वार्षिक राशिभविष्य २०१९ - तूळ रास - Yearly horoscope 2019 -
Libra
तुळ राशीच्या २०१९ च्या राशी भविष्यानुसार या वर्षभरात तुमचे आयुष्य चांगले राहील. या वर्षी तुम्हाला सुदृढ आरोग्य लाभेलच, त्याचबरोबर दीर्घकाळापासून त्रास देणाऱ्या आजारांपासूनही मुक्त व्हाल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. मार्चनंतर तुमच्या नव्या कल्पना तुम्हाला यश मिळवून देतील. या कालावधीत तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिक चांगले परिणाम दिसून येतील. तुमच्या सहकार्यांकडून सहकार्य मिळेल. पण ते तुमच्या अपेक्षेनुसार नसेल. त्यामुळे त्यांच्यावर आंधळेपणाने विसंबून राहू नका. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम अनुभवायला मिळतील.
आर्थिक बाबतीत तुम्हाला नशीबाचीसुद्धा साथ मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी तुम्हाला अनेक
संधी प्राप्त होतील. २०१९ सालच्या ग्रहमानानुसार या वर्षी तुम्ही नवे नाते जोडाल. जोडीदाराशी असलेले तुमचे
नाते परिपूर्ण असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत पर्यटन कराल. त्याचप्रमाणे तुम्ही दोघे एकत्रितपणे मौजमजा
कराल.
No comments:
Post a Comment