डिजिटल मार्केटिंग मध्ये कोणकोणत्या माध्यमांचा समावेश होतो ?
- भाग १
आपण या आधीच्या भागामध्ये डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ? हे पाहिले. या भागात पाहणार आहोत डिजिटल मार्केटिंग मध्ये कोणकोणत्या माध्यमांचा समावेश होतो. जर तुम्ही आधीचा लेख वाचला नसेल तर "डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?" या लिंक वर क्लिक करून तो लेख पूर्ण वाचा.
तर, आता आपण पाहूया डिजिटल मार्केटिंग मध्ये कोणकोणत्या माध्यमांचा समावेश होतो ? सर्वसाधारणपणे आधीच्या लेखामध्ये सांगितल्या प्रमाणे जगामध्ये अनेक डिजिटल मिडिया प्रसिद्ध आहेत.
त्यापैकी भारतामध्ये जास्ती वापर होणारी डिजिटल माध्यमे खालील प्रमाणे:
१. फेसबुक
२. इंस्टाग्राम
३. व्हॉट्सअँप
४. ट्विटर
५. लिंक्डइन
६. गुगल
७. पिंटरेस्ट
८. टिकटॉक
९. स्वतःची वेबसाईट किंवा ब्लॉग.
या सर्व माध्यमांमध्ये आपण विचार करत असाल की, पहिली ८ माध्यमे माहिती आहेत पण स्वतःची वेबसाईट हे कसे डिजिटल माध्यम? तर आपण पाहुयात या सर्व माध्यमांचे महत्व आणि सकारात्मक उपयोग.
१. फेसबुक
२. इंस्टाग्राम
३. व्हॉट्सअँप
व्हॉट्सअँप विषयी मी अधिक काय सांगणार आपणच अनेक नवीन गोष्टी मला सांगू शकता, कारण व्हॉट्सअँप हा आपल्या जीवनाचा अतिशय आवश्यक भाग बनला आहे त्याचे कारण असे काही वर्षांपूर्वी लोक मोबाईल वरून टेक्स्ट मेसेज पाठवत असत त्याची जागा व्हॉट्सअँपने घेतली आणि हळूहळू अनेक गोष्टी नवीन त्यामध्ये समाविष्ट होत राहिल्या. जसे की, स्टोरी, स्टेटस आणि व्यावसायिकांसाठी तर चक्क "बिजनेस व्हॉट्सअँप"!
"बिजनेस व्हॉट्सअँप" ही संकल्पनाच किती भन्नाट आहे, ज्यामधील अनेक असे फिचर्स व्यवसायासाठी उपयोगी आहेत, जे आपणास आपल्या ग्राहकाचे, जवळच्या व्यक्तीचे आणि इतर असे हवे तसे वर्गीकरण करता येते. अशी असंख्य फिचर्स व्हॉट्सअँप मध्ये पाहावयास मिळतात. या आणि अश्याच व्यवसायासाठी उपयोगी फिचर्स चा आढावा आपण येणाऱ्या पुढील भागांमध्ये घेणार आहोत.
या भागामध्ये आपण केवळ ३ डिजिटल माध्यमे पहिली उर्वरित माध्यमे पुढील भागांमध्ये पाहू तसेच, पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत:

निःसंशयपणे आपण सांगू शकतो की, फेसबुक हा जगभरातील प्रथम क्रमांकाचा प्लॅटफॉर्म आहे जेथे आपण शेअर करू शकता, विक्री करू शकता आणि आपल्याला पाहिजे असलेल्या गोष्टी खरेदी करू शकता. इतर असंख्य सोशल मीडिया प्रचलित आहेतच परंतु फेसबुकने आपलं वैशिष्ठ्य, वेगळेपण कायम ठेवले आहे. फेसबुक विषयी अधिक माहिती जसे की,
- फेसबुक वरून व्यवसाय कसा वाढवावा ?
- कोणत्या व्यवसायांसाठी फेसबुक चा अत्यंत चांगला उपयोग होतो ?
- कोणत्या प्रकारच्या जाहिराती आपण रन करून जास्तीत जास्त ग्राहक मिळविता येतील ?
- कशा प्रकारचे बॅनर किंवा डिजाईन करून आपणास जास्ती लोकांपर्यंत पोहोचता येईल?
२. इंस्टाग्राम
आपल्या प्रसिद्धीसाठी आवश्यक असलेल्या फोटों विषयी सर्व व्यवसायांसाठी सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया म्हणजे इंस्टाग्राम. म्हणूनच खरेदी-विक्री, हॉटेल्स, इंटेरिअयर डिझाइनर, रियल इस्टेट आणि इतर फॅशन, मनोरंजन संबंधित व्यवसायांसाठी सर्वोत्तम डिजिटल माध्यम आहे. यामध्ये हॅशटॅग या सर्वोत्तम प्रणालीवर हे माध्यम चालते. आणि आता यामध्येच शॉर्ट व्हिडीओ चा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे व्यावसायिकांसाठी उत्तम असे हे माध्यम आहे. इंस्टाग्राम विषयी अधिक माहिती येणाऱ्या भागांमध्ये आपण पाहू.
३. व्हॉट्सअँप
व्हॉट्सअँप विषयी मी अधिक काय सांगणार आपणच अनेक नवीन गोष्टी मला सांगू शकता, कारण व्हॉट्सअँप हा आपल्या जीवनाचा अतिशय आवश्यक भाग बनला आहे त्याचे कारण असे काही वर्षांपूर्वी लोक मोबाईल वरून टेक्स्ट मेसेज पाठवत असत त्याची जागा व्हॉट्सअँपने घेतली आणि हळूहळू अनेक गोष्टी नवीन त्यामध्ये समाविष्ट होत राहिल्या. जसे की, स्टोरी, स्टेटस आणि व्यावसायिकांसाठी तर चक्क "बिजनेस व्हॉट्सअँप"!
"बिजनेस व्हॉट्सअँप" ही संकल्पनाच किती भन्नाट आहे, ज्यामधील अनेक असे फिचर्स व्यवसायासाठी उपयोगी आहेत, जे आपणास आपल्या ग्राहकाचे, जवळच्या व्यक्तीचे आणि इतर असे हवे तसे वर्गीकरण करता येते. अशी असंख्य फिचर्स व्हॉट्सअँप मध्ये पाहावयास मिळतात. या आणि अश्याच व्यवसायासाठी उपयोगी फिचर्स चा आढावा आपण येणाऱ्या पुढील भागांमध्ये घेणार आहोत.
या भागामध्ये आपण केवळ ३ डिजिटल माध्यमे पहिली उर्वरित माध्यमे पुढील भागांमध्ये पाहू तसेच, पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत:
- डिजिटल मार्केटिंगची गरज कुठपर्यंत ?
- डिजिटल मार्केटिंगचं का ?
- डिजिटल मार्केटिंगचे कोण कोणते पर्याय उपलब्ध आहेत ?
- कोण कोणते उद्योग डिजिटल मार्केटिंग करू शकतात ?
- कोणत्या उद्योगांसाठी डिजिटल मार्केटिंग सर्वोत्तम पर्याय आहे ?
- डिजिटल मार्केटिंग केल्याने खरंच उद्योग - व्यवसायात विक्रीमध्ये फायदा होतो का ?
- डिजिटल मार्केटिंग कोणी करावे ?
- अशा कोणत्या संस्था आहेत ज्या आपल्या व्यवसायाचे डिजिटल मार्केटिंग करून देतील ?
- डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी कोणते ज्ञान आवश्यक आहे ?
- सोशल मिडिया ऑप्टिमायजेशन, आणि सर्च इंजिन ऑप्टिमायजेशन (SEO) म्हणजे काय ?
मित्रांनो, या लेखांच्या माध्यमातून मी आपणाला ज्ञात असलेली माहिती तसेच खूप खोलवर जाऊन कोणत्याही डिजिटल माध्यमाचा व्यवसायासाठी कसा उपयोग करता येईल हे सविस्तर सांगणार आहे. इथून पुढे दररोज एक याप्रमाणे डिजिटल मार्केटिंग विषयी लेख आपणास वाचता येणार आहेत, तरी आपणास कोणतेही प्रश्न असल्यास कंमेंट मध्ये विचारा. धन्यवाद !
0 टिप्पणी पोस्ट करा:
Post a Comment