Tuesday, December 23, 2014

वार्षिक राशिभविष्य २०१५ - तूळ रास - Yearly horoscope 2015 - Libra

वार्षिक राशिभविष्य २०१५ - तूळ रास - Yearly horoscope 2015 -
 Libra
नववर्षाभिनंदन,  तूळ राशीच्या व्यक्तींसाठी २०१५ हे वर्ष  लाभकारक आहे. तूळ राशीच्या व्यक्तींच्या कौटुंबिक आयुष्याबाबत सांगायचे झाले तर थोडे फार गैरसमज होण्याची शक्यता आहे. असे असले तरी एकोप्याला फार धक्का लागणार नाही. आरोग्याचा विचार करता २०१५ हे साल आपणासाठी उत्तम आहे. तुम्ही घर किंवा कार घेण्याचा विचार करत
असाल तर आता त्या द्विधा मनस्थितीतून बाहेर पडा. ठोस निर्णय घ्या. २०१५ चा उत्तरार्ध हा तुमच्यासाठी गुलाबी काळ असणार आहे. खासगी बाबतीत तुम्हाला अनेक आनंदाचे क्षण लाभणार आहेत. त्यामुळे ह्या गुलाबी वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी तयार राहा. तूळ राशीच्या कुंडलीनुसार या वर्षाबाबत तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी काहीतरी विशेष करून दाखविणार आहात. तुम्हाला नवी उर्जा मिळाली आहे, असे वाटते. नोकरीमध्ये बढती होण्याची खूप शक्यता आहे. लोकांकडून सहकार्य मिळेल आणि तुमच्याविषयी असलेला आदर आणि सन्मानात वाढ होईल. शनि दुसर्या घरात असल्यामुळे खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला खर्च करताना हात थोडासा आखडता घेण्याची गरज आहे विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष सकारात्मक राहील.

तूळ राशीच्या व्यक्तींनी २०१५ सालामध्ये करावयाचे उपाय: कपाळावर केशरी गंध लावा.
लेखक - हनुमान मिश्रा. 

No comments:

Post a Comment