खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Saturday, April 06, 2013

स्मार्ट टिप्स - कॉम्प्यूटर हार्डडिस्कच्या स्वास्थ्यासाठी महत्वपूर्ण माहिती.

                                              संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)
                          आज आपण बघणार आहोत संगणकाच्या हार्डडिस्कची देखभाल. अनेक वेळा आपला संगणक किंवा Laptop ह्यामधील हार्डडिस्कचा विचित्र आवाज येत असतो किंवा संगणक अगदी हळू हळू प्रोसेस करत असतो अश्यावेळी हार्डडिस्क किती प्रमाणात कार्यरत आहे हे जाणून घेणे महत्वाचे ठरते. तर हार्डडिस्कची तपासणी करण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत ते आपण पाहू. 

हार्डडिस्क
  • डिस्कर एरर चेक करा : स्टार्ट मेन्यूमधील रन हा पर्याय निवडून त्यामध्ये सीएचकेडीएसके (CHKDSK) असे टाईप करा आणि रन करा. डिस्क चेकिंग पूर्ण झाल्यानंतर जर काही एरर असेल तर तो आपल्याला दर्शविला जातो. तसेच तो दूर करण्यासाठीचे सोल्युशनही दर्शविले जाते. याबाबतच्या अधिक माहितीसाठी मायक्रोसॉफ्टची ही  लिंक पहा.
  • सीपीयूमधून आवाज येत आहे का ? : बऱ्याचवेळा आपल्या सीपीयूमधून विचित्र प्रकारचे आवाज येत असतात. आपण अशावेळी वरून हाताने मारून बघतो तेंवा ते तात्पुरते थांबले कि आपल्या मनाचे समाधान होते फार फार तर आपण सीपीयूची मागील पिन काढून पुन्हा लाऊन बघतो. असे सगळे 'प्रथमोपचार' करूनही आवाज येत राहिला तर तो तुमच्या हार्डडिस्कच्या आजाराबाबत सूचना देत आहे हे लक्षात ठेवा. हे आवाज कशामुळे येत आहेत हे जाणून घेण्यासाठी ही लिंक पहा.
  • घ्या सॉफ्टवेअरची मदत : हार्डडिस्क चेकअप करण्यासाठी काही सॉफ्टवेअरचाही आधार घेत येतो. बऱ्याचदा असे सॉफ्टवेअर्स इंटरनेटवर विनाशुल्क उपलब्धही असतात. मात्र ते डाऊनलोड करताना काळजी घ्या. बरेचदा ते फसवे असण्याची शक्यता असते. त्यातून तुमचा हार्डडिस्कमधील डेटा चोरीला जाण्याची अथवा संगणकाला नुकसान पोहोचविले जाण्याची शक्यता असते. डिस्क चेकिंगसाठी ही  लिंक पहा. 
  • हार्डडिस्क टेस्टर : बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या हार्डडिस्क मध्ये सिगेटच्या हार्डडिस्कना अधिक पसंती दिली जाते. आपल्याकडच्या बहुतांश संगणकाच्या हार्डडिस्कही सिगेटच्याच असतात. या प्रसिद्धीमुळे तसेच मोठ्याप्रमाणावर वापरामुळे सिगेटने आपल्या ग्राहकांसाठी काही टूल्सही विकसित केले आहेत जे फक्त सिगेटच्याच नव्हे तर अन्य कंपन्यांच्या हार्डडिस्कही टेस्ट करतात. हे टूल्स पुढील लिंक वर उपलब्ध आहेत.लिंक पहा.

0 टिप्पणी पोस्ट करा:

Post a Comment