खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Tuesday, March 31, 2020

डिजिटल मार्केटिंग मध्ये कोणकोणत्या माध्यमांचा समावेश होतो? - भाग २

डिजिटल मार्केटिंग मध्ये कोणकोणत्या माध्यमांचा समावेश होतो? - भाग २

 पण या आधीच्या भागामध्ये  डिजिटल मार्केटिंग मध्ये कोणकोणत्या माध्यमांचा समावेश होतो ?  हे पाहिले. आता या भागात आपण पाहणार आहोत उर्वरित डिजिटल मार्केटिंग माध्यमांविषयी. जर तुम्ही आधीचा लेख वाचला नसेल तर डिजिटल मार्केटिंग मध्ये कोणकोणत्या माध्यमांचा समावेश होतो ? - भाग १ या लिंक वर क्लिक करून तो लेख पूर्ण वाचा.

               तर, आता आपण पाहूया उर्वरित डिजिटल मार्केटिंग माध्यमांविषयी.  आपण या आधीच्या लेखामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअँप  विषयी माहिती घेतली. आज आपण पाहणार आहोत

      ४. ट्विटर
      ५. लिंक्डइन
      ६. गुगल
     
या तीन माध्यमांविषयी आज आपण पाहणार आहोत त्यांचे महत्व आणि सकारात्मक उपयोग.

४. ट्विटर

                 आपल्या नकळत अगदी डोळ्याची पापणी मिटून उघडे पर्यंत जर का काहीही व्हायरल व्हावं असं वाटत असेल तर ट्विटर सारखा उत्तम सोशल मिडिया नाही. अतिशय चांगले फिचर्स म्हणजे रिट्विट, टॅग आणि हॅशटॅग चा उत्तम उपयोग यामध्ये केला आहे. 
                 यामध्ये आपण जगातील कोणत्याही ट्विटर अकाउंट ला टॅग करू शकतो तसेच कोणतेही ट्विट रिट्विट करू शकतो, जे इतर कोणत्याही सोशल माध्यमांमध्ये शक्य नाही. म्हणूनच ट्विटरचे वेगळेपण नेहमी आपल्याला जाणवते ते बातम्यांमधून दाखविले जाणारे दिग्गज व्यक्तींचे ट्विट. असंख्य सरकारी संस्थांमार्फत काही महत्वाच्या घोषणा करण्यासाठी देखील ट्विटर चा वापर केला जातो म्हणूनच ट्विटर हा एक विश्वासू सोशल मिडिया आहे. 
                 ट्विटर चे अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे अतिशय कमी शब्दांमध्ये केवळ २८० अक्षरांमध्ये आपल्याला आपले विचार व्यक्त करता येणे आवश्यक आहे. कारण २८० अक्षरांपेक्षा आपल्याला जास्ती मोठे लेख जसे आपण फेसबुक वर वाचतो त्याप्रमाणे लिहिता येत नाहीत. तरीही व्यावसायिकांसाठी ट्विटर चा कसा उपयोग करून घेता येतो हे आपण पुढील लेखांमध्ये पाहू.

५. लिंक्डइन

               व्यावसायिकांसाठी सर्वोत्तम सोशल मिडिया साईट म्हणून ओळख असलेली लिंक्डइन ही व्यावसायिकांची जगातील नंबर १ ची सोशल मिडिया साईट आहे. जगातील कोणत्याही मोठ्या कंपनीच्या मॅनेजमेंट मधील कोणत्याही व्यक्तीचा संपर्क आपल्याला फक्त लिंक्डइनवर अगदी सहजपणे मिळू शकतो. लिंक्डइन चा वापर जास्ती करून B2B म्हणजेच व्यवसाय ते व्यवसाय याकरिता केला जातो. कोणत्याही इतर व्यवसायांबरोबर आपणास आपला व्यवसाय वाढविण्यासाठी लिंक्डइन हा एक उत्तम पर्याय आहे. लिंक्डइन विषयी आपण सविस्तर पाहणार आहोत. की, कोणत्या पर्यायांद्वारे आपण लिंक्डइनमधून आपला व्यवसाय वाढवू शकता. हे पुढील लेखांमध्ये पाहू. 

६. गुगल

                गुगल विषयी कोणाला माहिती नाही असा एकही इंटरनेट वापरकर्ता आपल्याला शोधूनही सापडणार नाही. पण आपण म्हणाल गुगल हे कुठे सोशल माध्यम आहे? बरोबर गुगल हे सोशल माध्यम नक्कीच नाही पण डिजिटल माध्यम नक्की आहे. 
               कारण, जगातील एक नंबरला असलेली google.com ही वेबसाईट आहे. गुगलचे असंख्य टूल आहेत, अगदी आपण रोज वापरत असलेले गुगल सर्च, जीमेल, गूगल मॅप, युट्युब, गुगल ड्राईव्ह, प्ले स्टोअर आणि व्यावसायिकांसाठी अत्यंत उपयोगी असे गूगल माय बिजनेस. आपण गूगल माय बिजनेस विषयी येणाऱ्या लेखांमध्ये सविस्तर पाहणार आहोत.

                 आत्ता आपण केवळ प्रत्येक सोशल आणि डिजिटल माध्यमांविषयी उजळणी करत आहोत. या मधील केवळ एक माध्यम घेतले तर १० लेख देखील कमी पडतील. म्हणूनच ईबुक स्वरूपामध्ये हे उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील. याविषयी आपणाला काय वाटतं ते कंमेंट मध्ये कळवा.

 या भागामध्ये आपण ३ डिजिटल माध्यमे पाहिली उर्वरित माध्यमे पुढील भागामध्ये पाहू तसेच, येणाऱ्या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत:


  • डिजिटल मार्केटिंगची गरज कुठपर्यंत ?
  • डिजिटल मार्केटिंगचं का ?
  • डिजिटल मार्केटिंगचे कोण कोणते पर्याय उपलब्ध आहेत ?
  • कोण कोणते उद्योग डिजिटल मार्केटिंग करू शकतात ?
  • कोणत्या उद्योगांसाठी डिजिटल मार्केटिंग सर्वोत्तम पर्याय आहे ?
  • डिजिटल मार्केटिंग केल्याने खरंच उद्योग - व्यवसायात विक्रीमध्ये फायदा होतो का ?
  • डिजिटल मार्केटिंग कोणी करावे ?
  • अशा कोणत्या संस्था आहेत ज्या आपल्या व्यवसायाचे डिजिटल मार्केटिंग करून देतील ?
  • डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी कोणते ज्ञान आवश्यक आहे ?
  •  सोशल मिडिया ऑप्टिमायजेशन, आणि सर्च इंजिन ऑप्टिमायजेशन (SEO) म्हणजे काय ?
           मित्रांनो, इथून पुढे दररोज एक याप्रमाणे डिजिटल मार्केटिंग विषयी लेख आपणास वाचता येणार आहेत, तरी आपणास कोणतेही प्रश्न असल्यास कंमेंट मध्ये विचारा. धन्यवाद !

खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.






0 टिप्पणी पोस्ट करा:

Post a Comment