Friday, January 18, 2013

संगणक किबोर्डवरील शॉर्टकट बटन्स् - Computer keyboard shortcut keys

                                         संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)
Computer keyboard shortcut keys

                  आजचा आपला विषय आहे "संगणक किबोर्डवरील शॉर्टकट बटन्स्", म्हणजे काय ? तर आज पर्यंत आपण वेगवेगळे विषय आणि अनेक संगणक विषयक माहिती देणारे लेख 'संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)' या विशेष भागातून आपण वाचले आहेत. आज आपण बघुयात संगणक हाताळताना आपल्याला वेळ कसा वाचवता येईल तसेच, काही कारणामुळे mouse नीट चालत नसेल तर आपल्याला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. अशावेळी जर आपल्याला नक्की कोणती किबोर्डवरील कि दाबून काय करता येईल हे महिती असेल तर आपला वेळ देखील वाचू शकेल.

Wednesday, January 02, 2013

बारा राशींचे वार्षिक राशी भविष्य - २०१३ - Yearly horoscope 2013


बारा राशींचे वार्षिक राशी भविष्य २०१३ 

         मेष                   
मेष 
नूतनवर्षाभिनंदन .... 

तुमच्या राशीच्या दुस-या घरातून गुरू पुढे सरकत आहे. त्यामुळे या वर्षी तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुमच्या पगारात वाढ होईल. नोकरी व्यावसायात चांगल्या संधी उपलब्ध होतील. मात्र पगारापेक्षा खर्चही जास्त होण्याची चिन्हे आहेत. तुमच्या राशीसाठी उच्च शिक्षणाचा योग आहे. पुढे वाचा >>>



            वृषभ 
वृषभ 
वर्षाच्या सुरुवातीला गुरु तुमच्या राशीत असणार आहे. त्यामुळे वर्षाच्या सुरवातीला चांगला आर्थिक फायदा होईल आणि काही नवीन करण्याची इच्छा निर्माण होईल. गुरुची दृष्टी पाचव्या घरावर असल्याने आपत्य प्राप्तीची होईल. प्रेमप्रकरणाला चांगला वाव आहे. या प्रमामुळे नवीन जागी फिरण्याची संधी तुमच्या राशीत आहे. पुढे वाचा >>>





      मिथुन
मिथुन 
गुरु तुमच्या राशीच्या बाराव्या घरातून जात आहे जो ३१ मे २०१३ पर्यंत राहील. त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. व्यावसायात जास्त मेहनत केली तरच यश प्राप्त होईल. धार्मिक कामासाठी खर्च होईल. 

        कर्क 
कर्क 
वर्षाची सुरुवातीला गुरु तुमच्या राशीच्या अकराव्या घरात आहे. जो ३१ मे २०१३ पर्यंत असेल. त्यामुळे शिक्षण, व्यावसाय क्षेत्रात यश मिळेल, धनलाभ होईल. उच्च पदाधिका-यांना उच्च क्षेत्रातील लोकांशी संपर्क साधून वैयक्तीक पातळीवर नात्यांना सुरुवात करता येईल. पुढे वाचा >>>
               सिंह 
सिंह 
वर्षाच्या सुरुवातीला गुरु तुमच्या राशीच्या दहाव्या घरातून जाईल. त्यामुळे व्यावसाय आणि व्यापार क्षेत्रात चांगली प्रगती होईल. संपत्ती, घर जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. पुढे वाचा >>>






      कन्या 
कन्या 
वर्षाच्या सुरुवातीला गुरू तुमच्या राशीच्या भाग्यस्थानावरुन जात आहे. ज्यामुळे तुमचे भाग्य उजाळेल. व्यवसाय क्षेत्रात प्रगती होईल. सुख सुविधा देणा-या साधनांच्या उपभोगांमध्ये वाढ होईल. पुढे वाचा >>>






      तुळ
तुळ 
तुमच्या राशीत आठव्या घरात गुरुच्या भ्रमणामुळे लहान मोठ्या आरोग्यविषयक अडचणी येत राहतील. कौटुंबिक खर्च वाढतील. मानसिक चिंता आणि संताप होईल. पुढे वाचा >>>






      वृश्चिक 
वृश्चिक 
गुरू वर्षाच्या सुरवातीला तुमच्या राशीच्या सातव्या घरातून जाणार आहे. त्यामुळे तुमच्या महत्वाकांक्षा वाढतील. वैवाहिक जीवनात सुख उपभोगता येईल. पुढे वाचा >>>






       धनु 
धनु 
वर्षाच्या सुरवातीला गुरू वृषभ राशीच्या सहाव्या घरात असेल ज्यामुळे तुम्हाला आरोग्यासंदर्भात अडचणींना सामोरे जावे लागेल. मात्र तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रात फायदा होईल. कौटुंबिक जबाबदा-या येतील. 
पुढे वाचा >>>





      मकर
मकर 
वर्षाच्या सुरवातीला गुरु तुमच्या राशीच्या पाचव्या घरातून जात आहे. त्यामुळे आचानक धनलाभ होऊ शकतो. तुमची मुले प्रगती करतील. साहस कार्यात यश मिळेल. पुढे वाचा >>>






       कुंभ 
कुंभ 
गुरु आणि केतू चौथ्या घरातून आणि राहु दहाव्या घरातून जाईल. त्यामुळे धार्मिक कार्यात जास्त पैसे खर्च होतील. तुमचे मित्रच तुमचा विश्वासघात करतील. पुढे वाचा >>>






      मीन
मीन 
वर्षाच्या सुरुवातीला गुरू तिस-या घरातून जात असल्याने साहसी कामांमध्ये यश मिळेल. कुटुंबात चांगली कामे होतील. व्यावसायिक क्षेत्रात फायदा होईल. 
पुढे वाचा >>>






सौजन्य:- महाराष्ट्र टाईम्स 

वार्षिक राशी भविष्य २०१३ - मीन - Yearly horoscope 2013 - Pisces

वार्षिक राशी भविष्य २०१३ - मीन 
मीन 

नूतन वर्षाभिनंदन... 
        वर्षाच्या सुरुवातीला गुरू तिस-या घरातून जात असल्याने साहसी कामांमध्ये यश मिळेल. कुटुंबात चांगली कामे होतील. व्यावसायिक क्षेत्रात फायदा होईल.         छोट्या ट्रीपचा योग आहे. कोर्टाच्या कामामध्ये यश मिळेल. नोकरीत फायदा होईल. सध्याचे राहते घर बदलावे लागेल. वाहतुक, पर्यटन, कम्युनिकेशन, प्रकाशन सारख्या व्यवसायामध्ये नवीन बदल करु शकता. 
         ३१ मे २०१३ पासून गुरु मिथुन राशीत भ्रमण करत असेल. त्यामुळे नवीन घर किंवा दुकान किंवा वाहन घेण्याचा योग आहे. दलाली - कमिशनच्या व्यवसायात फायदा होईल. ट्रीप फायदेशीर ठरेल. महत्वकांशा वाढतील, वर्षाच्या सुरवातीला शनी आठव्या घरात तुळ राशीत वर्षाच्या शेवटपर्यंत राहील.

वार्षिक राशी भविष्य २०१३ - कुंभ - Yearly horoscope 2013 - Aquarius

वार्षिक राशी भविष्य २०१३ - कुंभ 
कुंभ  
नूतन वर्षाभिनंदन...
          गुरु आणि केतू चौथ्या घरातून आणि राहु दहाव्या घरातून जाईल. त्यामुळे धार्मिक कार्यात जास्त पैसे खर्च होतील. तुमचे मित्रच तुमचा विश्वासघात करतील.           व्यवसायात प्रगती एकदमच संथ गतीने होईल. नोकरीत प्रमोशन मिळेल. नोकरीसाठी तसेच स्थलांतर करण्याचाही योग तुमच्या राशीत आहे. ३१ मे २०१३ ला गुरू मिथुन राशीत जाईल. 
          तो तुमच्या राशीच्या पाचव्या घरात असेल. त्यामुळे तुमची शैक्षणिक प्रगती होईल. नोकरीत फायदा होईल. व्यावसायिक ट्रीप फायदेशीर ठरेल. अपत्य नसणा-यांना अपत्यप्राप्तीचा योग आहे. २४ डिसेंबर २०१२ ला शनी आणि राहु एकत्र असतील आणि केतू तिस-या घरात असेल. त्यामुळे वडील तसेच ऑफिसमध्ये वरीष्ठ अधिका-यांबरोबर वैचारीक मतभेद होतील.

वार्षिक राशी भविष्य २०१३ - मकर - Yearly horoscope 2013 - Capricorn

वार्षिक राशी भविष्य २०१३ - मकर 
मकर 

नूतन वर्षाभिनंदन...
         वर्षाच्या सुरवातीला गुरु तुमच्या राशीच्या पाचव्या घरातून जात आहे. त्यामुळे आचानक धनलाभ होऊ शकतो. तुमची मुले प्रगती करतील. साहस कार्यात यश मिळेल.        व्यावसायिक कामासाठी केलेली ट्रीम लाभदायक ठरेल. पवित्र प्रसंगाचा योग आहे. परदेशाशी संबंधीत कामे लवकर होतील. शेअर बाजार तसेच सट्टा बाजारातील गुंतवणुकीत फायदा होईल. 
          नोकरीत प्रमोशन मिळेल. ३१ मे २०१३ पासून गुरु तुमच्या राशीच्या सहाव्या घरात असेल. त्यामुळे तुम्हाला प्रतिस्पर्धांकडून त्रास होऊ शकतो. मात्र नोकरीत फायदा होईल आणि पगार वाढ होईल. लांब प्रवास होण्याची चिन्हे आहेत. 

वार्षिक राशी भविष्य २०१३ - धनु - Yearly horoscope 2013 - Sagittarius

वार्षिक राशी भविष्य २०१३ - धनु 
धनु 

नूतन वर्षाभिनंदन...
       वर्षाच्या सुरवातीला गुरू वृषभ राशीच्या सहाव्या घरात असेल ज्यामुळे तुम्हाला आरोग्यासंदर्भात अडचणींना सामोरे जावे लागेल. मात्र तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रात फायदा होईल. कौटुंबिक जबाबदा-या येतील.          ३१ मे २०१३ ला गुरू मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे तुमच्या महत्वाकांक्षा वाढतील. अनेक शुभ प्रसंग येतील. शेअर बाजार तसेच सट्टा बाजारातील गुंतवणुकीत फायदा होईल. सामाजिक कार्यात यश, मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. भौतिक सुख देणा-या घरातील वस्तूंच्या संख्येत वाढ होईल. 
              तुम्ही प्रेमात पडण्याचा योग आहे. वर्षाच्या सुरुवातीला शनी तुमच्या राशीच्या लाभस्थानावरुन जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला ज्येष्ठ तसेच मित्रपरिवाराकडून फायदा होईल. संपत्ती, घर, वाहनाचे सुख तुमच्या राशीत आहे. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांबरोबर वैचारीक वाद होतील.

वार्षिक राशी भविष्य २०१३ - वृश्चिक - Yearly horoscope 2013 - Scorpio

वार्षिक राशी भविष्य २०१३ - वृश्चिक 
वृश्चिक 

नूतन वर्षाभिनंदन... 
         गुरू वर्षाच्या सुरवातीला तुमच्या राशीच्या सातव्या घरातून जाणार आहे. त्यामुळे तुमच्या महत्वाकांक्षा वाढतील. वैवाहिक जीवनात सुख उपभोगता येईल.        कुटुंबात शुभ आणि मंगल प्रसंगांचा योग आहे. शेअर बाजार तसेच सट्टा बाजारातील गुंतवणुकीत फायदा होईल. भौतिक सुख देणा-या घरातील वस्तूंच्या संख्येत वाढ होईल. प्रेमात पडण्याचा योग आहे. 
        ३१ मे २०१३ ला गुरू मिथुन राशीत प्रवेश करेल आणि जो तुमच्या राशीच्या आठव्या घरातुन जाईल. ज्यामुळे शारीरिक आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यामध्ये खर्च होईल. वर्षाच्या सुरवातीला शनी तुमच्या राशीच्या बाराव्या घरातून जाईल. ज्यामुळे शनी आणि राहुच्या व्ययामुळे शापिक दोष तयार होईल.

वार्षिक राशी भविष्य २०१३ - तुळ - Yearly horoscope 2013 - Libra

वार्षिक राशी भविष्य २०१३ - तुळ 
तुळ 

नूतन वर्षाभिनंदन ...
         तुमच्या राशीत आठव्या घरात गुरुच्या भ्रमणामुळे लहान मोठ्या आरोग्यविषयक अडचणी येत राहतील. कौटुंबिक खर्च वाढतील. मानसिक चिंता आणि संताप होईल.
           व्यावसायिक क्षेत्राकडे खास लक्ष द्यावे लागेल. कोर्टाच्या पाय-या चढण्यात जास्त पैसा खर्च होईल. शैक्षणिक प्रगतीत अडथळे येतील. पण हे काही मर्यादीत वेळेसाठी असेल.३१ मे २०१३ पासून गुरू मिथुन राशीमध्ये तुमच्या राशीच्या भाग्यस्थानावरु जाईल. त्यामुळे तुम्हाला चांगले कौटुंबिक सुख उपभोगता येईल.
               भाग्य उजळेल. धन संपत्तीत वाढ होईल. तुमच्या अनेक महत्वकांशा पूर्ण होतील. धार्मिक कार्याची आवड राहिल. या वर्षी तुमच्या राशीत तीर्थयात्रेचाही योग आहे. समाजसेवेच्या कार्यात आवड निर्माण होईल. समाजात मान सन्मान मिळेल. एकंदरीत यशामध्ये वाढ होईल. नोकरी व्यवसायाच्या कारणानिमित्त बाहेरगावी जाण्याचा योग आहे. 

वार्षिक राशी भविष्य २०१३ - कन्या - Yearly horoscope 2013 - Virgo

वार्षिक राशी भविष्य २०१३ - कन्या 
कन्या 

नूतन वर्षाभिनंदन... 
              वर्षाच्या सुरुवातीला गुरू तुमच्या राशीच्या भाग्यस्थानावरुन जात आहे. ज्यामुळे तुमचे भाग्य उजाळेल. व्यवसाय क्षेत्रात प्रगती होईल. सुख सुविधा देणा-या साधनांच्या उपभोगांमध्ये वाढ होईल.
              आपत्यप्राप्तीच्या मार्गातील सर्व अडचणी दूर होतील. कौटुंबिक जबाबदा-या वाढतील. धर्मिक आणि पवित्र अशा अनेक प्रसंगामध्ये सहभागी होण्याचा योग आहे. अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. 
             समाजात मिळणा-या मान-सन्मानात आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. ३१ मे २०१३ ला गुरु मिथुन राशित प्रवेश करणार आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन साहसी कामे करण्यासाठी प्रेरणा मिळेल. व्यवसाय क्षेत्रात यश मिळेल. मित्रांबरोबर चांगले नातेसंबंध राहतील. त्यांच्यापासून फायदा होईल. तसेच नोकरीतही भरभराट राहील. 

वार्षिक राशी भविष्य २०१३ - सिंह - Yearly horoscope 2013 - Leo

वार्षिक राशी भविष्य २०१३ - सिंह 
सिंह 

नूतन वर्षाभिनंदन...
           वर्षाच्या सुरुवातीला गुरु तुमच्या राशीच्या दहाव्या घरातून जाईल. त्यामुळे व्यावसाय आणि व्यापार क्षेत्रात चांगली प्रगती होईल. संपत्ती, घर जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल.
           नोकरीत प्रमोशन मिळेल. मात्र त्याबरोबरच राहुचा प्रभाव असल्याने हे फळ अंशत : कमी होईल. १ जून २०१३ पासून गुरू तुमच्या लाभ स्थानावरुन जाईल. ज्याचा प्रभाव वर्ष संपेपर्यंत असणार आहे. त्यामुळे तुम्हाला सामाजिक मान सन्मान मिळेल. धर्म, अध्यात्म आणि तत्वज्ञान विषयात तुमची आवड वाढेल.

वार्षिक राशी भविष्य २०१३ - कर्क - Yearly horoscope 2013 - Cancer

वार्षिक राशी भविष्य २०१३ - कर्क 
कर्क 

नूतन वर्षाभिनंदन...
          वर्षाची सुरुवातीला गुरु तुमच्या राशीच्या अकराव्या घरात आहे. जो ३१ मे २०१३ पर्यंत असेल. त्यामुळे शिक्षण, व्यावसाय क्षेत्रात यश मिळेल, धनलाभ होईल. उच्च पदाधिका-यांना उच्च क्षेत्रातील लोकांशी संपर्क साधून वैयक्तीक पातळीवर नात्यांना सुरुवात करता येईल.
            समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. मित्रांकडून फायदा होईल. दीर्घ आजारापासून सुटका मिळेल. आपत्यप्राप्ती किंवा अपत्यसुखात वाढ होईल. वैवाहिक सुख उपभोगता येईल. मात्र विवाहबाह्य संबंधाचीही दाट शक्यता आहे. 

वार्षिक राशी भविष्य २०१३ - मिथुन - Yearly horoscope 2013 - Gemini

वार्षिक राशी भविष्य २०१३ - मिथुन 
मिथुन 

नूतन वर्षाभिनंदन...
           गुरु तुमच्या राशीच्या बाराव्या घरातून जात आहे जो ३१ मे २०१३ पर्यंत राहील. त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. व्यावसायात जास्त मेहनत केली तरच यश प्राप्त होईल. धार्मिक कामासाठी खर्च होईल. कर्ज फेडणे थोडे सोप्पे होईल. नोकरीमध्ये फायदा होईल. जून महिन्याच्या पहिल्याच तारखेला गुरु मिथुन राशीत प्रवेश करेल. त्यामुळे तुमची हिम्मत आणि धैर्य वाढण्यास मदत होईल. आपत्यप्राप्ती होईल.
           लग्नाला इच्छूक असणा-यांचे लग्न जमेल. बँकेचे कर्ज, क्रेडीट कार्ड किंवा अन्य आर्थिक जबाबदारी स्वीकारुन कर्ज वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे या गोष्टींपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. नोकरी सोडण्याचा विचार करत असला तर तो या वर्षीपूरता बाजूला ठेवा.

वार्षिक राशी भविष्य २०१३ - वृषभ - Yearly horoscope 2013 - Taurus

वार्षिक राशी भविष्य २०१३ - वृषभ 
वृषभ 
नूतन वर्षाभिनंदन...
                    वर्षाच्या सुरुवातीला गुरु तुमच्या राशीत असणार आहे. त्यामुळे वर्षाच्या सुरवातीला चांगला आर्थिक फायदा होईल आणि काही नवीन करण्याची इच्छा निर्माण होईल. गुरुची दृष्टी पाचव्या घरावर असल्याने आपत्य प्राप्तीची होईल.
                    प्रेमप्रकरणाला चांगला वाव आहे. या प्रमामुळे नवीन जागी फिरण्याची संधी तुमच्या राशीत आहे. लग्न करण्याची इच्छा असल्यास ती पूर्ण होऊ शकते. अर्धे वर्ष सरल्यानंतर म्हणजेच १ जूननंतर तुम्हाला अकस्मात धनलाभ होईल. कोर्ट आणि कायदेशीर गोष्टीत यश प्राप्त होईल. नोकरीत प्रमोशन होईल. 
                     समाजामध्ये मानसन्मान मिळेल. तुम्ही तुमच्या शत्रुंवर विजय मिळवाल. व्यवसायात यश प्राप्ती होईल. परंतु आरोग्याशी संबंधित अडचणी तसेच दीर्घ स्वरुपाचे आजारपणाला सामोरे जावे लागणार आहे. आपले कुटुंबीय आणि मित्रांकडून त्रास होऊ शकतो.

वार्षिक राशी भविष्य २०१३ - मेष - Yearly horoscope 2013 - Aries

वार्षिक राशी भविष्य २०१३ - मेष 

मेष 
नूतनवर्षाभिनंदन...
         तुमच्या राशीच्या दुस-या घरातून गुरू पुढे सरकत आहे. त्यामुळे या वर्षी तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुमच्या पगारात वाढ होईल. नोकरी व्यावसायात चांगल्या संधी उपलब्ध होतील. मात्र पगारापेक्षा खर्चही जास्त होण्याची चिन्हे आहेत. 
         तुमच्या राशीसाठी उच्च शिक्षणाचा योग आहे.तुम्ही नवीन प्रकल्पावर संशोधन करत असाल तर हे वर्ष तुमच्यासाठी फलदायी ठरणार आहे. प्रवासाचा योग आहे. लहान ट्रीप होईल. आरोग्याच्या दृष्टीने वर्षभर चढ-उतार होत राहतील. 
            मानसिक संताप वाढण्याची लक्षणे आहेत. त्यामुळे आपले डोके शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. कायदेशीर कागदपत्रे लक्षपूर्वक हाताळा. संपूर्ण वाचूनच कायदेशीर कागदांवर सह्या करा. कौटुंबिक प्रश्न वाद विवाद होणार नाहीत याकडे विशेष लक्ष द्या.