Wednesday, January 02, 2013

वार्षिक राशी भविष्य २०१३ - सिंह - Yearly horoscope 2013 - Leo

वार्षिक राशी भविष्य २०१३ - सिंह 
सिंह 

नूतन वर्षाभिनंदन...
           वर्षाच्या सुरुवातीला गुरु तुमच्या राशीच्या दहाव्या घरातून जाईल. त्यामुळे व्यावसाय आणि व्यापार क्षेत्रात चांगली प्रगती होईल. संपत्ती, घर जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल.
           नोकरीत प्रमोशन मिळेल. मात्र त्याबरोबरच राहुचा प्रभाव असल्याने हे फळ अंशत : कमी होईल. १ जून २०१३ पासून गुरू तुमच्या लाभ स्थानावरुन जाईल. ज्याचा प्रभाव वर्ष संपेपर्यंत असणार आहे. त्यामुळे तुम्हाला सामाजिक मान सन्मान मिळेल. धर्म, अध्यात्म आणि तत्वज्ञान विषयात तुमची आवड वाढेल.

           शेअर बाजार तसेच सट्टा बाजारच्या व्यवहारात फायदा होईल. वर्षाच्या सुरवातील शनि तुमच्या राशीच्या तिस-या घरातून म्हणजे तुळ राशीतून जाणार आहे. तसेच २४ डिसेंबर २०१२ पासून राहु तुळ राशीच्या तीस-या घरात आणि केतू भाग्य स्थानावरुन जाईल. त्यामुळे हिंम्मत आणि पुरुषार्थाच्या मदतीने व्यावसायिक क्षेत्रात फायदा होईल. मुलांबरोबर वैचारीक वाद होतील. जमीन- धन आणि भौतिक सुख मिळेल.
            २०१३ हे वर्ष गुंतवणुकीच्या बाबतीत उत्तम आहे. या राशीच्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजे आणि उच्च शिक्षणाचे ध्येय ठेवले पाहिजे. त्यांना नक्कीच फलदायी परिणाम मिळतील. यावर्षी तुमचे नातेसंबंध अधिक गहिरे होण्याची शक्यता आहे. तुमचे कुटुंबासोबतचे नाते अधिक दृढ होतील आणि घरात आनंद तसेच समाधानाचे वातावरण असेल. सर्वात उत्तम भाग म्हणजे २०१३ हे वर्ष तुम्हाला मानसिक शांती देणारे असेल. कामानिमित्ताने कदाचित परदेशवारीही होईल. जानेवारीमध्ये खेळत्याभांडवलाची तरदूत करावी लागेल. नोकरीत येणारा काळ अनुकूल आहे. तुमच्या गुणांची कदर होईल. खास प्रशिक्षणासाठी तुमची निवड होईल. बेकार व्यक्तींना मे २०१३ पर्यंत काम मिळेल.
            तरुणांचे विवाह ठरतील व पार पडतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यशप्राप्ती होईल. सामाजिक क्षेत्रातील लोकांना स्वत:च्या क्षेत्रात नाव कमवता येईल. हे साल तुमच्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे. तुम्ही ज्या गोष्टीला हात लावलं त्याचे सोने होईल आणि जरी हात लावला नाही तरी नक्कीच अन्य मार्गाने तुम्हाला फायदा संभवतो. जानेवारी २०१३ - जानेवारीमध्ये खेळत्याभांडवलाची तरदूत करावी लागेल. नोकरीत येणारा काळ अनुकूल आहे. तुमच्या गुणांची कदर होईल. खास प्रशिक्षणासाठी तुमची निवड होईल. तरुणांचे विवाह ठरतील व पार पडतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यशप्राप्ती होईल. सामाजिक क्षेत्रातील लोकांना स्वत:च्या क्षेत्रात नाव कमवता येईल. हा महिना तुमच्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे. तुम्ही ज्या गोष्टीला हात लावलं त्याचे सोने होईल आणि जरी हात लावला नाही तरी नक्कीच अन्य मार्गाने तुम्हाला फायदा संभवतो. 





No comments:

Post a Comment