वार्षिक राशिभविष्य २०१९ - सिंह रास - Yearly horoscope 2019 - Leo
सिंह राशीच्या २०१९ सालच्या भविष्यानुसार या वर्षात तुमचे आरोग्य उत्तम राहील. या वर्षाच्या सुरुवातीच्या
महिन्यांमध्ये तुम्हाला सर्दी होण्याची शक्यता आहे. तुम्हाला शारीरिक थकवा येईल आणि अशक्तपणा जाणवेल. परंतु
फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून तुमची प्रकृती सामान्य होईल. तुमच्या करिअरमध्ये यश मिळविण्यासाठी तुम्ही
खूप कष्ट कराल. करिअरचा विचार करता तुम्हाला यशाची चव चाखायला मिळेल पण या यशाने तुमचे समाधान होणार नाही.
कामाच्या ठिकाणी तुम्ही दाखविलेल्या चिकाटीमुळे तुमची एक नवी ओळख निर्माण होईल. तुम्हाला नव्या कार्यालयात
काम करण्याची संधी मिळेल. २०१९ च्या सुरुवातीच्या काळात तुमच्या करिअरच्या दृष्टीने चांगले परिणाम पाहायला
मिळतील. या वर्षात तुमच्या आर्थिक परिस्थितीबाबत तुरळक आव्हाने तुमच्या समोर येतील, पण तुम्हाला उत्तम परिणाम
मिळतील. तुमची आर्थिक बाजू बळकट असेल. जानेवारी वगळता फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यात तुमचे कदाचित
आर्थिक नुकसान होऊ शकते.
२०१९ च्या ग्रहस्थितीनुसार तुमच्या प्रेमजीवनात आव्हाने निर्माण होतील. त्यामुळे तुम्ही काकणभर अधिक काळजी
घेणे आवश्यक आहे. तुमच्या जोडीदाराशी वाद होण्याची किंवा गैरसमज होऊन नात्यात कडूपणा येण्याची शक्यता आहे.
0 टिप्पणी पोस्ट करा:
Post a Comment