प्रत्येक सुरांसोबत
मनाची तार जोडत चला
कोणी तुमचे प्रेम समजो अथवा न समजो
निर्व्याज प्रेम प्रत्येकावर करत चला
ज्याला आपण जग म्हणतो
ते एक खूपच सुंदर सत्य आहे
या सुंदर सत्याला आपल्या मनाच्या
मधुर स्वरांनी सजवत चला
काही मिळत नसते मित्रहो या संहारात
प्रत्येकाच्या हातात मैत्रीचे फुल देत चला
येथे सुख ही आपलेच आहे
आणि दु:ख ही आपलेच आहे
जो जीव व्याकूळ होतोय या संहारात
तो जीव ही आपलाच आहे
तो, ती, तू ,मी प्रत्येकाचा सूर
एकाच सुराला जोडत चला
अवघड नाही या संहाराला आळा घालणे
फक्त प्रत्येक ठिकाण आनंद आणि प्रेमाने भरत चला !!!
0 टिप्पणी पोस्ट करा:
Post a Comment