खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Thursday, December 26, 2013

वार्षिक राशिभविष्य २०१४ - सिंह रास - Yearly horoscope 2014 - Leo

वार्षिक राशिभविष्य २०१४ - सिंह रास
नूतनवर्षाभिनंदन… 
नवीन वर्षात गुरुचे लाभस्थानातील आणि व्ययस्थानातील भ्रमण, मंगळाचे धनस्थानातील आणि तृतीयातील भ्रमण आणि शनीचे अनुकूल वास्तव्य यामुळे तुमच्या नेतृत्वगुणांना ‍आणि महत्त्वाकांक्षी स्वभावाला भरपूर वाव असेल. दानशूर म्हणूनच तुम्हाला ओळखतात. यंदा तरी ही संधी तुम्हाला चांगलीच लाभणार आहे. कारण जुनपर्यंत गुरूचे भ्रमण तुम्हाला शुभ आहे. देशात किंवा परदेशात कामाचा विस्तार कराल. जूननंतर आर्थिक गोष्टींवर लक्ष ठेवा. नाहीतर नाकापेक्षा मोती जड होईल. एप्रिल आणि सप्टेंबर महिन्यात नवीन करार करताना बेसावध राहू नका.

धंदा, व्यवसाय व नोकरी

नोकरदार मंडळींना जानेवारी, फेब्रुवारी किंवा जूननंतर बढती मिळेल. नोकरदार व्यक्तींच्या बर्‍याच वर्षाच्या इच्‍छा-आकांक्षा साकार करणारे वर्ष आहे. जूननंतर हळूहळू वरिष्ठ तुमच्यावर जबाबदार्‍या वाढवतील. 
गाडी किंवा घर आणि इतर सुखसुविधा खरेदी करून जोडीदाराला खूश ठेवाल. जूननंतर मात्र गुरू व्यवस्थानात जाईल. त्यामुळे हात आखडता घेणेच चांगले. ज्या मुलांना उच्च शिक्षणाकरिता किंवा नोकरीनिमित्त परदेशात जायचे आहे, त्यंना फेब्रुवारी ते जून हा कालावधी विशेष चांगला आहे. 


गृहसौख्य व आरोग्यमान

विवाहत्सुक तरुणांना मनपसंत जीवनसाथी निवडता येईल, त्याचे विवाहत रुपांतर मे महिन्यात होईल. नवविवाहितांच्या घरी एखादी सुखद बातमी जानेवारी महिन्यानंतर कळेल. मार्च एप्रिल, मे मध्ये प्रकृतीला सांभाळून जबाबदार्‍या स्वीकाराव्यात. वैवाहिक संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने जूनपर्यंत कालावधी चांगला आहे. नवीन व्यक्तींशी मैत्री झाल्यामुळे जीवनामध्ये बहार येईल. सिंह रास ही स्थिर गुणधर्माची, अग्नितत्वाची आहे. तिचा अधिपती रवी आहे व चिन्ह सिंह आहे. शुभरंभ पिवळा, शुभरत्न टोपाझ व अराध्य दैवत श्रीराम आहे. 

इतर राशी : मेष  वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ मीन 

0 टिप्पणी पोस्ट करा:

Post a Comment