Wednesday, January 02, 2013

वार्षिक राशी भविष्य २०१३ - मीन - Yearly horoscope 2013 - Pisces

वार्षिक राशी भविष्य २०१३ - मीन 
मीन 

नूतन वर्षाभिनंदन... 
        वर्षाच्या सुरुवातीला गुरू तिस-या घरातून जात असल्याने साहसी कामांमध्ये यश मिळेल. कुटुंबात चांगली कामे होतील. व्यावसायिक क्षेत्रात फायदा होईल.         छोट्या ट्रीपचा योग आहे. कोर्टाच्या कामामध्ये यश मिळेल. नोकरीत फायदा होईल. सध्याचे राहते घर बदलावे लागेल. वाहतुक, पर्यटन, कम्युनिकेशन, प्रकाशन सारख्या व्यवसायामध्ये नवीन बदल करु शकता. 
         ३१ मे २०१३ पासून गुरु मिथुन राशीत भ्रमण करत असेल. त्यामुळे नवीन घर किंवा दुकान किंवा वाहन घेण्याचा योग आहे. दलाली - कमिशनच्या व्यवसायात फायदा होईल. ट्रीप फायदेशीर ठरेल. महत्वकांशा वाढतील, वर्षाच्या सुरवातीला शनी आठव्या घरात तुळ राशीत वर्षाच्या शेवटपर्यंत राहील.
          २४ डिसेंबर २०१२ पासून राहु आठव्या घरात आणि केतु कुटुंबस्थानावर येईल. त्यामुले तुम्हाला जास्त कष्ट करावे लागतील. तुमच्या शत्रुंमुळे तुम्हाला त्रास होईल. समाजातील प्रतिष्ठा कमी होईल. नोकरीमध्ये त्रास होईल. मानहानी होऊ शकते. मुलांसबंधीत विषयांची चिंता वाढेल. पत्नीच्या आरोग्याच्या समस्य उद्भवतील. कमाईपेक्षा खर्च जास्त असेल.
          २०१३ हे वर्ष तुमच्या करिअरच्या दृष्टीने चांगले नसेल. तुमचे उच्च अधिकारातील व्यक्तींसोबत गंभीर स्वरूपाचे वाद होतील. त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्यावर दिसेल. तुमच्याकडे २०१३ साल स्व-नियंत्रण आणि प्रगल्भतेची मागणी करत आहे. तुमची आर्थिक स्थिती फार बळकट नसल्याने भरमसाठ पैसा लागणारी गुंतवणूक टाळा. धंदा-व्यवसायाबाबत तुमची उमेद मोठी असेल. जानेवारी २०१३ या काळात इतर वेळेला अशक्य वाटणार्‍या कामातही तुम्ही यशस्वी व्हाल. 
        जून २०१३ नंतर परदेशगमनाची संधी येईल. पैशाच्या पाठीमागे धावून हाती असलेल्या कामावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्या. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या उन्नतीसाठी काम कराल. पण त्यांच्याकडून तुमचे कौतुक होण्याची शक्यता दिसत नाही. तुमच्या आरोग्याची तपासणी करावी. अन्यथा काही गंभीर स्वरुपाचे त्रास होऊ शकतात. प्रामुख्याने त्वचा आणि रक्तसंबंधी. तुमच्या प्रेमसंबंधांना गृहीत धरू नका. तुमच्या प्रेमसंबंधी निर्णयांवर ठाम राहण्याची आवश्यकता आहे. जून २०१३ नंतर तुमचे विचार बदलतील व प्राधान्यक्रम ठरवून त्याप्रमाणे कामे हाती घ्याल.जानेवारी २०१३ नंतरच्या काळात इतर वेळेला अशक्य वाटणार्‍या कामातही तुम्ही यशस्वी व्हाल. 

No comments:

Post a Comment