Wednesday, January 02, 2013

वार्षिक राशी भविष्य २०१३ - वृश्चिक - Yearly horoscope 2013 - Scorpio

वार्षिक राशी भविष्य २०१३ - वृश्चिक 
वृश्चिक 

नूतन वर्षाभिनंदन... 
         गुरू वर्षाच्या सुरवातीला तुमच्या राशीच्या सातव्या घरातून जाणार आहे. त्यामुळे तुमच्या महत्वाकांक्षा वाढतील. वैवाहिक जीवनात सुख उपभोगता येईल.        कुटुंबात शुभ आणि मंगल प्रसंगांचा योग आहे. शेअर बाजार तसेच सट्टा बाजारातील गुंतवणुकीत फायदा होईल. भौतिक सुख देणा-या घरातील वस्तूंच्या संख्येत वाढ होईल. प्रेमात पडण्याचा योग आहे. 
        ३१ मे २०१३ ला गुरू मिथुन राशीत प्रवेश करेल आणि जो तुमच्या राशीच्या आठव्या घरातुन जाईल. ज्यामुळे शारीरिक आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यामध्ये खर्च होईल. वर्षाच्या सुरवातीला शनी तुमच्या राशीच्या बाराव्या घरातून जाईल. ज्यामुळे शनी आणि राहुच्या व्ययामुळे शापिक दोष तयार होईल.
             या दोषामुळे शारीरिक कष्ट आणि अधिक परिश्रमामुळेच यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नातेवाईंकांबरोबर वैचारीक मतभेद होतील. कमाईपेक्षा खर्च जास्त असेल. मुलांसंदर्भातीलत चिंता वाढेल. कायदा आणि कोर्टाच्या कामात अपयश येईल त्यामुळे तुम्ही कोर्टाची पायरी न चढलेलीच बरी. तसेच कर्ज होणार नाही याकडे खास लक्ष असू द्या.
           तुम्हाला हे वर्ष एखाद्या रोलर कोस्टर राईडप्रमाणे वाटेल, पण ही राईड सकारात्मक असेल. तुम्ही एखाद्या लहान मुलांप्रमाणे या वर्षी आनंदी क्षण उपभोगणार आहात. तुमच्या घरात तसे आनंदी वातावरण राहील. पण काही वाद तुम्हाला निराश करतील. कदाचित घरातल्या सदस्याचे अनारोग्य तुम्हाला व्यथित करणारे ठरेल. परंतु तुम्ही मात्र यावर्षी तंदुरुस्त राहणार आहात. निराशेचे काही क्षण येतील, पण त्याला न जुमानता काम करीत राहिलात, तर अखेर सफतला मिळेल.
               जून ते ऑक्टोबर १३ या काळात तुमच्या जीवनभर मोठा परिणाम घडवून आणणारे बदल संभवतात. ते स्वीकारण्याची मानिसक तयारी ठेवा. मे २०१३ पर्यंत कामात बरीच मजल माराल. नंतर थोडीशी आर्थिक विवंचना राहील. जूनमध्ये ऐखाद्या महत्त्वाच्या संक्रमणाच्या उंबरठ्यावर तुम्ही असाल. तुम्ही ज्या माणसावर प्रेम करता त्याच्यासोबत बराच वेळ घालवता येईल. तरुणांचे विवाह ठरतील. नवीन जागेत राहावयास जाण्याचे बेत ठरतील. पण तुम्हाला वर्षच्या उत्तरार्धात सावध पवित्रा बाळगला पाहिजे. हे वर्ष करिअर,पैसा आणि शिक्षणाच्या दृष्टीने फार अनुकूल असणार आहे. फक्त गरज आहे ती शक्य तितके प्रयत्न करण्याची आणि त्यानंतर तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसून येतील.
              जानेवारी २०१३ या महिन्यात तुमच्या घरात तसे आनंदी वातावरण राहील. पण काही वाद तुम्हाला निराश करतील. कदाचित घरातल्या सदस्याचे अनारोग्य तुम्हाला व्यथित करणारे ठरेल. परंतु तुम्ही मात्र या महिन्यात तंदुरुस्त राहणार आहात. निराशेचे काही क्षण येतील, पण त्याला न जुमानता काम करीत राहिलात, तर अखेर सफतला मिळेल. तुम्ही ज्या माणसावर प्रेम करता त्याच्यासोबत बराच वेळ घालवता येईल. तरुणांचे विवाह ठरतील. नवीन जागेत राहावयास जाण्याचे बेत ठरतील.





No comments:

Post a Comment