Wednesday, January 02, 2013

वार्षिक राशी भविष्य २०१३ - कर्क - Yearly horoscope 2013 - Cancer

वार्षिक राशी भविष्य २०१३ - कर्क 
कर्क 

नूतन वर्षाभिनंदन...
          वर्षाची सुरुवातीला गुरु तुमच्या राशीच्या अकराव्या घरात आहे. जो ३१ मे २०१३ पर्यंत असेल. त्यामुळे शिक्षण, व्यावसाय क्षेत्रात यश मिळेल, धनलाभ होईल. उच्च पदाधिका-यांना उच्च क्षेत्रातील लोकांशी संपर्क साधून वैयक्तीक पातळीवर नात्यांना सुरुवात करता येईल.
            समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. मित्रांकडून फायदा होईल. दीर्घ आजारापासून सुटका मिळेल. आपत्यप्राप्ती किंवा अपत्यसुखात वाढ होईल. वैवाहिक सुख उपभोगता येईल. मात्र विवाहबाह्य संबंधाचीही दाट शक्यता आहे. 

           चांगले कौटुंबिक सुख लाभेल. शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवल्यास जास्त फायदा होईल. १ जूनला गुरु मिथुन राशीत प्रवेश करेल जो वर्ष संपेपर्यंत असेल. त्यामुळे व्यावसायिक क्षेत्रात पैसा गुंतवताना सावध राहा नाहीतर मोठे आर्थिक नुकसान होईल. 
           नातेवाईक किंवा जवळच्या लोकांकडून विश्वासघात होण्याचा योग आहे. नोकरीत प्रमोशन मिळेल. तसेच परदेशात जाण्याची संधी किंवा बहुराष्ट्रीय कंपनीत काम करण्याची संधी मिळेल. मात्र वैवाहिक जीवनात अडचणी येतील. अध्यात्मिक जीवनाकडे तुमचा कल राहील.
           हे वर्ष प्रेम, व्यवसाय आणि आर्थिक पातळीवर सकारात्मक ठरणार आहे. यापूर्वी जर तुम्हाला प्रेमाने हुलकावणी दिली असेल तर २०१३ ला तुम्हाला प्रेम मिळेल. छोटी भांडणे आणि वाद टाळा. प्रेमाचा अदभूत प्रवास अनुभवा. कामाच्या ताणामुळे संपूर्ण वर्ष थकवा जाणवेल. तुम्ही नवा व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला परदेशी व्यवसायातून फायदा होईल. जोखीम घेणे टाळा. कारण त्यामुळे तोटा होऊ शकतो. नवीन वर्षात देणी निर्माण होणार नाहीत याकडे लक्ष द्या. जोडधंदा असणार्‍यांनी नेहमीच्या कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नोकरीत मार्च-एप्रिलपर्यंतचा काळ अनुकूल राहील. जूननंतर मात्र नको त्या ठिकाणी मानविरुद्ध बदली होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षात स्वत:हून बदल न करणे हितावह राहील. तुम्ही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्यासाठी तुम्हाला दोष देण्यात येईल. आणि मुख्य म्हणजे अगदी तुम्ही स्वत:ला दोष द्याल. उदार असणे चांगले आहे, पण तुम्ही परिस्थितीची गडद बाजू बघणे योग्य ठरेल. विद्यार्थ्यांनी अपेक्षित कोर्सला प्रवेश मिळवण्यासाठी तडजोडीची तयारी ठेवावी.जानेवारी २०१३ या महिन्यात छोटी भांडणे आणि वाद टाळा.
          प्रेमाचा अदभूत प्रवास अनुभवा. कामाच्या ताणामुळे संपूर्ण महिना थकवा जाणवेल. तुम्ही नवा व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला परदेशी व्यवसायातून फायदा होईल. जोखीम घेणे टाळा. कारण त्यामुळे तोटा होऊ शकतो. नवीन महिन्यात देणी निर्माण होणार नाहीत याकडे लक्ष द्या. जोडधंदा असणार्‍यांनी नेहमीच्या कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 





No comments:

Post a Comment