खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Sunday, December 28, 2014

संगणक म्हणजे काय? - What is computer ?

 " संस्कार माहिती तंत्रज्ञानाचे "
         अनेक दिवसांपासून आपण केवळ राशी भविष्य आणि दिनदर्शिका  ब्लॉगवर पहिले असेल परंतु वाचकांना काय आवडते ह्याचे भान ठेऊनच असे लेख लिहिले जातात असो आपण ते जरूर वाचावे तसेच सध्याच्या जगामध्ये संगणक अर्थात कॉम्प्यूटर ह्याचे काय महत्व आहे हे मी वेगळे सांगायला नको. म्हणूनच खास वाचकांसाठी मी एक संगणक विषयक मालिकाच घेऊन आलो आहे. त्याचे नाव "संस्कार माहिती तंत्रज्ञानाचे" असे योजिले आहे. यामध्ये आपण सुरुवातीला संपूर्ण संगणकाविषयी माहिती घेणार आहोत आणि हळूहळू त्यामध्ये होत गेलेले बदल आणि सुधारणा ह्याविषयी जाणून घेऊ. 

संगणक म्हणजे काय? 
          संगणकाला इंगजीमध्ये कॉम्प्युटर (Computer) असे म्हणतात. 'Computer' हा शब्द 'compute' (कॉम्प्यूट) या इंग्रजी क्रियापदा पासून बनला आहे. COMPUTER म्हणजे आकडे मोड़ किंवा गणना करणे.५० वर्षांपूर्वी जेव्हा कॉम्प्युटर हा शब्द प्रचलित झाला तेव्हा संगणक या यंत्राचा वापर मुख्यतः आकडे मोड़ करण्यासाठीच केला जात असे, परंतु दिवसेंदिवस या यंत्रात अनेक सुधारणा होत गेल्या व अलीकड़े संगणकाचा वापर तर अनेक प्रकारे होवू लागला आहे. उदा. माहिती पाठवणे, तिचे वर्गीकरण करणे इतकेच नाही तर ध्वनी निर्मिती, चित्रीकरण अन्य असंख्य कामासाठी संगणकाचा वापर होवू लागला आहे. थोडक्यात सांगायचे झाले
तर संगणक हे माहिती स्वीकारणारे, दिलेल्या सूचना नुसार माहिती प्रक्रिया करून अचूक उत्तर देणारे वेगवान इलेक्ट्रोनिक्स यंत्र आहे.


की-बोर्ड
की-बोर्ड-keyboard
की-बोर्ड हे संगणकाचे इनपुट डिवाइस आहे. की-बोर्ड च्या सहाय्याने आपणास संगणकाशी संवाद साधणे शक्य होते. संगणकाला माहिती देण्यासाठी किंवा विशिष्ठ सूचना देण्यासाठी की-बोर्ड चा वापर होतो. की-बोर्ड  सामान्यतः टाइप रायटर सारखा असतो. आपण संगणकावर जशी की(कळ) की-बोर्ड वर टाइप करतो तशीच अक्षरे स्क्रीन वर येतात.
की-बोर्ड मध्ये काही बटन विशिष्ठ चिन्ह काढण्यासाठी असतात .



की-बोर्ड साधारणपणे चार प्रकारचा असतो:-
१) फंक्शनल की-पॅड २) अल्फा न्युमरिकल की-पॅड ३) न्युमरिकल की-पॅड ४) कर्सर की-पॅड 

१) फंक्शनल की-पॅड :- या मध्ये F1 ते F12 अशा फंक्शनल कीज् असतात. ह्या सर्व विशिष्ट कामा साठीच वापरतात.
२) अल्फा न्युमरिकल की-पॅड :- या मध्ये A ते Z ही इंग्रजी मुळाक्षरे असतात. एकूण २६ आणि ० ते ९ असे अंक असतात .
३) न्युमरिकल की-पॅड :- यात ० ते ९ असे अंक असतात आणि काही विशिष्ठ कीज्  काही विशिष्ठ कामा साठीच वापरतात .
४) कर्सर की-पॅड :- लेफ्ट, राइट, अप, डाउन ह्या जागेवर जायचे असल्यास ह्या कीज्  चा उपयोग केला जातो.
की-बोर्डवर साधारणतः कमीत कमी ८३ तर जास्तीत १२७ बटन असतात. सर्व साधारण की बोर्ड वर ११० कीज्  असतात. ज्या की-बोर्ड वर ११० कीज पेक्षा जास्त कीज् असतात त्याला मल्टीमीडिया की-बोर्ड असे म्हणतात.

की-बोर्ड CPU च्या मागील भागाला जोडलेले असते. की-बोर्ड नॉर्मल, पीस/२, युएसबी तसेच वायरलेस पोर्ट मध्ये उपलब्ध आहेत.
अनेक वेळा इंटरनेट वर अशाप्रकारचे की-बोर्ड ऑनस्क्रीन उपलब्ध असतात त्यांना व्हर्चुअल की-बोर्ड असे म्हणतात. 
                                                                               
माउस
माउस (Mouse)
की-बोर्ड इतके माउस आवश्यक नसले तरी विन्डोज़च्या जगात अतिशय उपयोगी पडणारे माउस हे इनपुट उपकरण आहे. माउस द्वारे अक्षरे किंवा अंक टाइप करता येत नाहीत. माउस हे दर्शक उपकरण आहे. माउस जसा आपण हलवतो तसा माउसचा पॉइन्टर/कर्सर हालतो. साधारण माउसला ३ बटन्स असतात. आता सध्याच्या माउस मध्ये २ बटन असतात आणि स्क्रोल्लिंगसाठी व्हिल २ बटणाच्या मध्ये असते. माउस CPU च्या मागील भागाला जोडले असते.  माउस सीरियल, युएसबी तसेच वायरलेस पोर्ट मध्ये उपलब्ध आहेत. माउसमुळे ग्राफिक्स, डिजाईन, चित्र, आकृत्या काढणे सहज शक्य होते. मायक्रोसॉफ्ट पेंट मध्ये माउस च्या सहाय्याने चित्र काढली जातात. प्रामुख्याने माउसचे ३ प्रकार आहेत.

मेक्यानिकल माउस :-
माउसचा हा सुरवातीचा प्रकार म्हणजेच ह्याच्या खालच्या भागाला एक लहानशी गोटी च्या आकाराचा रबरी बॉल असतो जो माउस सोबत फिरत असतो त्याची वायर CPU ला जोडलेली असते.
ऑप्टिकल माउस :- ह्या माउस ला खालच्या भागाला गोटी नसते. माउस च्या बाहेर पडणारा प्रकाश माउसच्या हालचालीवर नियंत्रण ठेवतो.
कॉर्डलेस माउस :-
अशा प्रकारचा माउस हा बॅटरीवर चालतो. CPU सोबत वायरलेस द्वारे चालतो. आशा माउस ला वायरलेस माउस देखिल म्हणतात .

माउस साधारण खालील प्रकारच्या क्रिया करतो .
१) क्लिक:- माउस चे डावे बटन एकदा प्रेस करून लगेच सोडून देणे या क्रियेला क्लिक असे म्हणतात. एखादी गोष्ट क्लिक करून आपण निवडू शकतो.
२) डबल क्लिक :- डावे बटन लागोपाठ दोनदा प्रेस करून सोडणे म्हणजे डबल क्लिक होय. एखादा प्रोग्राम  फाइल (ओपन) उघडण्यासाठी माउस मध्ये डबल क्लिक चा उपयोग करतात.
३) राईट क्लिक :- माउस चे उजवे बटन एकदा प्रेस करून लगेच सोडून देणे या क्रियेला राईट क्लिक असे म्हणतात . एखादी गोष्ठी संदर्भातील सुचानांची यादी आपण पाहू शकतो स्क्रीन वर .

हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय ?

हार्डवेअर (Hardware) म्हणजे इलेक्ट्रोनिक भागांनी जोडून तयार केलेला संगणक होय. उदा. मॉनिटर, की-बोर्ड, हार्ड डिस्क, मदर बोर्ड, कैबिनेट, माउस, सी डी रॉम, इत्यादी 

सॉफ्टवेअर (Software) म्हणजे संपूर्ण संगणकाचे चलन वलन ज्या प्रकारच्या सॉफ्टवेअर कडून नियंत्रित होत असते ते सॉफ्टवेअर. ऑपरेटिंग सिस्टीम (OS) हे संपूर्ण संगणक कार्यरत करणारा एक प्रोग्राम असतो.  . संगणकाचे हार्डवेअर व सॉफ्टवेअर शिवाय कुठलाच संगणक सुरु होत नाही. संगणक आणि त्यावर काम करणाऱ्या व्यक्ति मधील महत्वाचा दुवा म्हणजे सॉफ्टवेअर. 

संगणकाचे महत्वाचे भाग
संगणकाचे महत्वाचे भाग

1 टिप्पणी पोस्ट करा: