
देशात आणि परदेशात कमावली जाणारी बेहिशेबी मालमत्ता व उत्पन्न यावर कर आकारणे, तसेच हा पैसा परदेशातून भारतात आणणे याबाबत अर्थ खात्याने अभ्यास सुरू केला आहे. पैशाच्या घोटाळ्याबाबतच्या कायद्यात केलेल्या सुधारणेमुळे या कायद्याचा आवाका वाढला आहे. या कायद्यांतर्गत २००५ ते २००८ या वर्षांत ५० केसेस दाखल झाल्या होत्या. जानेवारीपर्यंत हा आकडा १२०० झाला आहे. असे प्रकार सक्षमपणे हाताळण्यासाठी या कायद्याची अमलबजावणी करणाऱ्यांची क्षमता तिपटीने वाढवली आहे.
पैशाच्या घोटाळ्यांवर टाच आणण्यासाठी भारताने विविध जागतिक संघटनांचे सदस्यत्व घेतले आहे. दुहेरी कर आकारणी टाळणे या विषयाबाबत गेल्या वर्षभरात काही करारांवर चर्चा करण्यात
आली, तर १३ नवे करार करण्यात आले. तसेच, सध्या अस्तित्वात असलेल्या १० करारांचा आढावा घेण्यात आला. -
सौजन्य:-महाराष्ट्र टाईम्स
0 टिप्पणी पोस्ट करा:
Post a Comment