वार्षिक राशिभविष्य २०१५ - वृश्चिक रास - Yearly horoscope 2015 -
Scorpio
नववर्षाभिनंदन, २०१५ सालामध्ये बहुतेक ग्रह तुम्हाला अनुकूल असतील. तुम्ही पूर्णपणे सुरक्षित असाल. त्यामुळे २०१५ हे वर्ष तुमच्यासाठी खूप चांगले जाणार आहे. वृश्चिक राशीच्या कुंडलीनुसार फक्त शनीच्या स्थानामुळे थोडेसे उतार चढाव असतील, बाकी सर्व
एकदम उत्तम राहील. कारण सगळेच सुरळीत राहिले तर जगण्यात मजा नाही, थोडे खाचखळगे, अडथळे असतील तर जगण्यातील लज्जत वाढते. कौटुंबिक सौख्य राहील. प्रेमाच्या संदर्भात २०१५ हे वर्ष उत्तम राहील. शनि प्रथम स्थानात आल्यामुळे वैवाहिक आयुष्यात काही अडचणी निर्माण होतील. काही वेळा प्रेमासाठी झुरणेही चांगले असते. त्याचप्रमाणे तुम्हाला काही आरोग्याच्या तक्रारी सतावतील. काळजी करू नका, काहीही घडणार नाही. हा काळ कामासाठी चांगला आहे. त्यामुळे कामाचा ध्यास घेणार्यांसाठी हा काळ खूपच चांगला असेल. २०१५ सालच्या वृश्चिक राशीच्या कुंडलीनुसार आर्थिक स्थिती चांगली राहील. त्यामुळे काय काय खरेदी करायचे आहे. याची एक यादी करून ठेवा. दुसर्या बाजूला विद्यार्थ्यांच्या कष्टाचे चीज होईल. या वर्षाच्या उत्तरार्धात व्यवसायाशी निगडीत शिक्षण घेणाऱ्यांची प्रगती होईल.
वृश्चिक राशीच्या व्यक्तीसाठी २०१५ सालामध्ये करावयाचे उपाय: मांसाहार आणि मद्यप्राशन टाळा. कोणत्याही व्यसनापासून लांब राहा.
No comments:
Post a Comment