वार्षिक राशिभविष्य २०१५ - मेष रास - Yearly horoscope 2015 - Aries
नववर्षाभिनंदन, मेष राशीच्या व्यक्तींवर त्यांच्या स्वामीकडून, गुरुकडून कृपादृष्टीचा वर्षाव होणार आहे. तुमच्या नवव्या ग्रहाचा स्वामी (भाग्यादशा) तुमच्या चौथ्या आणि पाचव्या घरात असणार आहे. त्यामुळे २०१५ सालातील पहिले सहा महिने कौटुंबिक आयुष्य सुखाचे राहील. तुम्ही परदेशात जाण्यासाठी प्रयत्न करत असाल तर हा काळ
तुमच्यासाठी अनुकूल आहे. नवीन कार किंवा घर घ्यायचे आहे ? थोडेसे प्रयत्न करा तुमची इच्छा पूर्ण होईल. दुसर्या सहामहिन्याचा काळ प्रेम आणि लग्नासाठी एकदम योग्य आहे. ज्या दाम्पत्यांना अपत्य हवे आहे त्यांना या कालावधीत अपत्यप्राप्ती होईल. उद्योजक त्यांच्या कामाची व्याप्ती वाढवतील. तुम्ही एखाद्या नवीन योजनेसह नवे काम सुरु कराल. राशी भविष्य २०१५ अनुसार तुम्हाला या काळात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक वृद्धीसाठी हा सुयोग्य काळ आहे. असे असले तरी आठव्या घरात असलेला शनि आणि सहाव्या घरात असलेला राहू यामुळे तुमच्या कौटुंबिक आणि आरोग्याच्या आघाडीवर तुम्ही स्वस्थ नसाल. तुम्ही याबाबत वेळोवेळी विचर करायला हवा. १२व्या घरात असलेल्या केतू हेच दर्शवतो की, तुम्ही अडचणीत सापडून अतिउत्सहिपणे वागण्यापेक्षा दुसर्यांचा सल्ला घेणे चांगले. विद्यार्थ्यांच्या कष्टाचे चीज होईल.
मेष राशीच्या व्यक्तींसाठी २०१५ सालात करण्याचे उपाय : चांदीची चौरसाकृती वस्तू स्वतःजवळ ठेवा.
0 टिप्पणी पोस्ट करा:
Post a Comment