खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Wednesday, April 01, 2020

डिजिटल मार्केटिंग मध्ये कोणकोणत्या माध्यमांचा समावेश होतो? - भाग ३

डिजिटल मार्केटिंग मध्ये कोणकोणत्या माध्यमांचा समावेश होतो? - भाग ३

   पण या आधीच्या भागामध्ये  डिजिटल मार्केटिंग मध्ये कोणकोणत्या माध्यमांचा समावेश होतो ?  - भाग १  व  भाग - २ पाहिले. आता या भागात आपण पाहणार आहोत उर्वरित डिजिटल मार्केटिंग माध्यमांविषयी. जर तुम्ही आधीचे लेख वाचले नसतील तर डिजिटल मार्केटिंग  या लिंक वर क्लिक करून आधीचे सर्व लेख पूर्ण वाचा.

               तर, आता आपण पाहूया उर्वरित डिजिटल मार्केटिंग माध्यमांविषयी.  आपण या आधीच्या लेखांमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअँप, ट्विटर, लिंक्डइन आणि गुगल या माध्यमांविषयी माहिती घेतली. आज आपण पाहणार आहोत

      ७. पिंटरेस्ट
      ८. टिकटॉक
      ९. स्वतःची वेबसाईट. 
     
या तीन माध्यमांविषयी आपण पाहणार आहोत त्यांचे महत्व आणि सकारात्मक उपयोग.

७. पिंटरेस्ट

                व्यवसायासाठी किंवा इतर सोशल माध्यमांवर लिखाणासाठी अत्यंत ताजा कन्टेन्ट किंवा बातम्यांची आवश्यकता असते. असा अत्यंत ताजा कन्टेन्ट आपल्याला पिंटरेस्ट वर अगदी सहजपणे सापडतो. आणि अगदी व्यवस्थितपणे एकाच ठिकाणी तो साठवता देखील येतो. ह्याचे आपण एक उदाहरण पाहू, समजा तुम्हाला इंटेरिअरची खूप आवड आहे किंवा काही कामासाठी इंटेरिअर डिझाईनचे फोटोज तुम्हाला हवे आहेत तर, आपण सर्वात आधी गूगल वर शोध घ्याल बरोबर, आणि हा शोध घेतल्यानंतर तेच फोटो एक एक करून आपल्या संगणकावर डाउनलोड कराल यामध्ये आपण खूप वैतागून जाता. बराच वेळ यामध्ये लागू शकतो. हेच काम अगदी सहजपणे पिंटरेस्ट वर शक्य होते. एकाच प्रकारातील फोटो किंवा व्हिडिओ आपल्याला खूप लवकर शोधता येतात त्याला पिन असे म्हणतात आणि ते पिन्स जिथे सेव्ह करतात त्याला बोर्ड असे म्हणतात ज्यामध्ये आपण ते फोटो सेव्ह करू शकता. आपण एकदा पिंटरेस्ट वर अशाच प्रकारे कोणताही शोध घेऊन पहा.
            आता लक्षात आले असेल की पिंटरेस्ट चा वापर कसा होतो ते, म्हणजेच याचा अर्थ असाही आहे की, आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात आकर्षक फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून करणार असू तर पिंटरेस्ट वर आपणास असंख्य ग्राहक मिळू शकतात. पिंटरेस्ट चा व्यावसायिक उपयोग आपण सविस्तर पुढील भागांमध्ये पाहू. 

८. टिकटॉक 

             टिकटॉक ने जवळ जवळ सगळ्या तरुणाईला वेड लावलंय, अनेकवेळा टिकटॉक बॅन देखील करण्यात आले त्यावर बरेच निर्बंध घालण्यात आले पण, एवढ्या गोष्टी घडून देखील ह्यावर तरुणाई अक्षरशः उड्या मारते. हो खरंच वेड्यावाकड्या आणि कश्याही असल्यातरी अनेक नवोदित कलाकारांसाठी हे एक व्यासपीठ बनले आहे. असो आपण पाहू टिकटॉक ची वैशिष्ठे:
           सर्वात महत्वाचं टिकटॉक हे एक अँप आहे ज्यामध्ये केवळ ६० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी सेकंदाचा व्हिडिओ करता येतो, ज्यामध्ये आपण स्वतःच्या आवाजात, दुसऱ्याच्या आवाजात रेकॉर्ड केलेल्या क्लिपचा वापर करून किंवा कोणत्याही गाण्यावर नृत्य, अभिनय किंवा हावभाव करू शकतो. असे हे मजेशीर अँप आपल्याला अगदी कमी वेळामध्ये व्हिडीओ कसा तयार होईल हे अगदी काही क्लिक मध्ये शिकण्याची मुभा देते. अशा ह्या अँप मध्ये देखील आपणास व्यवसाय वाढविण्याच्या अनेक संधी आहेत, त्या म्हणजे स्वतःच्या व्यवसायाविषयी सांगणारा ६० सेकंदापर्यंतचा व्हिडीओ आपण टिकटॉक वर अपलोड करू शकता. खूप कमी वेळात जास्ती लोकांपर्यंत पोहोचता येते.

 ९. स्वतःची वेबसाईट किंवा ब्लॉग

                आपण आत्तापर्यंत काही महत्वाची सोशल माध्यमे पहिली जिथे आपण अगदी सहजपणे आपले स्वतःचे खाते काढून या सर्व माध्यमांच्या फिचर्सचा हवा तसा वापर करू शकता. तसेच स्वतःची वेबसाईट हा एक तुमचा स्वतःच्या घराचा जसा पत्ता असतो तसाच आणि आपले घर जसे असते तसेच जगाच्या सतत संपर्कात राहण्यासाठी असलेले एक माध्यम आहे. म्हणजेच थोडक्यात काय आपण आपल्या विषयी चांगल्यात चांगल्या माहितीने, निरनिराळ्या फोटोनी आणि हव्या त्या आकर्षक रंग छटांनी आपण आपली वेबसाईट बनवू शकता. जी वेबसाईट आपली एक ऑनलाईन ओळख बनून जाते. आता या वेबसाईट मध्ये किती प्रकार असतात ते पाहू. 

स्टॅटिक वेबसाईट: यामध्ये आपण आपल्याकडे असलेली माहिती एकाच वेळी संकलन करून डिझाइनरला देता आणि त्याची वेब पेजेस तयार केली जातात, ज्यामध्ये कोणताही बदल करायचा असल्यास नेहमी डिझायनरची मदत घ्यावी लागते. थोडक्यात काय स्टॅटिक म्हणजे एकदा केलेला बदल सारखा हवा तसा बदलता येत नाही. आणि त्या प्रत्येक पेज वरील दिसणारी माहिती बदलत राहणार नाही.

डायनॅमिक वेबसाईट: अशी वेबसाईट बनविण्यासाठी तुम्हाला डेव्हलपरची मदत घ्यावी लागते. परंतु आपण एकदा अश्या प्रकारातील वेबसाईट तयार केलीत तर आपण कधीही आपल्या ऍडमिन मध्ये लॉगिन करून हवे तसे बदल आपण आपल्या पद्धतीने करू शकता, यामध्ये कोणत्याही टेक्निकल ज्ञानाची गरज लागत नाही. तसेच वेबसाईट वर दिसणारी प्रत्येक माहिती सतत बदलत राहू शकते. 

              प्रामुख्याने स्टॅटिक आणि डायनॅमिक वेब पेजेस असे दोनच महत्वाचे प्रकार आहेत. ज्यामध्ये वन पेज वेबसाईट, वेब पोर्टल, ईकॉमर्स किंवा शॉपिंग वेबसाईट असे असंख्य प्रकार तयार करता येतात. व्यवसायासाठी उत्तम प्रकारे वेबसाईट बनविण्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामार्फत आपण अगदी सोप्या पद्धतीने आपण आपली वेबसाईट बनवू शकता. तसेच अनेक फर्म देखील अशाप्रकारे वेबसाईट बनविण्याचे काम करतात. अधिक माहिती हवी असल्यास कमेंट करा. किंवा इथे  संपर्क करा.

 या भागामध्ये आपण उर्वरित ३ डिजिटल माध्यमे पाहिली, येणाऱ्या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत:


  • डिजिटल मार्केटिंगची गरज कुठपर्यंत ?
  • डिजिटल मार्केटिंगच का ?
  • डिजिटल मार्केटिंगचे कोण कोणते पर्याय उपलब्ध आहेत ?
  • कोण कोणते उद्योग डिजिटल मार्केटिंग करू शकतात ?
  • कोणत्या उद्योगांसाठी डिजिटल मार्केटिंग सर्वोत्तम पर्याय आहे ?
  • डिजिटल मार्केटिंग केल्याने खरंच उद्योग - व्यवसायात विक्रीमध्ये फायदा होतो का ?
  • डिजिटल मार्केटिंग कोणी करावे ?
  • अशा कोणत्या संस्था आहेत ज्या आपल्या व्यवसायाचे डिजिटल मार्केटिंग करून देतील ?
  • डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी कोणते ज्ञान आवश्यक आहे ?
  •  सोशल मिडिया ऑप्टिमायजेशन, आणि सर्च इंजिन ऑप्टिमायजेशन (SEO) म्हणजे काय ?
           मित्रांनो, आपल्याला लेख कसे वाटत आहेत हे नक्की कंमेंट मध्ये कळवा. अधिक माहिती साठी इथे संपर्क करा. इथून पुढे दररोज एक याप्रमाणे डिजिटल मार्केटिंग विषयी लेख आपणास वाचता येणार आहेत. धन्यवाद !

खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.






0 टिप्पणी पोस्ट करा:

Post a Comment