Tuesday, December 23, 2014

वार्षिक राशिभविष्य २०१५ - मकर रास - Yearly horoscope 2015 - Capricorn

वार्षिक राशिभविष्य २०१५ - मकर रास - Yearly horoscope 2015 -
Capricorn
नववर्षाभिनंदन, मकर राशीच्या व्यक्तीसाठी २००१५ सालातील पहिले सहा महिने उत्तम असतील. तुमच्या अचूक योजनांचे फळ या काळात तुम्हाला मिळेल. तुम्ही बुद्धिमान आहात. तुमच्या राहत्या जागी कार्यक्रमांची रेलचेल राहील. कामाच्या ठिकाणी सर्व काही
 सकारात्मक राहील. हा तुमच्यासाठी जल्लोष साजरा करण्याचा काळ आहे. आर्थिक स्थिती समाधान कारक राहील तुम्हाला सगळीकडूनच सहकार्याचा हात मिळेल. तुमचे लग्नाचे वय झाले असेल तर २०१५ सालात या बाबतीत काही सकारात्मक घडण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी खूपच अनुकूल आहे. त्यांचे प्रयत्न निश्चित यशस्वी होणार आहेत. असे असले तरी २०१५ सालातील उत्तरार्ध मात्र काहीसा कठीण असेल. त्यावेळी गुरु तुमच्या आठव्या घरात असेल. परिणामी आर्थिक  समस्या उद्भवतील. त्यामुळे काहीही करताना विशार्पुर्वक पावले उचलण्याची आवश्यकता आहे पण काळजी करू नका, अशा प्रकारची गंभीर परिस्थिती उद्भवल्यावर तुम्ही सक्षमपणे तिचा सामना कसा करता हे चाचपण्याचा हा काळ आहे. त्याच्याप्रमाणे २०१५ या वर्षात कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करताना दोन वेळा विचार करावा असे हि कुंडली सांगते. 

मकर राशीच्या व्यक्तींनी २०१५ सालामध्ये करावयाचे उपाय: दर चार महिन्यांनी शेंडी असलेला नारळ वाहत्या पाण्यात सोडा. 
लेखक - हनुमान मिश्रा. 

No comments:

Post a Comment