वार्षिक राशिभविष्य २०१४ - मिथुन रास
नूतनवर्षाभिनंदन… राशीतील आणि धनस्थानातील गुरुचे भ्रमण अनुकूल, तर चतुर्थस्थानातील तसेच पंचमातील भंगळाचे भ्रमण प्रतिकूल असेल. गेले काही दिवस करू नका नको या संभ्रमात होतात तो विचार आता पक्का होईल. अस्थिरता कमी होईल. निदान मे पर्यंत बदलाचे धाडस करू नका. पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्हीही यशस्वी होतील.
धंदा, व्यवसाय व नोकरी
नोकरदार व्यक्तींना येत्या वर्षात संस्थेच्या आणि वरिष्ठांच्या धोरणामुळे त्यांना कामाला वेग देता येणार नाही. बढतीची अपेक्षा न ठेवता पगारवाढ किंवा अप्रत्यक्षरीत्या मिळणार्या सवलतींवर समाधान मानावे लागेल. व्यवसायात सहकार्यांना विश्वासात घ्या. एप्लि ते सप्टेंबरमध्ये भागीदारीत बतल नको. धार्मिक व सेवाभावी संस्थेचे काम करणार्या तसेच शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना जूननंतर बहुमानाने स्थान मिळेल. महिलांना आपल्या क्षेत्रात आघाडीवर राहता येईल. ज्यांना परदेशात जायचे आहे अशा मुलांकरिता आईवडिलांना पैशाची बरीच मोठी तरतूद करावी लागेल.
गृहसौख्य व आरोग्यमान
तरुण-तरुणींनी प्रेमसंबंधात अति घाई संकटात नेईल हे लक्षात ठेवावे. फेब्रुवारीत एखाद्या व्यक्तीविषयी आकर्षण वाटेल, पण भावनेच्या आहारी न जाता व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणे चांगले. विवाहोत्सुक तरुणांना जुलै-ऑगस्ट आणि ऑक्टोबर हेमहिने अनुकूल आहेत, पण त्यांनी निर्णय घाईने घेऊ नये. जुले ते सप्टेंबरअखेर घरात एखादी चांगली घटना घडेल. फेब्रुवारी, मार्च व मेमध्ये प्रकृतीच्या तक्रारी अगर अन्य कारणाने मानसिक अस्वस्थता जाणवेल. मात्र, काळजीचे कारण नाही.
मिथुन रास ही द्वीस्वभावी, वायू तत्त्वाची, जिचा अधिपती बुध आहे व चिन्ह जुळी मुले आहेत. शुभ रंग पिवळा-हिरवा, शुभरत्न - पाचू, टोपाझ व आराध्य दैवत पांडुरंग-विष्णू आहे.
इतर राशी : मेष वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ मीन
0 टिप्पणी पोस्ट करा:
Post a Comment