खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Monday, March 25, 2013

स्मार्ट टिप्स - वाढवा मोबाईल फोनचा बॅटरी बॅकअप.

                                      ज आपण बघणार आहोत मोबाईल फोनसाठी लागणारी बॅटरी अधिक काळासाठी कशी ऊर्जा देईल यासाठी महत्वपूर्ण टिप्स. अलीकडच्या काळात मोबाईल, स्मार्टफोनची चलती किती आहे, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. गुगलच्या Android OS वाल्या स्मार्टफोनची चलती सध्या खूप वाढत आहे. पण, साधारण जावा फोनच्या तुलनेत स्मार्टफोनची बॅटरी जास्त लवकर संपते, अशी अनेकांची तक्रार आहे. एकाचवेळी अनेक Applications active केल्याने Android फोनची बॅटरी जास्त वापरली
जाते. पण, काही गोष्टी पाळल्या तर स्मार्टफोनचा बॅटरी बॅकअप जास्त वाढवता येऊ शकतो.
बॅटरीज 

  • आपल्याला आपल्या स्मार्टफोनमध्ये हाय स्पीड डाटा आणि थ्री जी नेटवर्कची गरज नसेल तर आपण टू जी नेटवर्क सिलेक्ट करू शकतो. त्यासाठी आपण वायरलेस कंट्रोल्स, मोबाईल नेटवर्क, यूज ओन्ली टू जी नेटवर्क हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. अनेकदा आपण ज्या जागी असतो तेथे थ्री जी नेटवर्कचे सिग्नल येत नाहीत. फोनमध्ये वायरलेस कनेक्टीव्हीटीची गरज नसेल तर ती ऑफ करावी. त्यासाठी ब्ल्यू टूथ, वायफाय बंद करता येतील. 
  • आपल्या स्मार्टफोनचा बॅटरी बॅकअप वाढवण्यासाठी आपण फोनच्या स्क्रीनमध्ये देण्यात आलेली ब्राईटनेस कमी करू शकता. त्यासाठी आपण सेटिंग्ज, साऊंड आणि डिस्प्ले, ब्राईटनेस मध्ये जाऊन ब्राईटनेस सेट करू शकता. टच स्क्रीन आणि मोठा आकार असल्यानंतर सर्वात जास्ती पॉवर स्क्रीनमध्येच खर्च होते. साधारण टच स्क्रीनच्या तुलनेत Amold स्क्रीनमध्ये कमीप्रमाणात वापरली जाते. 
  • आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनचा टाईम आउट कमीत कमी वेळेसाठी सेट करावा. त्यासाठी सेटिंग्ज, साऊंड आणि डिस्प्ले, स्क्रीन टाईम आउटमध्ये जाऊन आपण स्क्रीन टाईम आउट सेट करू शकता. आपण किती वेळानंतर आपल्या मोबाईलची स्क्रीन ऑटोमेटिक ऑफ करू इच्छिता, यासाठी यामुळे आपल्याला मदत मिळू शकते. ती वेळ कमीत कमी असली पाहिजे. 
  • आवश्यकता नसेल त्यावेळी ब्ल्यू टूथ, वायफाय यासारखी स्मार्टफोन तसेच मोबाईलची वायरलेस फीचर्स आपण ऑफ ठेवू शकता. गरज भासेल त्यावेळी ती ऑन करा. प्रत्येकवेळी ब्ल्यू टूथ सातत्याने ऑन राहिल्यामुळे बॅटरी जास्त प्रमाणात खर्च होते. 
  • फोनच व्हायब्रेशन फंक्शन बंद ठेवल्यानेही बॅटरी जास्त वेळ चालू शकते. त्यासाठी सेटिंग्ज आणि डिस्प्ले, फोन व्हायब्रेट यामध्ये जाऊन आपण व्हायब्रेट फंक्शन ऑफ करू शकता. काही लोकांना आपला फोन व्हायब्रेट फंक्शनवर असावा, असं वाटतं. पण, असं केल्यामुळे बॅटरीचा बॅकअप कमी होतो. त्याचबरोबर आपण रिंग व्हॉल्यूम लेव्हलही कमी करू शकता. अशा विविध गोष्टी पाळल्या तर आपल्या मोबाईल तसेच स्मार्टफोनचा बॅटरी बॅकअप वाढू शकतो. 

5 टिप्पणी पोस्ट करा:

  1. khup chan mahiti dili ahe...yacha nakkich fayada hoel!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ! आणि आपण comment केल्याबद्दल आपले आभार :)

      Delete
    2. For Android OS ..there is app called "Juice defender".
      this app optimizes power consumption to give you extra hours of precious battery life.
      you can get information & practical video about this app on site.... www.juicedefender.com

      .........have a nice day.






      Delete
    3. Thanks swanand for your extra information about battery saver for Android OS, its very useful for us.

      Delete
  2. Chhan mahiti dilyabaddal dhanyawad!!

    ReplyDelete