Tuesday, December 23, 2014

वार्षिक राशिभविष्य २०१५ - धनु रास - Yearly horoscope 2015 - Sagittarius

वार्षिक राशिभविष्य २०१५ - धनु रास - Yearly horoscope 2015 -
Sagittarius
नववर्षाभिनंदन, २०१५ सालच्या सुरुवातीला गुरु राशीच्या आठव्या घरात आहे, ही फार सकारात्मक बाब नाही. असे असले तरी फारशी नकारात्मकही नाही. त्याच बरोबर शनि १२व्या घरात आहे, त्यामुळे आर्थिक बाबी विचारपूर्वक हाताळाव्या लागतील. या सगळ्याचे
व्यवस्थापन करताना घाबरून जाऊ नका. तुम्हाला माहिती आहे की, आर्थिक बाबतीत ओढाताण झाल्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. या समस्या सोडविण्यासाठी कष्ट करा. धनु राशिभविष्य २०१५ अनुसार शांत आणि स्थिर मनोवृत्तीच्या व्यक्ती हे साध्य करू शकतात. त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबियांचा वागणुकीतही बदल झालेला तुम्हाला दिसून येईल. या बदलामुळे तुम्ही व्यथित होऊ शकता. प्रत्येक दृष्टीकोनातून तुम्हाला खंबीर करायचे असे ह्या वर्षाने मनावर घेतल्या सारखे वाटते. तुमच्यामध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागेल, त्याचा तुमच्या प्रकृतीवरही परिणाम होईल. प्रेम प्रकरणांमध्येहि फारसे समाधान लाभणार नाही. पण लक्षात ठेवा, जे होते ते चांगल्यासाठीच होते. दुसऱ्या बाजूला २०१५ सालच्या उत्तरार्धात तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ लागतील. तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद निर्माण होईल. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल आणि विद्यार्थ्यांना अनुकूल निकाल मिळतील. हे वर्ष म्हणजे  तुमच्यासाठी साहसी प्रवासाचे असणार आहे! 

धनु राशीच्या व्यक्तीने २०१५ सालामध्ये करावयाचे उपाय: देवळात तूप आणि बटाटा दान करा.
लेखक - हनुमान मिश्रा. 

No comments:

Post a Comment