खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Saturday, March 30, 2013

स्मार्ट टिप्स - मोबाईलचे बिल कमी करण्यासाठी काही अफलातून पर्याय.

                                       आज आपण बघणार आहोत मोबाईल बिल कसे कमी करता येईल आणि त्यासाठी काही अफलातून पर्याय. अनेक लोक बिल बजेटपेक्षा अधिक आले की त्रस्त होतात, प्रीपेड असेल तर सारखे रिचार्ज करून वैतागलेले असतात. आता अशा लोकांसाठी खास Applications आली आहेत, काही applications ही पूर्वीपासूनच आहेत परंतु ती भारतामध्ये वापरता येत नव्हती. आता आपण ती भारतात देखील वापरू शकतो. त्यांचा वापर केल्यावर आपण आपल्या मोबाईलचे बिल कमी करू शकतो. विशेष म्हणजे यापैकी बहुतांश applications मोफत आहेत. या अशा काही निवडक apps ची ही माहिती :-

  • स्काईप (skype) :- हे Application आपण आपल्या फोन किंवा कॉम्प्युटरवर डाउनलोड करून आपल्या मित्र आणि नातेवाईकांशी मोफत व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग करून बोलू शकतो. मोफत कॉलिंग हे केवळ स्काईप ते स्काईप करता येते त्यासाठी ज्या व्यक्तीबरोबर आपण संपर्क साधणार आहोत त्याच्याकडे देखील हे application असणे आवश्यक आहे. स्काईप हे Android, IOS आणि Windows OS बरोबरच आपल्या कॉम्प्यूटरलाही सपोर्ट करते. हे App. आपल्या मोबाईल किंवा सिस्टीम मध्ये Install केल्यावर आपण आपल्या मित्रांच्या संपर्कात राहू शकतो व बोलू शकतो. 
  •  निंबज (Nimbuzz) :- हे Application आपण IOS, Android, आणि Symbian Platform च्या स्मार्टफोनबरोबरच फिचर फोन आणि कॉम्प्यूटरमध्येही Install करू शकतो. त्याच्या मदतीने IOS Platform वर रन करणारे आयफोन आणि कॉम्प्यूटरवर व्हिडीओ कॉल करू शकतो. याशिवाय आपण Android आणि Symbian वर Text message द्वारेही संपर्क साधू शकतो. 
  • ओवियो (ooVoo) :- हे Application विशेषतः ग्रुप व्हिडीओ चाट करणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त आहे. याच्या माध्यमातून एकाचवेळी बारा लोक मोफत व्हिडीओ चाटच्या माध्यमातून एकमेकांशी बोलू शकतात. हे एकावेळी चार लोकांनाच दाखवते. ओवियो हे स्मार्टफोन आणि कॉम्प्यूटर अशा दोन्हीला सपोर्ट करते. ओवियोवर  आपण आपल्या फेसबुक फ्रेंड आणि ट्विटरवरच्या फॉलोअरशी व्हिडीओ व व्हॉईस कॉल करू शकतो.
  • व्ही चाट (Vchat) :- या माध्यमातून आधी फ्री व्हिडीओ कॉलिंग करता येत नव्हते. मात्र आता यामध्ये फ्री व्हिडीओ कॉलिंग करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या App. च्या माध्यमातून आपण ग्रुप Text message ही आपल्या मित्रांना पाठवू शकतो. 
  • फ्रिंग (fring) :- याचे फंक्शनही स्काईपशी मिळतेजुळते आहे. मात्र हे IOS, Android आणि Symbian Platform वर चालणाऱ्या डिव्हाईसवरच काम करते. हे कॉम्प्यूटरवर सपोर्ट करीत नाही. फ्रिंग युजर्स मोफत व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल करण्याबरोबरच आपापसात चाटही करू शकतात. 

0 टिप्पणी पोस्ट करा:

Post a Comment