर कोणतेही प्रश्न असल्यास नक्की कंमेंट करा.

खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.






0 टिप्पणी पोस्ट करा:

Post a Comment