Wednesday, January 02, 2013

वार्षिक राशी भविष्य २०१३ - कुंभ - Yearly horoscope 2013 - Aquarius

वार्षिक राशी भविष्य २०१३ - कुंभ 
कुंभ  
नूतन वर्षाभिनंदन...
          गुरु आणि केतू चौथ्या घरातून आणि राहु दहाव्या घरातून जाईल. त्यामुळे धार्मिक कार्यात जास्त पैसे खर्च होतील. तुमचे मित्रच तुमचा विश्वासघात करतील.           व्यवसायात प्रगती एकदमच संथ गतीने होईल. नोकरीत प्रमोशन मिळेल. नोकरीसाठी तसेच स्थलांतर करण्याचाही योग तुमच्या राशीत आहे. ३१ मे २०१३ ला गुरू मिथुन राशीत जाईल. 
          तो तुमच्या राशीच्या पाचव्या घरात असेल. त्यामुळे तुमची शैक्षणिक प्रगती होईल. नोकरीत फायदा होईल. व्यावसायिक ट्रीप फायदेशीर ठरेल. अपत्य नसणा-यांना अपत्यप्राप्तीचा योग आहे. २४ डिसेंबर २०१२ ला शनी आणि राहु एकत्र असतील आणि केतू तिस-या घरात असेल. त्यामुळे वडील तसेच ऑफिसमध्ये वरीष्ठ अधिका-यांबरोबर वैचारीक मतभेद होतील.
            आपत्याच्या जीवनात संकटे येतील. मित्रांबरोबर वाद होण्याची लक्षणे आहेत. व्यवसायामध्ये जितके कष्ट घ्याल. त्याप्रमाणात अपेक्षित निकाल मिळणार नाही. ४ मार्च २०१३ च्या जवळपासच्या आठवड्यात सूर्य. मंगळ, बुध आणि शुक्रच्या युतिमुळे अनेक अडचणी येतील त्यामुळे या काळात सर्व प्रकारची कळजी घ्यावी.

            २०१३ साली काही अनुभवी व्यावसायी व्यक्तींसोबत काम करू शकाल. त्यामुळे करिअरच्या दृष्टीने हे वर्ष उत्तम असणार आहे. तुमच्या सुयोग्य कामामुळे २०१३ च्या शेवटी बढतीचे योग आहेत. मिळकतीच्या नियमित पुरवठ्यामुळे हे वर्ष तुम्हाला आनंद देणारे ठरेल. स्थितप्रज्ञ म्हणून समजली जाणारी तुमची रास नवीन वर्षात अनेक चढ-उतार पाहणार आहे. अर्थाअर्थी काहीही संबंध नसणार्‍या बदलांना तुम्हाला समोरे जावे लागेल. तुमचे प्रेम आणि जिवलग तुम्हाला प्रेम देतील. 
            तुमच्या कार्यालातील लोक आदर देतील,त्यामुळे आनंदी वाटेल. काही वेळा तुमचा अहंभाव वाढेल. त्यामुळे तशी परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करावा. यावर्षी तुम्हाला खुले विचार मदत करतील. मोसमी आजारामुळे तब्येत बिघडेल. पण त्याहून अधिक काही होणार नाही. तुम्ही तुमच्या प्रेमीजनांसोबत एखाद्या पवित्र तीर्थस्थानी जाण्याची शक्यता आहे. तरुणांचे विवाह नवीन वर्षात ठरतील व पार पडतील. करिअरच्या नवीन संधी दृष्टिक्षेपात येतील त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या तत्त्वांशी तडजोड करणे गरजेचे आहे. उत्पन्नाचे नवीन साध मिळेल. आर्थिकमानही सुधारेल.
            जानेवारी २०१३ तुमच्या सुयोग्य कामामुळे या महिन्याच्या शेवटी बढतीचे योग आहेत. स्थितप्रज्ञ म्हणून समजली जाणारी तुमची रास नवीन वर्षात अनेक चढ-उतार पाहणार आहे. अर्थाअर्थी काहीही संबंध नसणार्‍या बदलांना तुम्हाला समोरे जावे लागेल. तुमचे प्रेम आणि जिवलग तुम्हाला प्रेम देतील. तुमच्या कार्यालातील लोक आदर देतील,त्यामुळे आनंदी वाटेल. काही वेळा तुमचा अहंभाव वाढेल. त्यामुळे तशी परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करावा.

इतर राशी :-  मेष   वृषभ   मिथुन   कर्क   सिंह   कन्या   तुळ   वृश्चिक   धनु   मकर    कुंभ   मीन 


No comments:

Post a Comment