खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Saturday, January 14, 2012

बनवा शॉर्टकट.

संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)

                           आज पासून मी नवीन सदर चालू करत आहे . "संगणकाशी दोस्ती" या सदरामध्ये आपण पाहणार आहोत संगणकावर छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण आपला संगणक (Personal Computer) कसा सुरक्षित तसेच सुटसुटीत (User Friendly) ठेऊ शकतो.


                                      तर आज आपण पाहणार आहोत . संगणकावर शॉर्टकट कसा तयार करता येतो .! संगणकाच्या हार्डडिस्कवर  आपण अनेक फोल्डर , फाईल्स आपल्याला दररोज वापराव्या म्हणजेच ओपन कराव्या लागतात; पण बरेचदा या  फाईल्स-फोल्डर चटकन सापडत नाहीत . यासाठी एक सोपी युक्ती करता येईल. संबंधित  फाईल अथवा फोल्डरमध्ये जाण्याचा शॉर्टकट डेस्कटॉपवर आणून ठेवता येईल. त्यासाठी त्या फाईल अथवा फोल्डरवर राईट क्लिक करा. येणाऱ्या पर्यायातील 'सेंड टू' मध्ये 'डेस्कटॉप-क्रिएट शॉर्टकट' वर  क्लिक करा आणि पहा. आता डेस्कटॉपला त्या फाईलचा शॉर्टकट तयार होईल. त्यामुळे तुम्हाला रोज आणि नेहमी लागणारे फाईल्स-फोल्डर शोधत बसावे लागणार नाहीत .

0 टिप्पणी पोस्ट करा:

Post a Comment