खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Wednesday, January 02, 2013

वार्षिक राशी भविष्य २०१३ - कर्क - Yearly horoscope 2013 - Cancer

वार्षिक राशी भविष्य २०१३ - कर्क 
कर्क 

नूतन वर्षाभिनंदन...
          वर्षाची सुरुवातीला गुरु तुमच्या राशीच्या अकराव्या घरात आहे. जो ३१ मे २०१३ पर्यंत असेल. त्यामुळे शिक्षण, व्यावसाय क्षेत्रात यश मिळेल, धनलाभ होईल. उच्च पदाधिका-यांना उच्च क्षेत्रातील लोकांशी संपर्क साधून वैयक्तीक पातळीवर नात्यांना सुरुवात करता येईल.
            समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. मित्रांकडून फायदा होईल. दीर्घ आजारापासून सुटका मिळेल. आपत्यप्राप्ती किंवा अपत्यसुखात वाढ होईल. वैवाहिक सुख उपभोगता येईल. मात्र विवाहबाह्य संबंधाचीही दाट शक्यता आहे. 

वार्षिक राशी भविष्य २०१३ - मिथुन - Yearly horoscope 2013 - Gemini

वार्षिक राशी भविष्य २०१३ - मिथुन 
मिथुन 

नूतन वर्षाभिनंदन...
           गुरु तुमच्या राशीच्या बाराव्या घरातून जात आहे जो ३१ मे २०१३ पर्यंत राहील. त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. व्यावसायात जास्त मेहनत केली तरच यश प्राप्त होईल. धार्मिक कामासाठी खर्च होईल. कर्ज फेडणे थोडे सोप्पे होईल. नोकरीमध्ये फायदा होईल. जून महिन्याच्या पहिल्याच तारखेला गुरु मिथुन राशीत प्रवेश करेल. त्यामुळे तुमची हिम्मत आणि धैर्य वाढण्यास मदत होईल. आपत्यप्राप्ती होईल.
           लग्नाला इच्छूक असणा-यांचे लग्न जमेल. बँकेचे कर्ज, क्रेडीट कार्ड किंवा अन्य आर्थिक जबाबदारी स्वीकारुन कर्ज वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे या गोष्टींपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. नोकरी सोडण्याचा विचार करत असला तर तो या वर्षीपूरता बाजूला ठेवा.

वार्षिक राशी भविष्य २०१३ - वृषभ - Yearly horoscope 2013 - Taurus

वार्षिक राशी भविष्य २०१३ - वृषभ 
वृषभ 
नूतन वर्षाभिनंदन...
                    वर्षाच्या सुरुवातीला गुरु तुमच्या राशीत असणार आहे. त्यामुळे वर्षाच्या सुरवातीला चांगला आर्थिक फायदा होईल आणि काही नवीन करण्याची इच्छा निर्माण होईल. गुरुची दृष्टी पाचव्या घरावर असल्याने आपत्य प्राप्तीची होईल.
                    प्रेमप्रकरणाला चांगला वाव आहे. या प्रमामुळे नवीन जागी फिरण्याची संधी तुमच्या राशीत आहे. लग्न करण्याची इच्छा असल्यास ती पूर्ण होऊ शकते. अर्धे वर्ष सरल्यानंतर म्हणजेच १ जूननंतर तुम्हाला अकस्मात धनलाभ होईल. कोर्ट आणि कायदेशीर गोष्टीत यश प्राप्त होईल. नोकरीत प्रमोशन होईल. 
                     समाजामध्ये मानसन्मान मिळेल. तुम्ही तुमच्या शत्रुंवर विजय मिळवाल. व्यवसायात यश प्राप्ती होईल. परंतु आरोग्याशी संबंधित अडचणी तसेच दीर्घ स्वरुपाचे आजारपणाला सामोरे जावे लागणार आहे. आपले कुटुंबीय आणि मित्रांकडून त्रास होऊ शकतो.

वार्षिक राशी भविष्य २०१३ - मेष - Yearly horoscope 2013 - Aries

वार्षिक राशी भविष्य २०१३ - मेष 

मेष 
नूतनवर्षाभिनंदन...
         तुमच्या राशीच्या दुस-या घरातून गुरू पुढे सरकत आहे. त्यामुळे या वर्षी तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुमच्या पगारात वाढ होईल. नोकरी व्यावसायात चांगल्या संधी उपलब्ध होतील. मात्र पगारापेक्षा खर्चही जास्त होण्याची चिन्हे आहेत. 
         तुमच्या राशीसाठी उच्च शिक्षणाचा योग आहे.तुम्ही नवीन प्रकल्पावर संशोधन करत असाल तर हे वर्ष तुमच्यासाठी फलदायी ठरणार आहे. प्रवासाचा योग आहे. लहान ट्रीप होईल. आरोग्याच्या दृष्टीने वर्षभर चढ-उतार होत राहतील. 
            मानसिक संताप वाढण्याची लक्षणे आहेत. त्यामुळे आपले डोके शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. कायदेशीर कागदपत्रे लक्षपूर्वक हाताळा. संपूर्ण वाचूनच कायदेशीर कागदांवर सह्या करा. कौटुंबिक प्रश्न वाद विवाद होणार नाहीत याकडे विशेष लक्ष द्या.

Sunday, December 30, 2012

केंव्हा मिळेल न्याय ???


केंव्हा मिळेल न्याय  ???
                                 आज ३० डिसेंबर २०१२ आपण २०१२ ह्या वर्षाला निरोप देण्यासाठी सज्ज आहोत असे म्हणत असताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करत असताना एका अतिशय खेदजनक अशा घटनेने आपला देश अक्षरशः ढवळून निघत आहे, ती म्हणजे आपल्या देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरामध्ये झालेले एक सामुहिक बलात्काराचे प्रकरण; इथे मला एक हा शब्द लिहिताना असे जाणवते आहे कि आपण चूक करतोय,कारण  फक्त एक प्रकरण समोर आले आणि त्याबद्दल एवढी आंदोलने झाली आणि अजूनही होत आहेत म्हणून हे पुन्हा एकदा जगासमोर आले कि अजूनही ह्या देशातील महिला किती सुरक्षित आहेत ? आणि ह्यासाठी खरे जबाबदार कोण ? सध्याचे जग हे पुरुष प्रधान संस्कृतीचे आहे असे आपण मानतो हे ठीक आहे पण मग शेवटी महिलांनी किती वर्ष आपल्या हक्कांसाठी लढत राहायचे ?असे अनेक प्रश्न ह्या एका प्रकरणामुळे समोर आले. ह्या आंदोलनांमध्ये अनेक सामाजिक संघटना सहभागी झाल्या, तसेच शाळा-कॉलेजमधील मुलांनीही  निरनिराळ्या प्रकारे आंदोलने केली. पण फक्त एवढेच करून त्या पिडीत मुलीला न्याय मिळेल का ? ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे सध्या प्रत्येकजण वेगवेगळ्या दृष्टीकोनातून मांडत आहेत.

Thursday, December 27, 2012

श्री महालक्ष्मी कॅलेंडर दिनदर्शिका २०१३ - Shree Mahalakshmi dindarshika Calendar 2013 DOWNLOAD

श्री महालक्ष्मी कॅलेंडर दिनदर्शिका २०१३  - Shree Mahalakshmi dindarshika Calendar 2013 DOWNLOAD click here


श्री महालक्ष्मी कॅलेंडर दिनदर्शिका २०१३  -
Shree Mahalakshmi dindarshika Calendar 2013 
Shree 
Mahalakshmi dindarshika Calendar 2013.zip click here


Shree 
Mahalakshmi dindarshika Calendar 2013.pdf click here

Friday, December 21, 2012

Date panchang dindarshika 2013 Download - दाते पंचांग दिनदर्शिका २०१३

Date panchang dindarshika 2013 Download - दाते पंचांग दिनदर्शिका २०१३


Date panchang dindarshika 2013 Download - दाते पंचांग दिनदर्शिका २०१३



Date panchang dindarshika 2013 Download - दाते पंचांग दिनदर्शिका २०१३

Date Panchang 2013 Download: दाते पंचांग २०१३


Date Panchang 2013 Download : दाते पंचांग २०१३


  

Date Panchang 2013 Download: दाते पंचांग २०१३



click here to Download 

Date Panchang 2013









Date Panchvarshik Panchang Download : दाते पंचवर्षीय पंचांग


Monday, December 17, 2012

First Marathi Breathless song by Bela Shende - Kanherichi Phule.

मराठीतील पहिले ब्रेथलेस गाणे - बेला शेंडे -अल्बम कण्हेरीची फुले 

First Marathi Breathless song by Bela Shende - Kanherichi Phule.




Album:

Kanherichi Phule

Singers:

Bela Shende, Dr.Amol Kolhe

Music Director:

Tejas Chavan

 











First Marathi Breathless song MP3 Play & download click here
Marathi Breathless Video song by Bela Shende - Kanherichi Phule.