Wednesday, January 02, 2013

वार्षिक राशी भविष्य २०१३ - मेष - Yearly horoscope 2013 - Aries

वार्षिक राशी भविष्य २०१३ - मेष 

मेष 
नूतनवर्षाभिनंदन...
         तुमच्या राशीच्या दुस-या घरातून गुरू पुढे सरकत आहे. त्यामुळे या वर्षी तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुमच्या पगारात वाढ होईल. नोकरी व्यावसायात चांगल्या संधी उपलब्ध होतील. मात्र पगारापेक्षा खर्चही जास्त होण्याची चिन्हे आहेत. 
         तुमच्या राशीसाठी उच्च शिक्षणाचा योग आहे.तुम्ही नवीन प्रकल्पावर संशोधन करत असाल तर हे वर्ष तुमच्यासाठी फलदायी ठरणार आहे. प्रवासाचा योग आहे. लहान ट्रीप होईल. आरोग्याच्या दृष्टीने वर्षभर चढ-उतार होत राहतील. 
            मानसिक संताप वाढण्याची लक्षणे आहेत. त्यामुळे आपले डोके शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. कायदेशीर कागदपत्रे लक्षपूर्वक हाताळा. संपूर्ण वाचूनच कायदेशीर कागदांवर सह्या करा. कौटुंबिक प्रश्न वाद विवाद होणार नाहीत याकडे विशेष लक्ष द्या.
            गैरसमज भांडणांपासून कुटुंब दूर राहील याची काळजी घ्या. तसेच तुमच्या प्रभावशिलतेमध्ये (वर्चस्वामध्ये) कमतरता येऊ शकते. कायदेशीर अडचणी तयार होणार नाही याची काळजी घ्या. संसारीक जीवनात लहान लहान कारणांवरुन वाद होणार. त्यामुळे अशा परिस्थितीत एकमेकांना समजून घेण्याची तयारी ठेवा. या वर्षी तुमचे संसारीक तसेच भागीदारीतील नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी राहु तुम्हाला भाग पा़डेल. कोर्टाची पायरी चढावी लागण्याची शक्यता आहे. 
            २०१३ हे साल तुम्हाला सांगते आहे की, प्रेम, आरोग्य, कुटुंब, व्यवसाय, पैसे आणि शिक्षण यासंबंधीचे निर्णय सावधपणे घ्या, अन्यथा कालांतराने तुम्हाला दोषांना तोंड द्यावे लागेल. धनप्राप्तीसाठी नोव्हेंबर, एप्रिल, जुलै, सप्टेंबर हे महिने विशेष अनुकूल आहेत. या वर्षी वर्षभर गुरुकृपा असल्याने धनाची चिंता करावी लागणार नाही. तुम्ही २०१३ मध्ये खूप खंबीर बनणार आहात आणि प्रेम तसेच कुटुंबासंबंधी गंभीर परिस्थितीशी मुकाबला करता येईल पण त्यातून बराच फायदा होणार नाही. त्यामुळे शक्य होईल तितके स्वत:ला शांत ठेवा. तुमच्या तापट स्वभावामुळे नुकसान होणार नही व शत्रुत्व वाढणार नाही, याची विशेष काळजी वर्षभर घ्यावी लागेल. परदेशगमन व परदेश व्यवहाराच्या कामांना जुलै ते सप्टेंबरमध्ये चालना मिळेल. मुलांच्या शैक्षणिक अभ्यासाला जानेवारी ते मे २०१३ हा कालावधी अनुकूल आहे.
            जानेवारी २०१३या महिन्यात गुरुकृपा असल्याने धनाची चिंता करावी लागणार नाही. तुम्ही या महिन्यात खूप खंबीर बनणार आहात आणि प्रेम तसेच कुटुंबासंबंधी गंभीर परिस्थितीशी मुकाबला करता येईल पण त्यातून बराच फायदा होणार नाही. त्यामुळे शक्य होईल तितके स्वत:ला शांत ठेवा. तुमच्या तापट स्वभावामुळे नुकसान होणार नही व शत्रुत्व वाढणार नाही, याची विशेष काळजी वर्षभर घ्यावी लागेल.

इतर राशी :-  मेष   वृषभ   मिथुन   कर्क   सिंह   कन्या   तुळ   वृश्चिक   धनु   मकर    कुंभ   मीन 



No comments:

Post a Comment