खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Thursday, May 05, 2011

इंटरनेटवर देवनागरी (मराठी) भाषेतुन कसे लिहाल?

                         संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)

                     खुप ठिकाणी अशी सोय उपलब्ध आहे.जिथे आपण आपल्या कीबोर्डच्या  सहाय्याने  इंग्लिश बटण्स्  दाबून मराठीतून  लिहितो. आणि  तो  मजकूर  कॉपी करुन  जिथे  हवा  त्या  ठिकाणी  पेस्ट  करतो. पण  जिथे  तो  मजकूर  आपण  पेस्ट  करतो  तिथेच  आपल्याला   डायरेक्ट   देवनागरी  लिपित  लिहिता  आलं  तरं!!!  जसं  मी  अत्ता ह्या  ब्लॉगवर  मराठीतून  लिहित  आहे. तशी  ब्लॉगरनेही  मराठीतून  लिहीण्याचीसोय उपलब्ध  करुन  दिली  आहे.  पण  त्यापेक्षाही खुप सोप्या पध्दतीने आपण फक्त ब्लॉगवरच नाही तर इंटरनेटवर कोठेही मराठीतून लिहू शाकतो. मी ब्लॉगरने उपलब्ध करुन दिलेली सोयही  वापरत  नाहिये  आणि  या  ब्लॉगवर डायरेक्ट मराठीतून लिहित आहे ते ‘लिपीकार’ या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने. माझ्यासारखंच तुम्हालाही जर इंटरनेटवर डायरेक्ट मराठीतून लिहायचं असेल, तर त्यासाठी प्रथम तुम्हाला हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करावं लागेल अणि ते कसं करायचं ते पुढीलप्रमाणे:-


१. लिपीकार.कॉम ह्या  वेबसाईटवर जा.
२.तिथे खालिल बाजुस लिपीकारची दोन  versions आहेत.
३.त्यामधील एक  Windows Software तर दुसरे Firefox साठी आहे.
४.Lipikaar Windows Software खालिल Download Now या option वर  click करा.
५.मग तुमचं नाव आणि E-mail देउन Download Lipikaar या बटणावर click करा.
६.त्यानंतर एक स्क्रिन दिसेल त्यामधिल आपली कोणती operating system असेल त्यापुढील बटणावर click करा.
७.सेव केलेली फाइल इन्स्टॉल करा.
८.इन्स्टॉल केल्यानंतर डेस्कटॉपवर ' लि ' असा एक शॉर्टकट येईल.




९.त्या शॉर्टकट वर double click करा.
१०.मग टास्कबारवर ' लि ' हा आयकॉन दिसेल.                                                                                                               
                                                        
                            
११.त्या आयकॉनवर click करुन Choose Language मधुन मराठी भाषा निवडा.
                        


१२.आता तुम्ही इंटरनेटवर मराठी लिहीण्यासाठी तयार आहात.
१३.आणि हो ! मराठी लिहीत असताना मधेच English देखिल लिहावं लागतं,त्यासाठी Ctrl + Alt + L ही short cut बटणस् दाबून भाषा बदलू  शकता.

4 टिप्पणी पोस्ट करा:

  1. this is a good provision for marathi blog.thanks

    ReplyDelete
  2. welcome,and Thank you for comment.

    ReplyDelete
  3. Mr. Kulkarni,'
    Atta mi Lipikar chaya site var javun pahile. Te eak paid software ahe. Tumhi lihilet tya veli te free hote ka ??

    Gadgil K.A.

    ReplyDelete
  4. नमस्कार,
    होय, मी हा लेख लिहिला तेंव्हा हे सोफ्टवेअर अगदी मोफत होते. आत्ता देखील ते Firefox ह्या ब्राउजर साठी मोफत आहे तसेच windows म्हणजेच desktop साठी त्याचे trial version उपलब्ध आहे. त्याचा तुम्ही उपयोग करावा

    ReplyDelete