वार्षिक राशिभविष्य २०१९ - धनु रास - Yearly horoscope 2019 - Sagittarius
धनु राशीच्या २०१९ च्या राशी भविष्यानुसार या वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात तुम्हाला आरोग्यविषयक समस्या जाणवेल. प्रवासामुळे थकवा येईल. या वर्षात वाहन सांभाळून चालवा. करिअरचा विचार करता तुम्हाला संमिश्र परिणाम पाहायला मिळतील. या वर्षी तुम्ही करिअरमध्ये खूप चढ-उतार अनुभवाल.
तुम्हाला तुमच्या मेहेनतीचे फळ मिळेल. या वर्षात तुम्हाला कामाच्या ठिकाणी बढती मिळेल किंवा तुमच्या पगारात वाढ होईल. दुसरीकडे, आर्थिक बाबतीत परिस्थिती अनुकूल असेल. तुम्हाला विविध ठिकाणांहून आर्थिक मदत प्राप्त होईल. वडिलोपार्जित संपत्तीत वाढ होईल.
२०१९ च्या राशीभविष्यानुसार तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कुटुंबियांकडून तुम्हाला मदत होईल. तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल किंवा फर्म स्थापन केलीत तर तुम्हाला आर्थिक नफा होईल. या वर्षात तुम्ही तुमच्या शृंगारिक आयुष्याबद्दल गंभीर व्हाल. जोडीदाराशी काही वाद झाले तरी ते वाढवू नका, उलट चर्चेने ते वाद सोडवा. कुटुंबियांची प्रकृती उत्तम राहील. आई-वडिलांच्या प्रकृतीच्या बारीकसारीक कुरबुरी राहतील.
0 टिप्पणी पोस्ट करा:
Post a Comment