Tuesday, December 23, 2014

वार्षिक राशिभविष्य २०१५ - कुंभ रास - Yearly horoscope 2015 - Aquarius

वार्षिक राशिभविष्य २०१५ - कुंभ रास - Yearly horoscope 2015 -
Aquarius
नववर्षाभिनंदन, कुंभ राशीच्या व्यक्तींना २०१५ हे वर्ष संमिश्र घटनांचे राहील. २०१५ या वर्षाच्या कुंभ राशीच्या कुंडलीनुसार तुमच्या जवळच्या व्यक्तींशी तुमचे संबंध काहीसे ताणलेले राहतील. पण लगेचच त्यांने व्यथित होऊ नका, कारण जे काही होते ते
चांगल्यासाठीच होते. तुमची काहीशी फटकळ भाषा हे त्यासाठीचे एक कारण असू शकेल. त्यामुळे शक्य तिथे विनम्रपणे वागा. कुटुंबातील व्यक्तीच्या आरोग्याच्या तक्रारींमुळे काहीसे तणावाखाली राहाल. पण खूप काळजी करण्याचे कारण नाही, कारण हा काळ पटकन निघून जाईल. तुम्ही कोर्टकचेरीमध्ये व्यस्त राहाल. पण काळजीचे कारण नाही, कारण तुम्ही विरोधकांना नेस्तनाबूत कराल. या वर्षाच्या उत्तरार्धात तुमच्या जवळच्या नात्यामध्ये जवळीक निर्माण होईल. वैवाहिक आयुष्य आनंदी असेल. तुम्हाला स्वर्ग केवळ दोन बोटे शिल्लक असेल. कामाच्या ठिकाणी सुद्धा सुधारणा होतील व इतरांचे सहकार्य लाभेल. ही आनंद व्यक्त करण्याची वेळ असेल. आर्थिक उत्पन्न आणि शिक्षण यात वाढ होईल. या कालावधीत तुम्ही सगळ्याच बाबतीत सक्रिय असाल. 

कुंभ राशीच्या व्यक्तींनी २०१५ सालामध्ये करावयाचे उपाय: देवळातील भटजींना पिवळ्या रंगाचे कपडे दान करा. 
लेखक - हनुमान मिश्रा. 

No comments:

Post a Comment