Monday, November 26, 2018

वार्षिक राशि भविष्य २०१९ - मकर रास - Varshik Rashi Bhavishya 2019 - Makar Rashi - Yearly horoscope 2019 - Capricorn - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०१९ - मकर रास - Yearly horoscope 2019 - Capricorn

मकर राशीच्या २०१९ च्या राशी भविष्यानुसार हे तुमच्यासाठी चांगले वर्ष असेल. असे असले तरी तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही समस्या जाणवतील. पहिल्या तीन महिन्यांत म्हणजेच जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तुमचे आरोग्य चांगले राहील. या वेळी तुम्ही उर्जायुक्त असाल पण एप्रिल ते सप्टेंबर या कालावदीत तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागेल.
 आर्थिक बाबतीत चढ-उतार अनुभवाल. या वर्षात तुमचे खर्च वाढण्याची शक्यता आहे, पण उत्पन्नाच्या बाबतीत वाढ होण कठीण आहे. असे असले तरी आंतरराष्ट्रीय संबंधांमुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती मिळेल किंवा व्यवस्थापनाकडून तुमची प्रशंसा होईल. ऑक्टोबर महिन्यात अनेक चांगल्या बातम्या मिळतील. तुमचा व्यवसाय वाढेल. तुमच्या शृंगारिक आयुष्याचा आनंद उपभोगाल. २०१९ च्या राशी भविष्यानुसार तुमचे शृंगारिक आयुष्य रोमांचक असेल. तुमच्या जोडीदाराला तुम्हाला आयुष्याचा जोडीदार करायचे असेल तर या वर्षी ही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
   

No comments:

Post a Comment