खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Sunday, December 30, 2012

केंव्हा मिळेल न्याय ???


केंव्हा मिळेल न्याय  ???
                                 आज ३० डिसेंबर २०१२ आपण २०१२ ह्या वर्षाला निरोप देण्यासाठी सज्ज आहोत असे म्हणत असताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करत असताना एका अतिशय खेदजनक अशा घटनेने आपला देश अक्षरशः ढवळून निघत आहे, ती म्हणजे आपल्या देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरामध्ये झालेले एक सामुहिक बलात्काराचे प्रकरण; इथे मला एक हा शब्द लिहिताना असे जाणवते आहे कि आपण चूक करतोय,कारण  फक्त एक प्रकरण समोर आले आणि त्याबद्दल एवढी आंदोलने झाली आणि अजूनही होत आहेत म्हणून हे पुन्हा एकदा जगासमोर आले कि अजूनही ह्या देशातील महिला किती सुरक्षित आहेत ? आणि ह्यासाठी खरे जबाबदार कोण ? सध्याचे जग हे पुरुष प्रधान संस्कृतीचे आहे असे आपण मानतो हे ठीक आहे पण मग शेवटी महिलांनी किती वर्ष आपल्या हक्कांसाठी लढत राहायचे ?असे अनेक प्रश्न ह्या एका प्रकरणामुळे समोर आले. ह्या आंदोलनांमध्ये अनेक सामाजिक संघटना सहभागी झाल्या, तसेच शाळा-कॉलेजमधील मुलांनीही  निरनिराळ्या प्रकारे आंदोलने केली. पण फक्त एवढेच करून त्या पिडीत मुलीला न्याय मिळेल का ? ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे सध्या प्रत्येकजण वेगवेगळ्या दृष्टीकोनातून मांडत आहेत.
                                 ह्या अशा अनेक उत्तरांमध्ये महत्वाचे एक मत प्रकर्षाने पुढे आले ते म्हणजे ज्या नराधमांनी त्या पिडीत मुलीवर अत्यंत क्रूरपणाने अत्याचार आणि बलात्कार केला त्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. हे मत अगदी योग्य आहे; ही फाशीची शिक्षा तर होईलच परंतु घटनेतील न्यायव्यवस्थेचे अनेक असे बदल करणे देखील आवश्यक आहे. बलात्कार करणाऱ्यास मरेपर्यंत फाशी अश्या शिक्षेची तरतूद करणे आवश्यक आहे. तरच ह्या पिडीत महिलेला न्याय मिळाले असे काही अंशी समजण्यास हरकत नाही. आणि निदान ह्या शिक्षेची तरतूद झाल्यावर तरी असे नराधम वाईट विचार करणार नाहीत; अशी एक तूर्तास अपेक्षा करूयात, कारण हे एक प्रकरण संपत नाही तोच अजून अशी बरीच प्रकरणे समोर येत आहेत.
केंव्हा मिळेल न्याय  ???
                                ह्या सगळ्यावर काहीतरी ठोस असा उपाय करणे आवश्यक आहे. आणि हा उपाय शोधत असताना निदान इथेतरी कोणत्याही पक्षाने आपले राजकारण मधे आणू नये. हीच एक प्रत्येक देशवासियाची अपेक्षा आहे. कारण हा प्रश्न फक्त देशाचा नाही तर देशातील प्रत्येक नागरीकाचा आहे. प्रत्येक घरामधील स्त्री ही किती सुरक्षित आहे हे प्रत्येकाने विचार करण्यासारखे आहे. त्यासाठी स्वतःच्या घरापासून उपाययोजना करणे आवश्यक आहे. आता प्रश्न हा राहतो कि ह्यासाठी उपाययोजना काय करायच्या ? तर त्याचे सोज्वळ असे एकाच उत्तर मला आत्ता तरी सुचतेय ते म्हणजे असे, ही पुरुषप्रधान संस्कृती लक्षात ठेऊन प्रत्येक महिलेने आपली प्रगती करत असताना सामाजिक भान ठेवणे अन्यंत आवश्यक आहे. ते म्हणजे असे आपण कोठे राहतो? तेथील लोक कसे आहेत? ह्या सगळ्याचे भान ठेऊन त्यानुसार वागणे गरजेचे आहे. आणि प्रत्येक पुरुषाने महिलांबद्दल आदराने वागणे गरजेचे आहे त्यांच्या मनामध्ये असे वाईट विचार येउच नयेत आणि येत असतील तर फक्त आपल्याला आई, बहिण आहेत त्यांच्याकडे बघताना आपला दृष्टीकोन किती स्वच्छ आणि नितळ असतो त्याच प्रमाणे समोरून जाणारी प्रत्येक महिला ही पण कोणाचीतरी आई,बहिण आहे अश्या भावनेने प्रत्येक पुरुष वागले तर काहीप्रमाणात तरी महिलांना सुरक्षित आहोत असे वाटेल. तसेच समाजामध्ये अश्याप्रकारचे काही वाईट कृत्य घडत असेल असे निदर्शनास आले तर त्यामध्ये हस्तक्षेप जरूर करा आणि ते शक्य नसेल तर तातडीने पोलिसांची मदत घ्या. अशा काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर बराच फरक पडेल अशी अपेक्षा करतो. आणि ह्या लेखाच्या शेवटी "केंव्हा मिळेल न्याय ???" ह्या प्रश्नाचे काहीप्रमाणात का होईना पण उत्तर मिळाले असेल असे मी समजतो.

                                                                                              - तेजस दि. कुलकर्णी (kultejas...!!!)
                                                                                                                           

0 टिप्पणी पोस्ट करा:

Post a Comment