वार्षिक राशिभविष्य २०१५ - मीन रास - Yearly horoscope 2015 -
Pisces
नववर्षाभिनंदन, मीन राशीच्या व्यक्तींसाठी २०१५ हे वर्ष उत्तम प्रकारे सुरु होईल. मीन राशी भविष्य २०१५ अनुसार या वर्षात तुमच्या घरी धार्मिक शुभकार्य पार पडेल. तुमच्या घरी समारंभ साजरे करण्याचा हा काळ आहे. असे असले तरी एखाद्या कौटुंबिक सदस्याच्या उद्धट
वागणुकीचा तुम्हाला त्रास होईल. पण त्याकडे दुर्लक्ष करा, असा माझा तुम्हाला सल्ला राहील. केतूचा प्रभाव वाढता राहिल्यामुळे राहिल्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. अशा वेळी तुमच्या आहाराच्या सवयींवर लक्ष ठेवणे आवश्यक राहील. मीन राशीची कुंडली सांगते की, या काळात तुम्ही काळजीपूर्वक वाहन चालवा. प्रेम प्रकरणासाठी हा कालावधी अनुकूल आहे. पण सातव्या घरात असलेला राहू हे फार चांगले चिन्ह नाही. त्यामुळे प्रेम आणि विश्वास हे दोन घटक नेहमीच अत्यंत महत्वाचे राहतील. तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकेल त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होईल. असे असले तरी कष्ट आणि जबाबदारी यात वाढ होईल. त्यामुळे तयार राहा. त्याचप्रमाणे या वर्षात तुम्हाला आर्थिक लाभ, पगारवाढ होण्याची शक्यता आहे. अनेक चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत, त्यामुळे हा आनंद साजरा करण्याचा काळ आहे. शिक्षणासाठी हा अत्यंत अनुकूल असलेला, पण २०१५ च्या उत्तरार्धात काही समस्या उद्भवू शकतात.
मीन राशीच्या व्यक्तींना २०१५ सालामध्ये करावयाचे उपाय: देवळात तांदूळ, गुळ आणि मसूर याचे दान करा.
लेखक - हनुमान मिश्रा.
No comments:
Post a Comment