खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Wednesday, April 24, 2013

Paypal आणि Payza चे अकौंट कसे काढायचे आणि त्याचे फायदे.

                                      मित्रांनो, आज पर्यंत बऱ्याच लोकांना असा प्रश्न सतत जाणवत होता किंवा अनेक दिवस बरेच लोक एका गोष्टीच्या शोधत होते ते म्हणजे इंटरनेटवरून घरबसल्या पैसे कसे कमवित येतील. आणि हे खरच शक्य आहे का ? तर ते आपण Earn Money online - इंटरनेटवरून पैसे कमवा ! ह्या लेखाद्वारे पहिले आहे, जर अजूनही कोणाच्या मनात शंका असतील आणि कोणी registration केले नसेल तर त्यांनी Neobux इथे जाऊन आत्ताच registration करा. आणि ज्यांनी registration केले आहे त्यांचे अभिनंदन. 
payza 
                                 
paypal 







Sunday, April 21, 2013

Earn Money online - इंटरनेटवरून पैसे कमवा !

                                                  मित्रांनो, घरबसल्या पैसे कमवा ! महिन्याला ८ ते १० हजार रुपये कमवा आणि त्यासाठी आधी थोडे पैसे खाली नमूद केलेल्या अकौंटला भरा. अश्या अनेक जाहिराती आपण कायम वाचत असतो. आणि कित्येक जण अश्या अनेक जाहिरातींना बळी पडत असतात. पण हे अगदी चुकीचे आहे. मी तर म्हणतो हा निव्वळ मूर्खपणा आहे. कारण निदान आपण जर इंटरनेट वर काम करून देणार असू तर त्यासाठी पहिल्यांदा आपण पैसे भरण्याचे कारणच काय ? ज्या अधिकृत वेबसाईट असतात त्या आपल्याकडून कोणतीही फी घेत नाहीत हे लक्षात ठेवा, त्यासाठी मी तुम्हाला अनेक अशा अधिकृत वेबसाईट सांगणार आहे ज्यामध्ये आपणास एकही रुपया खर्च येणार नाही. केवळ आपले registration महत्वाचे असेल. खरेतर इंटरनेटवरून पैसे कमविण्याचे अनेक मार्ग आहेत. हे मार्ग खालील पर्यायांमध्ये विभाजित होतात. :-

Tuesday, April 16, 2013

Live IPL T20 Cricket Score Board - Ball by Ball updates.


Live IPL T20 Cricket Score Board - Ball by Ball updates.

Saturday, April 06, 2013

स्मार्ट टिप्स - कॉम्प्यूटर हार्डडिस्कच्या स्वास्थ्यासाठी महत्वपूर्ण माहिती.

                                              संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)
                          आज आपण बघणार आहोत संगणकाच्या हार्डडिस्कची देखभाल. अनेक वेळा आपला संगणक किंवा Laptop ह्यामधील हार्डडिस्कचा विचित्र आवाज येत असतो किंवा संगणक अगदी हळू हळू प्रोसेस करत असतो अश्यावेळी हार्डडिस्क किती प्रमाणात कार्यरत आहे हे जाणून घेणे महत्वाचे ठरते. तर हार्डडिस्कची तपासणी करण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत ते आपण पाहू. 

Monday, April 01, 2013

मासिक राशिभविष्य एप्रिल २०१३


मासिक राशिभविष्य एप्रिल २०१३ 


मासिक राशिभविष्य - प्रत्येक महिन्याचे राशिभविष्य जाणून घेण्यासाठी खालील राशीवर क्लिक करा :-


Saturday, March 30, 2013

स्मार्ट टिप्स - मोबाईलचे बिल कमी करण्यासाठी काही अफलातून पर्याय.

                                       आज आपण बघणार आहोत मोबाईल बिल कसे कमी करता येईल आणि त्यासाठी काही अफलातून पर्याय. अनेक लोक बिल बजेटपेक्षा अधिक आले की त्रस्त होतात, प्रीपेड असेल तर सारखे रिचार्ज करून वैतागलेले असतात. आता अशा लोकांसाठी खास Applications आली आहेत, काही applications ही पूर्वीपासूनच आहेत परंतु ती भारतामध्ये वापरता येत नव्हती. आता आपण ती भारतात देखील वापरू शकतो. त्यांचा वापर केल्यावर आपण आपल्या मोबाईलचे बिल कमी करू शकतो. विशेष म्हणजे यापैकी बहुतांश applications मोफत आहेत. या अशा काही निवडक apps ची ही माहिती :-

Friday, March 29, 2013

दुष्काळाची भयंकर स्थिती- जबाबदार कोण? निसर्ग की सरकार ??

दुष्काळाची भयंकर स्थिती 
                         आज सगळीकडे पाणी जपून वापरा ! हे ऐकायला मिळत आहे, हे नक्की कशासाठी? सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी ? हो फक्त सामाजिक बांधिलकी साठी असेल तरी ते योग्यच आहे. कारण दुष्काळाने होरपळून निघालेली जनता,
ही विदर्भ, मराठवाडा आणि काही महाराष्ट्राचे इतर दुष्काळी भागांमध्ये मोठ्याप्रमाणावर आहे. हीच जनता नाईलाजाने आता शहरांकडे स्थलांतर करत आहे. नक्की ह्यामध्ये दोष कोणाचा ? निसर्गाचा की सरकारचा ??

Tuesday, March 26, 2013

kultejas ब्लॉगचा २ वर्षांमधील आढावा - दुसरया वाढदिवसाच्या निमित्ताने.

 
                                               नमस्कार मित्रांनो, आज आपणा सर्वांना सांगताना अतिशय आनंद होतो की, kultejas ह्या ब्लॉग ला सुरुवात करून २७ मार्च २०१३ रोजी दोन वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने आपण ह्या ब्लॉगच्या दोन वर्षामधील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेणार आहोत.
                                               ह्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये kultejas ह्या ब्लॉगला मिळालेला तुमचा मोठा प्रतिसाद आणि असंख्य असा वाचक वर्ग ह्यासर्वांचा मी मनापासून आभारी आहे. मला आठवतयं २७ मार्च २०११ पूर्वी इंटरनेटवर असंख्य software शोधण्याचे वेड मला होते. जवळजवळ १ वर्ष; जून २०१० मध्ये आमच्याकडे इंटरनेट आले तेंव्हा पासून मला तो एक छंदच जडला होता. त्यानंतर एकदा स्टार माझा ह्या news channel वर मला ब्लॉग माझा ह्या स्पर्धेविषयी कळाले. त्याच वेळेपासून मी हा एक नवीन उपक्रम करायचा म्हणून हा ब्लॉग सुरु केला. ह्या माध्यमातून हळूहळू नवीन नवीन विषयांवर लेख लिहिण्याचे ठरवले परंतु नंतर असे वाटू लागले कि आपण जे लिहित आहोत त्याचे वर्गीकरण कोणत्या विषयामध्ये होऊ शकेल ? हा प्रश्न पडताच मी लिहिलेले लेख तपासून पाहिले तर प्रत्येक लेखाचे स्वतःचे असे वेगळे अस्तित्व होते. ह्याच अशा वेगवेगळ्या लेखांमुळे मला ह्या ब्लॉगची tag line मिळाली " जसं मनात येईल तसं…" त्यामुळे इथे मला

Monday, March 25, 2013

स्मार्ट टिप्स - वाढवा मोबाईल फोनचा बॅटरी बॅकअप.

                                      आज आपण बघणार आहोत मोबाईल फोनसाठी लागणारी बॅटरी अधिक काळासाठी कशी ऊर्जा देईल यासाठी महत्वपूर्ण टिप्स. अलीकडच्या काळात मोबाईल, स्मार्टफोनची चलती किती आहे, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. गुगलच्या Android OS वाल्या स्मार्टफोनची चलती सध्या खूप वाढत आहे. पण, साधारण जावा फोनच्या तुलनेत स्मार्टफोनची बॅटरी जास्त लवकर संपते, अशी अनेकांची तक्रार आहे. एकाचवेळी अनेक Applications active केल्याने Android फोनची बॅटरी जास्त वापरली