Wednesday, January 02, 2013

वार्षिक राशी भविष्य २०१३ - धनु - Yearly horoscope 2013 - Sagittarius

वार्षिक राशी भविष्य २०१३ - धनु 
धनु 

नूतन वर्षाभिनंदन...
       वर्षाच्या सुरवातीला गुरू वृषभ राशीच्या सहाव्या घरात असेल ज्यामुळे तुम्हाला आरोग्यासंदर्भात अडचणींना सामोरे जावे लागेल. मात्र तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रात फायदा होईल. कौटुंबिक जबाबदा-या येतील.          ३१ मे २०१३ ला गुरू मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे तुमच्या महत्वाकांक्षा वाढतील. अनेक शुभ प्रसंग येतील. शेअर बाजार तसेच सट्टा बाजारातील गुंतवणुकीत फायदा होईल. सामाजिक कार्यात यश, मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. भौतिक सुख देणा-या घरातील वस्तूंच्या संख्येत वाढ होईल. 
              तुम्ही प्रेमात पडण्याचा योग आहे. वर्षाच्या सुरुवातीला शनी तुमच्या राशीच्या लाभस्थानावरुन जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला ज्येष्ठ तसेच मित्रपरिवाराकडून फायदा होईल. संपत्ती, घर, वाहनाचे सुख तुमच्या राशीत आहे. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांबरोबर वैचारीक वाद होतील.
               २४ डिसेंबर २०१२ पासून लाभ घरात शनिबरोबर राहुची युती होईल. तसेच केतू तुमच्या राशीच्या पाचव्या स्थानावर भ्रमंती करत असेल. शेअर बाजारात मेहनत केल्यास वर्षाच्या शेवटी फायदा होईल. मुलांसंबंधीत चिंता वाढेल. शिक्षणात अडचणी येतील. संपतीचा अपव्यय होण्याची लक्षणे आहेत.
              यावर्षी तुम्हाला तुमच्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागेल असा सल्ला आहे. अगदी छोटे दुर्लक्ष मोठे कष्ट देणारे ठरतील. राशीच्या लाभात शनी आणि वर्षभर अनुकूल राहणारा मंगल तुमच्या इच्छा आकांक्षा वाढवणारे आहेत. असे असून मे २०१३ पर्यंत राश्याधिपती गुरु षष्ठात भ्रमण करणार असल्यामुळे तुमच्या बोलण्या-वागण्यात एक प्रकारची निराशा येईल. आशा-निराशाचा केळ तुमच्या बाबतीत इतका प्रकर्षाने जाणवेल, की सभोवतालच्या व्यक्तींना तुमच्याविषयी कोडे वाटेल. मे २०१३ नंतर एम महत्त्वाच्या चांगल्या वळणावर तुम्ही पोचल्यावर सर्व निराशा नाहीशी होईल.
             धंदा-व्यवसायात मार्च २०१३ पर्यंत जमाखर्चाची बाजू समसमान राहील. तुमच्या हट्टी स्वभावामुळे कदाचित जिवलग दुरावण्याची शक्यता आहे. पण जर तुम्ही शहाणपणाने वागलात तर तुम्हाला २०१३ साली जोडीदार मिळेल. प्रेमात लाभलेल्या क्षणांमुळे विवाहित सुखावतील. करिअरच्या दृष्टीने हे वर्ष खूप चांगले नाही. तुम्ही मेहनती आहात आणि तुम्ही सगळ्या प्रकल्पासाठी भरपूर मेहनत घेतात. पण त्यामानाने फार कमी प्रतिसाद मिळतो. त्यामुळे तुम्ही मानसिकरीत्या हताश होता. वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला कुटुंबाकडून तणावाचा सामना करावा लागेल. पण जसा वेळ जाईल तशा समस्या कमी होतील.
            जानेवारी २०१३ तुमच्या हट्टी स्वभावामुळे कदाचित जिवलग दुरावण्याची शक्यता आहे. पण जर तुम्ही शहाणपणाने वागलात तर तुम्हाला या महिन्यात जोडीदार मिळेल. प्रेमात लाभलेल्या क्षणांमुळे विवाहित सुखावतील. तुम्ही मेहनती आहात आणि तुम्ही सगळ्या प्रकल्पासाठी भरपूर मेहनत घेतात. पण त्यामानाने फार कमी प्रतिसाद मिळतो. त्यामुळे तुम्ही मानसिकरीत्या हताश होता. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला कुटुंबाकडून तणावाचा सामना करावा लागेल. पण जसा वेळ जाईल तशा समस्या कमी होतील. 





No comments:

Post a Comment